मंगलयान ( Mars Orbiter Mission किंवा MOM), च्या यशा नंतर सोशल मिडिया वर सगळी कडे “भारतीय असल्याचा अभिमान” चे जाहिरीकरण भरपूर झाले. तसे ते अनेक वेळा होत असते, पण प्रमाण थोडे असते. असो.
श्री कैलाश सत्यर्थी यांना शांतते साठी चा नोबेल पुरस्कार जाहीर झाला, तो दोघां मध्ये विभागून असला तरी त्याचे महत्व कमी होत नाही. जो पुरस्कार गांधीजींना मिळाला नाही ( त्याची कारणे अनेक होती ), तो सत्यर्थी यांना मिळाला. वर कारणी एका भारतीयला हा पुरस्कार मिळाला याचा अभिमान वाटायला हवा. हा पुरस्कार मिळण्या मागील कारण म्हणजे त्यांनी स्वतंत्र भारतात असलेली गुलामगिरीची प्रथा नष्ट करण्यासाठी केलेले सखोल कार्य. विशेष करून लहान मुलांना गुलामगिरीतून सोडवणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे. त्यांनी सुरु केलेला लढा गेली तीस वर्षे चालू आहे.
भारताला स्वतंत्र मिळून ६७ वर्षे झाली. भारतात बाल कामगार कायदा अस्तित्वात आहे. पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. लहान मुलांना विशिष्ट उद्योगांसाठी गुलामा सारखे राबविले जाते. कागदोपत्री प्रत्येक जण स्वतंत्र आहे. पण खरे चित्र तसे नाही आहे. कुटुंबच्या कुटुंब वेठबिगार म्हणून ठेवली जातात. जो त्यांच्या विरुद्ध आवाज उचलतो त्याला संपविले जाते.
हि अराजकता कशी शक्य आहे या internet आणि mobile च्या युगात. जेंव्हा लहान सहान वस्त्यान पर्यंत दळण वळणाची साधने पोचली आहे. खेड्या पाड्यात ग्राम पंचायती कार्यरत आहेत. आपण कसा विश्वास करावा की शेतावर, वीटभट्टीवर आणि कारखान्यात काम करण्यासाठी एक ना दोन पण कुटुंबची कुटुंब वेठीस धरली जातात. त्यांच्या वर नको ते अत्याचार होतात आणि त्यांना दाद मागता येत नाही. हे सर्व सरकार (स्थानिक प्रशासन), पोलीस, मीडिया आणि राजकारणी यांना माहीत नव्हते या वर विश्वास बसेल का?
एका रिपोर्टनुसार … about 28 million children ages 6-14 are working in India, according to UNICEF, the U.N. children’s agency. Satyarthi’s organization, called Bachpan Bachao Andolan, or Save the Children Mission, is credited with freeing 70,000 of them.
सत्यर्थी यांना पुरस्कार कोणत्या संशोधनासाठी मिळाला असता तर आपण ठामपणे पुन्हा एकदा आपल्या जाज्वल्य अभिमानाचे प्रदर्शन करू शकलो असतो. पण सत्यर्थी म्हणतात,
“Most of us knowingly or unknowingly use products made by children under exploitative and inhuman conditions.”
एका भारतीयाने अश्या वाईट पद्धती विरुद्ध पुकारलेल्या लढ्यासाठी, त्याला हा पुरस्कार मिळाला आता याचा अभिमान वाटावा कि स्वतःची लाज हे “विचारी मना तूचि शोधूनि पाहे”.
संदर्भ: