Social media , संस्कृती आणि lucky bitch

आपली संस्कृती आणि आपले संस्कार, ह्या विषयी आपण नेहमीच काही तरी ऐकत वाचत किंवा बघत असतो. लहानपणा पासून घरातून आणि परिसरातून आपल्यावर कळत नकळत संस्कार होत राहतात. पुढे ते आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग होतात.

हे संस्कार म्हणजे तरी काय? आपल्या जडण घडण साठी लागणारी सामुग्री म्हणजे संस्कार. चालीरीती (चालणे – बोलणे – वागणे), खाण्यापिण्याच्या सवयी, विचार करण्याची पद्धत आणि खूप काही संस्कार नावाच्या पोतडीत सामावले आहे. यातून आपण घडतो.

घरांघरात जश्या खाण्याच्या सवयी वेगळ्या तश्याच वाग्ण्याच्याही. एकीकडे जळजळीत मिरची असलेले कालवण तर दुसरी कडे तिखटाशिवाय जेवण. भाषेचे पण तेच. साधारण पणे असे दिसते की माणूस शिकलेला असला की कुठे काय बोलावे आणि मुख्य म्हणजे काय बोलू नये याची समज येते.

मला खूप पूर्वी पासून एक प्रश्ण पडत असे, ‘शिव्या’ बद्दल,  देणे चांगले कि वाईट. घरात विचारायची सोय नव्हती आणि मित्रांना विचारावे तर लाज. एवढेच समजले की शक्य तो राग आल्या शिवाय किंवा भांडणाशिवाय वापर होत नसतो. थोडक्यात काय तर दुसर्याला डिवचायला म्हणून उपयोगी.

social media  ने माझी ती समजूत पार ढवळून टाकली आहे. कारण अगदी सोपे आहे, खूप शिकलेली (डब्बल डिग्र्या घेत ),  भरपूर पगार घेत असलेली माणसे, आणि हो ज्यांच्या वर संस्कार नीट झाले होते (अशी माझी भाबडी समज ) ती माणसे,  बिनदिक्कत शिव्यांचा वापर करत असतात. पण कां?

शिव्यात प्रामुख्याने दोन प्रकार दिसतात, अर्थ नसले आणि अर्थ असलेले. रोष किंवा प्रेम दाखवायला अपशब्द वापरणे गरजेचे आहे का? स्वतःला cool सिद्ध करण्यासाठी दुसरा काहीच उपाय नाही का?

कोणावर आपुलकी दाखवायला “lucky bitch “, “साले हरामी” अशी बिरुदे जोडणे बरोबर आहे का?  उद्या मुलाने आपल्या वडिलांस प्रेमाने अशी हाक मारली तर चालेल का? इथे काही चुकत आहे कि मी काळाच्या मागे पडले आहे?

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.