भारताचा अर्वाचीन इतिहास – सिंधूनदी संस्कृती (भाग दोन 2)222

भारताचा अर्वाचीन इतिहास :- सिंधूनदी संस्कृती 


इतिहासात आपण वसाहती बद्दल वाचतो, पण मानवी इतिहाचाची सुरुवात खूप वेगळ्या रीतिने  झाली.

माणूस अस्तित्वात आला तेंव्हा पाणी व हवा उपलब्ध होतीच आणि इतर प्राण्यां प्रमाणे गरज लागली की तो अन्नाचा शोध घेत असे. बुद्धी असल्याने तो नंतर मात्र उपलब्ध अन्न साठवू लागला. पुढे आगीचा शोध लागला आणि  कालांतराने त्याने शिकारीसाठी आयुधे ही तयार केलीत. सुरुवात दगडा पासून झाली, मग दगड आणि लाकूड, आणि शेवटी धातू. असे करून तो हळू हळू स्थिरावला आणि वसाहत करू लागला.


संस्कृती किंवा सभ्यता म्हणजे काय? क्लिष्ट व्याख्येत न जाता, संस्कृतीसाठी लागणाऱ्या किमान गोष्टी अगदी सोप्या भाषेत सांगायच्या तर पुढील  प्रमाणे आहेत : मोठी केंद्रीय वसाहत, अतिरिक्त अन्न साठा, वसाहतीचा कारभार बघण्यास शासन, धार्मिक ऐक्य, कामाची विभागणी आणि आर्थिक व्यवहाराची सोय किंवा कर प्रणाली. हे आणि इतर काही मुद्दे प्रमाण मानून संस्कृतीचा अभ्यास केला जातो. 


भारतात अश्मयुगा पासून ते समृद्ध वसाहती, या कालखंडात  झालेल्या प्रगतीचा कालक्रमानुसार तंतोतंत इतिहास लिहिणे पुरातत्व विज्ञानच्या (पुराणवस्तुसंशोधन) आधुनिक अभ्यासानंतर देखील अजूनही शक्य नाही. 


सानेगुरुजी म्हणतात “ प्राचीन काळी चीनमधून, पश्चिम व मध्य आशियातून मोठमोठे प्रवासी येऊन त्यांनी हिंदुस्थानात ठिकठिकाणी फिरून आपली प्रवासवृत्ते लिहून ठेवली आहेत.  त्यांच्या वाचनातच मनाने मी सारा देश पाहिला. ” आणि “पाच हजार वर्षांच्या इतिहासात किती स्वार्‍या, किती उत्पात झाले.  परंतु सांस्कृतिक परंपरा सदैव टिकून राहिली. 


