फालतूपणाची अर्थपूर्ण गोष्ट!

‘स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट‘ या पुस्तकासाठी अवधूत डोंगरे यांची युवा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

या कादंबरी ची माहिती शोधली तेंव्हा उपलब्ध होते ते:

एक:

कादंबरीचा नायक असलेल्या तरुणामध्ये स्वत:ला फालतू समजण्याची मनोवृत्ती कशी जन्मली, याचा शोध घेता घेता नाव नसलेल्या या तरुणाची ही गोष्ट प्रातिनिधिक आणि बरीच अर्थपूर्ण असल्याचे लक्षात येते.

दोन:

पुणे शहराच्या सदाशिव पेठ नामक बर्म्युडा ट्रॅंगलमध्ये असणार्‍या एका खाजगी होस्टेलवर राहणारा संवेदनशील स्वभावाचा तरुण (की न नायक?) टिळक रोड व्हाया अलका चौक, लकडी पूल ते फर्ग्युसन रस्त्यावरील रानडे जर्नालिझम डिपार्टेंट, वर्तानपत्राचे ऑफिस येथे होणारी त्याची नियमित “वारी”. यात सोबतीला आहेत जर्नालिझम डिपार्टेंटलमधील मोडून पडलेलं झाड, लायब्ररी, त्याच आवारातील तीन पायाचा नेहमीच गप्प असणारा कुत्रा, दसनूरकर, सहअध्यायी (मित्र किंवा वर्गमित्र नव्हे), लकडी पुलावर जुनी पुस्तके विकणारा सुधाकर व त्याच्यासोबतचा बिडी ओढणारा फाटका माणूस, तेथेच “नवा काळ”मधील कोडे सोडवणारे बाळासाहेब, म्हातार्‍यांचा ग्रुप, गुलाबी ड्रेसवाली मुलगी, पुठ्ठेवाला म्हातारा, टिळक रोडवरील पेपर विकणारी बाई, शेवटचे आचके देत असलेले मराठी वर्तानपत्राचे ऑफिस व त्यातील लोक, होस्टेलवरचा परप्रांतीय उदय, मोबाईल, रेडिओवरील फिल्मी गाणी, निवडक पुस्तके, आजूबाजूचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्थानिक असे गोंधळात टाकणारे वातावरण व त्यांचा भयंकर फाफटपसारा. परिणाम त्यामुळे आपण फालतू आहोत ही चुकीची पण प्रांजळ, प्रामाणिक जाणीव, त्यातून पडलेले प्रश्न, त्यांची आपल्या परीने उत्तरे मिळवण्याचा घेतलेला शोध व आत्महत्या करण्यापेक्षा स्वत:ला फालतू समजणे चांगले हा हाती लागलेला निष्कर्ष. अशी या कादंबरीची कहाणी.

हे पुस्तक अजून हाती आलेले नाही पण वरील पुनरावलोकन वाचून आपला समाज दिसतो. आपल्या आजू-बाजूला वास्तव्य करणारी अशी अनेक माणसे आपल्या लक्षात येतात. आपला समाज दोन तऱ्हेच्या लोकांनी व्यापला आहे, स्वतःला खूप शहाणे समजणारे आणि स्वतःला फालतू समजणारे. नॉर्मल माणसे या इतर दोघांच्या गर्दीत हरवली आहेत. असे कां?

आपल्या कडे अगदी बालवाडी/शाळे पासून प्रत्येकाची तुलना दुसऱ्याशी जाते  आणि हे इतक्या सहज रिती ने होते कि आपण जग हे असेच असते असे धरून चालतो. वास्तव्यात दोन व्यक्तींची तुलना ही योग्य नव्हेच. मी मी आहे तुम्ही तुम्ही आहात. जुळी भावंडे पण वेगळी असू शकतात आणि बहुतांश वेळा ती वेगळीच असतात. आणि हाच निसर्ग आहे. जेंव्हा आमच्या बालवाड्या/शाळा/घर/परिसर इथून असा तुलनात्मक अभ्यास बंद होणार तेंव्हा समाजातून फालतूपणाची/ शहाणपणाची भावना नाहीसी होणार. तोवर मात्र अश्या अनेक कथा आमच्या अवती भवती घोटाळत राहणर.

संदर्भ:

स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट

स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.