संवेदना

वर्तमानपत्रात किंवा टीव्ही वर त्रासाच्या, छळाच्या किंव्हा अत्याचाराच्या बातम्या बघून कोणास हि त्रास होणे स्वाभाविक आहे. किंबहुना समाजात संवेदना अजून जिवंत आहे याचे प्रमाण आहे.

अभ्यास/ व्यवसाय संदर्भातील वाचनात संवेदना ला स्थान नसते. ते योग्य हि वाटते. आज काही कारणाने एक सत्यकथा वाचनात आली. आणि मन अस्वस्थ झाले.

एका स्त्री ने स्वतःच्या गर्भापाता बद्दल सविस्तार सांगितलेली हकीकत. एके दिवशी तिला कळले कि आपण गर्भवती/ गरोदर आहोत. बरे मग पुढे काय.  न झालेल्या मुलाच्या बापाला विचारले कि काय करावे. यातून सुटका करून घे हे उत्तर आले. हे उत्तर अपेक्षित होते आणि ते बरोबर हि आहे असे तिला वाटले कारण, तिच्याच शब्दात सांगायचे तर ” आम्ही काही नवरा बायको नाही, फक्त मित्र आहोत, काही वेळा एकत्र झोपलो, आम्ही काळजी घेतली होती पण … , सध्या दोघे हि लग्न करण्याच्या मनस्थितीत आणि परिस्थिती नाही आहोत “. या पुढचे फार महत्वाचे नाही. जे हवे होते ते झाले. तिची, त्याची आणि न जन्माला आलेल्या जीवाची सुटका झाली.

य़ गोष्टीत असे नवीन तरी काय होते? मग मन अस्वस्थ कां झाले? याला  उत्तर आहे का? कदाचित प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतेस असे नाही. असो.

Advertisements
This entry was posted in सामाजिक, Marathi and tagged , . Bookmark the permalink.

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s