संस्कृती आणि पारंपरिक कर्मकांड की ‘रॅशनल थिंकिंग?

आज लोकसत्ते मध्ये एक छान लेख वाचला. बरेच दिवस या संदर्भातले वेग वेगळे विचार मनात घोळत होते. लेखिकेचे आभार माझे लिखाणाचे श्रम वाचविल्या बद्दल.

मी येथे मला आवडलेले लेखातील मुद्दे मांडत आहे. पण हा लेख शिकलेल्यांनी अवश्य वाचवा असे मला वाटते. अश्या गोष्टींची चर्चा तरुण पिढीत होणे गरजेचे आहे. महाविद्यालातून अश्या प्रकारचे प्रबोधन झाले तर खूप प्रश्न आपसूप मिटतील.

  • सणावारांबद्दल असं सांगितलं जातं की अमुक निमित्तानं लोक जमतात, तमुक निमित्तानं माणसं भेटतात. सगळय़ांच्या भेटी होतात. पण ती सगळी निमित्त धर्माशी निगडित, धार्मिक असणं हे शंभर वर्षांपूर्वी ठीक होतं. नव्हे योग्यच होते, पण आता तर या काळात साध्या कारणांनीसुद्धा सारखी गेट टुगेदर होत असतात.
  • पूर्वीचे सणसमारंभ, रीतीभाती, परंपरा या त्या काळच्या समाजाला एक बांधीव स्वरूप देण्यासाठी पूर्वजांनी निर्माण केल्या. प्रत्येकामागे निश्चित असा वैज्ञानिक दृष्टिकोन पूर्वजांनी ठेवला असणारच, परंतु तो दृष्टिकोन नंतरच्या पिढय़ांना फारसा कुणी शिकवला नाही. रीतीभाती, परंपरांना पापपुण्याच्या कल्पना चिकटवून समाजाला फक्त धाक दाखवला गेला. तो धाक पिढय़ान्पिढय़ा ‘पोसलाही’ गेला.
  • रीतीभाती-लग्नकार्यातले विधी, कधीही एकमत न होणाऱ्या व्रतवैकल्यातल्या गोष्टी आणि सर्वात शेवटी चाललेली कर्मकांडं, सध्याच्या काळात या सगळय़ाला आलेलं उत्सवी स्वरूप.. हे सगळं प्रचंड गोंधळात टाकणारं आहे. बरं हे सारं यथासांग करणारी मंडळी आपापल्या सोयीप्रमाणे ती कर्मकांडं बदलत राहतात. आणि समोरच्याला मात्र त्यातला अट्टहास समजावून (धमकावून )सांगतात.
  • चांगला नवरा मिळावा, चांगलं घर मिळावं, मुलगा व्हावा, धनधान्य, वैभव मिळावं म्हणून व्रतवैकल्य करणं आणि कडक उपास करणं हे आजही कित्येक आई आणि सासू यांच्यासाठी महत्त्वाचं ठरतं आहे. आणि ते केले नाहीत तर त्यांना ते ते मिळणारच नाही, अशी सोयीस्कर समजूत घालून आजही अनेक तरुणींवर ते लादलं जातंय.
  • संस्कृती टिकवण्यासाठी सुसंस्कृत विचारसरणी आवश्यक आहे. एकमेकांना समजून घेणं, एकमेकांमध्ये सुसंवाद असणं आणि सोयीप्रमाणं आपल्या कुटुंबाची रचना ठेवणं हे जास्त आवश्यक आहे.
  • ‘लग्न’ या प्रकारात तर सध्या साधेपणा म्हणजे कोणतं तरी पाप असण्यासारखं पिसाटासारखे खर्च होताना दिसतात.
  • रीतीभाती, अंधश्रद्धा, अंधविश्वास यांना आपलं आपणच आम्ही बांधून घेतलं आहे. आणि तिथेच घुमतोय सारखे.. पिंगा ग बाई, पिंगा ग बाई पिंगा.. कुणी डोळसपणानं पुढे जात असेल तर त्याला टोमणे मारून मारून मागे ओढायचं आणि घ्यायचं या खेळात पुन्हा घुमायला. आणि आसुरी आनंदानं पुन्हा त्या दिशाहीन, परंपरांचा पिंगा घालायला लावायचं. पिंगा ग बाई, पिंगा ग बाई पिंगा..

 

संपूर्ण लेख येथे सापडेल पिंगा ग बाई पिंगा..

2 thoughts on “संस्कृती आणि पारंपरिक कर्मकांड की ‘रॅशनल थिंकिंग?

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.