सिंधूनदी संस्कृतीत ज्या दोन मुख्य शहरांचा शोध लागला ते म्हणजे हरप्पा आणि मोहोंजो दारो त्या वरून ही संस्कृती नागरी—मोठ्या शहरांतून केंद्रित झालेली होती. दोन्ही शहरांची बांधणी एकाच पद्धतीची आणि नगर रचन अतिशय उत्तम होती.  उत्खननात सापडलेल्या अवशेषां  वरून मूळ शहरांचे  क्षेत्र अंदाजे एक चौ. मैल असणर.  अगदी शंभर वर्षांपूर्वी पर्यंत  हरप्पात एका भिंतीचा काही भाग शिल्लक होता पण तो मध्ययुगात बांधण्यात आला असावा असे शास्त्रज्ञांचे मत आहे.  मोहोंजो दारो येथे ही एका बंधाऱ्याचे (भिंती)चे अवशेष सापडले आहेत पण ते मूळचे असावे. घरे मोठी होती आणि एकाहून जास्त मजले असलेल्या घरांच्या भिंती भक्कम होत्या. ह्या घरांसाठी छताला आधार देण्यासाठी ठोस मजबूत असे लाकूड वापरण्यात यायचे जे बहुत करून पार हिमालयातून आणले जायचे. मोठ्या घरांचे अंगण फरसबंदी असायचे, अश्या घरांत एक विहिर सुद्धा असायची.  या शहरांचे सर्वात मोठे वैशिष्ट होते, अतिशय उत्कृष्ट अशी सांडपाणी विल्हेवाट लावायची व्यवस्था. नदीच्या पुरामुळे ही शहरे अनेकदा वसवली गेली, घरांची रचना बदलण्यात आली मात्र रस्ते आणि गटार व्यवस्था चोख आणि पूर्वीचीच होती. तसेच रस्ते पूर्वी ठरवलेल्या प्रमाणेच होतेआणि वसाहतीच्या काळात त्यावर अतिक्रमण झाले नाही त्यामुळे लोक नगररचनेतील नियम पळत असावे. शास्त्रज्ञांच्या मते हे इतर संस्कृती, मेसोपोटामिया, ग्रीक किंवा रोमच्या अगदी विरुद्ध होते. या वसाहतींच्या होण्याबद्दलचे सर्व पुरावे ठोस आहेत, इतकी हजारवर्षे भंगलेल्या अवस्थेत असले तरी सर्व बांधकाम व्यवस्थित होते, बदल आंतरिक होते जे कदाचित अचानक झालेल्या परदेशी आक्रमण आणि त्याने उद्भवलेल्या हत्याकांडामुळे  झाले असावे कारण बऱ्याच घरात आणि रस्त्यां वर अनेक मानवी सांगाडे मिळाले होते. अवशेषां वरून हि संस्कृती नवीन नव्हती आणि खूप प्रगत झाली होती.  सोने-चांदीचे आभूषण, तांबे-पितळची अवजारे, चाकावर तयार केलेली मातीची सुबक भांडी, कापड तयार करून रंगवणे या सर्व कला अवगत होत्या. धान्यात सातू, गहू, तांदूळ,  आणि तेलबी साठी तीळ वापरले जात होते. प्राणी पाळणे रूढ झाले होते. लेखनकला अवगत होती. मिळालेल्या मुद्रा वर अशक्य कोटीतील प्राणी आहेत किंवा अनेक प्राण्यांचे संयुग, जसे हत्ती, मेंढा, वाघ, मासा, म्हैस. एका मुद्रेवर कोरलेले चित्र अर्धे पुरुष आणि अर्धे सिंह चे आहे, जे पुढे जाऊन  ‘नरसिंह’ म्हणून ओळखले गेले असावे.  व्यापाराच्या बाबतीत निसंदेह खूप प्रगती झाली होती. चलनाचे स्वरूप जरी नाही समजले तरी वजनासाठी प्रमाण होते हे समजते. वजन मोजमापासाठी मूलभूत अशी प्रणाली होती. काही वजन माप तर इतके लहान आहे कि ते बहुदा सोने-चांदी, रत्न माणिक किंवा अति मौल्यवान वस्तू वजन करण्यास वापरात असावे. सिंधू घाटी संस्कृती एका क्षेत्रात सीमित होती, एकवटलेली होती, ती गंगेच्या खोऱ्या पर्यंत विस्तारित नव्हती.  त्याकाळातील लिपी हि अशोकाच्या ब्राम्ही लिपीशी साधर्म  असण्याची दाट शक्यता आहे. मिळालेल्या लेखांचा अद्याप पूर्ण उलगडा झालेला नाही. 


नदी खोऱ्यातील संस्कृतीचे मूळ कारण म्हणजे पाण्याचा पुरवठा आणि शेतीसाठी मोकळी जागा.  त्याकाळात मोठ मोठाली जंगले साफ करणे तसे शक्य नव्हते.  सिंधू नदीला प्रचंड पूर येतात आणि पूर्वी या हून मोठे येत असावे आणि त्या मुळे  डोंगर माथ्यावरील जंगले आपोआप नष्ट होऊन  शेती साठी जागा उपलब्ध होत असावी. मोहेंजो-दारोचे अवशेष पाहिले तर वाळूचे थरावर थर बसत गेलेले दिसतात, व त्यामुळे घरांच्या जुन्या पायावर उंचउंच तळ घेत घरे बांधणे भाग झालेले दिसते परंतु तळाच्या चढत्या उंचीमुळे उत्तरोत्तर भिंती अधिक उंच कराव्या लागत होत्या.


मोहेंजो-दारो आणि हराप्पा येथील उत्खननावरून कितीतरी गोष्टी शेकडो वर्षे गेली तरी कशा टिकून राहिल्या आहेत हे दिसते.  खणून काढलेली काही काही घरे तर चांगली दुमजली, तिमजली होती याचे पुरावे सापडले आहेत. हे सर्व असून, अतिरिक्त धान्य साठे मात्र मेसापोटेमियातील किंवा नीलनदी संस्कृतीच्या  साठ्यांन पेक्षा लहान होते.

सापडलेल्या अवशेषां वरून सिंधूनदी संस्कृती ही मोहेंजो-दारो आणि हराप्पा येथे एकवटलेली होती. या भागात ज्या दुसऱ्या वस्त्या सापडल्या त्यतील सर्वात मोठे गाव खैरपूर’ येथे  ९०० मैल लांब उत्तरेला होते. त्या भागात विकास फार झाल्याचे आढळले नाही.  तसेच लोथल, बदीन, कच्छ च्या वाळवंटात काही ठिकाणी व्यापार नाके किंवा छोट्या वसाहती सदृश अवशेष सापडलेत ह्या वरून सिंधू घाटीतील लोकांचा तत्कालीन संस्कृतीशी व्यावसायिक संपर्क होता. 

