रविवार सकाळ + गांजलेली कांता + कडवेकर मामी … अजरामर

सध्या कामचे व्याप जास्त असल्याने लिहिणे तसे जमत नाही. वर्ष अखेर म्हणजे डेड लाईनचा मारा. त्यात पुढच्या वर्षा साठी काही सबमिशन्स असल्याने कामात “exponential” वाढ. चालायचे.

क्षीण घालवण्या साठी काय करावे याचा विचार चालू असताना,  पु. ल आठवले आणि “वाऱ्यावरची  वरात” आणि पुढे “रविवार सकाळ” बघून झाले.  किती हि वेळा पहिले तरी त्यातली  गोडी काही कमी होत नाही. एकदा  पु.ल आणि त्यांचा ग्रुप आणि मग एकदा अरुण नलवडे / चंद्रकांत काळे आणि इतर सोबती.

त्यातला शेवट म्हणजे … ग्रेटच कि हो! ज्यांनी हे पहिले असणार त्यांचे वाचताना आपोआप हेल निघणार.

मां sss मी:  माssssमी म्हणा कि व्हो.

मां sss मी:    ब्लाऊजला हात शिवायच्या आधीच घालायची घाई केली हो एवढी कशाला?

आमचं  बोलणं  असंच , एकदम कंट्री.

वाईच्या जांभेकर भटाची दुर्गी  : … फोर हज्जार पगारावर.

मां sss मी:   ओ म्हणजे यजमान जिवंत असतात कि हो यांचे!

चार हज्जारा ला दोन पैशाच कुंकू महाग का हो …

वाईच्या जांभेकर भटाची  दुर्गी:  oh poor dear, नवऱ्याच्या जीवावर किती दिवस जगणार!

मां sss मी:   मग विलायतेला जायचे ते कोणाच्या जीवावर गं!

ते चार हज्जार मिळवून आणते ते काय येकटेच बसून खाते कि काय!

माल्ताई, जाताना कुंकवाची दोन बोटं  लावा कि हो हिच्या कपाळाला!

हे बघितले आणि क्षीण कसा पळून गेला. सध्या वर youtube नवीन आणि जुने दोन्ही संचानी केलेले प्रयोग उपलब्ध आहेत. वेळ आणि आवड असेल तर करा “enjoy”

” लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी ”

“आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी” …सुरेश भट

 

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s