रोहयो (रोजगार हमी योजना) लाभार्थीमध्ये गोव्याचे मुख्यमंत्रीचे पण नाव!

गोव्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) लाभार्थ्यांमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, सचिन तेंडुलकर, बरोबरच आमिर खान, कपिलदेव, राहुल द्रविड, सौरव गांगुली, युवराजसिंग यांचीही नावे आहेत.

एवढेच नव्हे तर या नामवंतांच्या कुटुंबातील अन्य व्यक्तींची नावेही यादीत असून अमिताभ यांच्या दिवंगत मातोश्री तेजी बच्चन यादेखील या यादीनुसार रोहयो कामांवर राबत आहेत. या सर्वाना रोज शंभर रुपये याप्रमाणे दीडशे दिवसांची मजुरी दिली गेली आहे.

हे सर्वजण गोव्यातील रोजगार हमी योजनेत दिवसाला शंभर रुपये मेहनतान्यावर राबत असतील, अशी शंकाही कुणाला येणार नाही. पण हे ‘गुपित’ माहिती अधिकारातूनच फुटले आहे! राज्याच्या ग्रामविकास विभागाकडूनच ‘गोवा परिवर्तन मंच’ या संस्थेने माहिती अधिकारात ही यादी मिळविली.

आपल्या देशात अनेक प्रकारे सरकारी योजनांचा गैर वापर होतो.  योजनांचा उपयोग पैसे लाटणे एवढाच राहतो.  याचेही उत्तर सोपे आहे, आपल्या देशात गुन्हेगारांना शिक्षा होण्यास खूप विलंब होतो किंवा ते पळवाट शोधून काढतात. मोठा वकील शोधून सुटतात देखील. म्हणून गैर कारभार करणायांची मजल मुख्यमंत्रीचे नाव सामील करण्या पर्यंत गेली आहे.  परंतु हे प्रकार गोव्यात घडत असतील याची साधी कल्पना करवत नाही. शेवटी गोवा हा भारताचाच भाग आहे. हम सब भाई – भाई हैं. राष्ट्रीय एकात्मतेचे उदाहरण म्हणा हवे तर.

पूर्ण बातमी  लोकसत्तेत आली आहे.

Advertisements

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s