सिंधू नदी संस्कृतीतील दफनभूमी ही पण अभ्यासाचा विषय आहे. हरप्पा येथील एका दफनभूमीला cemetry H असे नाव आहे. तिचे वैशिष्ट म्हणजे लहान मुलांनचे सांगाडे माठाच्या आकाराच्या भांड्यात सापडले आहे, मृत मुलांना गोल अश्या मातीच्या भांड्यात दफन करण्यात येत असावे, जणू पुन्हां गर्भाशयात ठेवल्या सारखे. हे सांगाडे पूर्ण होते याच्या उलट मोठ्या व्यक्तींची काही हाडे मठात सापडली आहेत. काही भांड्यान वर नक्षीकाम केलेले आढळते. पुरण्याच्या पद्धतीत मूलगामी बदल जाणवतो. याचे कारण बाहेरून हल्लेखोर आले असावे,  ज्या मुळे  युद्ध आणि मोठ्या प्रमाणात कत्तल झाली. पण कुठल्या हि गोष्टी चा नित सुगावा लागत नाही.


सिंधूनदी संस्कृतचा नाश कसा झाला? संस्कृती कशी गडप झाली? एके काळी जिथे शेती होत असे तिथे वाळवंट कसे आले?याच्या संबंधी लिखाण सापडत नाही. प्राचीन शहरे वाळूत पुरली गेली पण काही प्रमाणात वास्तूंचे जतन झाले. कुणी सांगावे भविष्यात पुरातत्व (पुराणवस्तुसंशोधन) खात्याला अजून काही अवशेष सापडतील आणि अधिक माहिती उपलब्ध होईल. 


विशेष 

मेसोपोटेमिया येथील पुरातन वास्तू  मध्ये ७ मुख्य शहरे आढळतात, या गावांच्या द्वारपाल (guardian  figures ) वरून पुढे सात-ऋषी आख्यिका प्रसिद्द झाली. सिंधूनदी संस्कृतीतील दोन मुद्रां वर कदाचित याच सात द्वारपालांचे चिन्ह प्रतिबिंबित होते असा अंदाज आहे आणि कदाचित ब्राह्मणातील गोत्र प्रणालीतील ते सात ऋषी असावे. पण ऋषी कुळाची ही संख्या आणि प्रचिलित संख्येत तफावत आहे. 

NOTE: या संदर्भात अजून माहिती मिळवणे गरजेचे आहे. वाचकांपैकी कोणास माहिती असल्यास कळवावे.

2 thoughts on “भारताचा अर्वाचीन इतिहास – सिंधूनदी संस्कृती (भाग दोन 2)222

 1. भारताच्या प्राचीन इतिहासाबद्दल आपल्या लोकांना खुपच कमी माहिती असते. यासारख्या लेखांव्दारे ती होत आहे, ही फार चांगली गोष्ट आहे. धन्यवाद.
  मराठीमध्ये ब्लॉग लिहणारांची संख्या मुळात कमी आहे. या ब्लॉगर्सनी एकत्रितपणे प्रयत्न केले तर प्रत्येकाच्या ब्लॉगला भेटी देणाऱ्यांची संंख्या वाढू शकते. यासाठी जास्तीत जास्त मराठी ब्लॉगला भेटी द्या. लाईक करा, कॉमेंट करा, आवडला तर फॉलो करा. यातूनच मराठी ब्लॉग विश्व वाढू शकते. आपणही यावर विचार करावा ही विनंती.
  माझ्याही ब्लॉगला आपण भेट द्यावी ही विनंती आहे.
  घनश्याम केळकर, बारामती

  Liked by 1 person

  1. माझ्या ब्लॉग ला भेट दिल्या बद्दल आभार आणि आधी उत्तर लिहायचे राहिले या साठी क्षमस्व. मराठी ब्लॉग ची
   संख्या हळू हळूवाढत आहे पण लोकांचा कल वेगवेगळ्या विषय कडे असतो. तुमच्या शी मी सहमत आहे कि जर आपण एक मेकांना प्रोत्साहन दिले तर मराठी लिहिणाऱ्यांचे आणि वाचणाऱ्यांचे प्रमाण वाढेल. तुमच्या ब्लॉग ला मी नक्की भेट देईन.

   Liked by 1 person

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.