डायरीचे पान – Happiness

It is not how much we have, but how much we enjoy, that makes happiness.
~ Charles  Spurgeon 

सगळे आहे म्हणून कोणी आनंदी होत नाही तसेच सगळे नाही म्हणून आनंदी होता येत नाही असे नाही. आनंदाचा क्षण आपण ओळखला की झाले.

प्रसंग एक:

तो हल्ली नियमित फिरायला जातो. सध्या हवा बरी असल्याने बरेच जण फिरायला बाहेर पडतात, कोणी एकटे, कोणी कुटुंब सह. गर्दी आपल्या कडे भारतात असते तशी मुळी नाहीच, म्हणाल तर तुरळक, पण बर्फात चीट पाखरू दिसत नाही. तसे काही नाही. या काळात चिऊ ताई देखील आपल्या फौजे सह दिसते.

 वाट नेहमीची असल्याने तो बराच सरावाला आहे आणि त्यात आयपॉड वर गाणी. तो जणू आपल्याच दुनियेत वावरत असतो. परवा, एक लहान ब्रिज ओलांडताना, त्याच्या लक्षात आले कि एक म्हातारे जोडपे मधेच उभे आहे आणि खाली पाहून कश्या बद्दल चर्चा करतायेत.  त्या दोघांचे दुसरी कडे मुळीच लक्ष नव्हते. म्हातार्याच्या हातात, दोरी होती. दोरीच्या  दुसऱ्या टोकाला कुत्र्याचे एक लहान पिल्लू होते. त्या तिघां मुळे  रस्ता/फुटपाथ अडला होता.  त्याने वेग मंदावला, तो चाचपणी करू लागला, जर गाडी येत नसेल तर आपण थोडे रस्त्या वरून चालावे का? असा विचार करत असताना एक गम्मत झाली. बरे ते म्हातारे जोडपे, जणू या जगातच नव्हते. त्यांचे संभाषण चालूच होते.  लहान पिल्लू ने याच्या कडे पहिले आणि ते अलगद जागा सोडून ब्रिज च्या रेलिंग च्या बाजूस गेले. एका लहान मुलाने बाजू ला होऊन वाट करून द्यावी अगदी तसे.   तो हसला आणि पुढे गेला, त्याने मागे वळून पहिले,  त्या पिल्लू चे लक्ष आता दुसरी कडे होते. याला मात्र गम्मत वाटली.

प्रसंग दोन:

नेहमीच्या वाटेने न जाता आज तो डोंगरा वर चालत गेला. बरेच वर चढून गेल्या वर त्याचा चालण्याचा  वेग कमी झाला. वेग मंदावल्या मुळे तो गोष्टींचे निरीक्षण करू लागला. डोंगर वरील शेती, कुंपणापली कडे चरणाऱ्या मेंढ्या, झाडे, फळे फुले आणि खूप काही. त्या मेंढ्याच्या गळ्यात घुंगरू होते आणि एक ताल बद्ध आवाज येत होता. हे सर्व बघत असताना समोरून एक कुटुंब आले. आई – वडील, लहान मुलगी आणि बाबागाडीत बसलेले एक बाळ. लहान मुली कडे खेळण्यातली बाबागाडी होती आणि त्यात एक सुंदर बाहुली झोपली होती. आई – वडील त्या मुलीचे कौतुक करत होते व त्यांचे बाबा गाडीतील बाळा कडे लक्ष नव्हते. त्या बाळा ने मेंढ्यांचे निरीक्षण करणाऱ्या याला पाहिले आणि स्मित हास्य केले. तो ही हसला.  इतरांचे लक्ष नव्हतेच. ते कुटुंब पुढे गेल्यावर  बाबा गाडीतील बाळ  मागे वळून पाहू लागले आणि हात करू लागले. तो ही हसला आणि त्याने हि हात हलवून त्या बाळा ला बाय केले.

 कुत्र्याचे लहान पिल्लू आणि माणसाचे लहान बाळ या दोघांची त्याला गम्मत वाटली. जगण्यातील एकसुरी पण घालवण्या साठी मोठ्या घटनांची जरून नसून काही क्षण पुरेसे असतात.

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.