विचारांची गोधडी भाग २: मार डालाsss

सायबांने आमच्यावर शंभर हून जास्त वर्ष राज्य केल. एक न दोन अनेक कारणांनी आपल्या कडे बऱ्याच  गोष्टी रुजविल्यात, त्यात महत्वाची म्हणजे इंग्रजी भाषा. आणि आता सायबाला जाऊन  साठाहून जास्त वर्षे  झाली तरी या भाषेचे प्रेम कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्यात आम्हा भारतीय लोकांत  ‘confidence’ इतका ठासून भरलेला आहे कि आपण जे बोलतो किंवा लिहितो ते बरोबर कि नाही याची खात्री करावी अशी आम्हांस जरूरच वाटत नाही.

सोशल मिडिया मुळे तर याला आणखीनच उधाण आले आहे. स्पेलिंग म्हणू नका, व्याकरण म्हणू नका, रोज नवनवीन विषय हास्यासाठी मिळतात. काही वेळा मात्र कळस होतो.

पूर्वी एखादी व्यक्ती गेली की ओळखीचे किंवा घरचे पेपरात निधनवार्ता म्हणून द्यायचे, त्याच्या भरी ला आता सोशल मिडिया ही आले आहे. त्यात चुकीचे असे काही नाही, उलट कमी वेळात जास्त लोकांपर्यंत बातमी पोचते.

अरे जिवंत माणसांचे काय हवे ते करा, ते सांभाळून घेतील स्वतःला पण जे एक तर अस्थीत रुपांतरीत झालेत किंवा सहाफूट जमिनी खाली गेलेत त्यांना तरी माफ करा.  ते कसे तर,

  •  कोणी नवीन पोस्ट दिली कि like करायलाच हवे असे गृहीत धरणारे बहाद्दूर अनेक आहेत, ते काही विचार न करता like  देवून मोकळे होतात.
  •  बातमी मराठी, हिंदी किंवा इतर प्रांतीय भाषेत असली तरी इंग्रजीत उत्तर देणारे काही कमी नाहीत. “RIP” चा अर्थ सगळ्यांना माहितच असेल याची मला खात्री नाही. कारण,
  • “RPI” लिहिणारे पण आहेत, एवढी कसली घाई असते, कि typing ची चूक दुरुस्त पण करता येत नाही. पण समजा “editing” जमत नसेल तर कोणाला तरी विचारावे, तर इभ्रत आडवी येते.
  • परवा तर कहरच झाला, RIP चा full form माहित असणाऱ्याने ने लिहिले “Rest in pieces”.

मी कपाळाला हात लावला.

सोशल मिडिया च्या अतिरेकामुळे खरे पाहता सगळ्याच भाषा “Rest in pieces” झाल्यात जमा होतात कि काय याची शंका आल्या शिवाय राहत नाही!

5 thoughts on “विचारांची गोधडी भाग २: मार डालाsss

    • आभार कुणाल, मला जे मना पासून वाटते ते मी लिहिते. आणि लिहिलेले किमान एकाने तरी वाचावे एवढीच अपेक्षा असते. येथे तर प्रतिक्रिया मिळाली. आनंद झाला.
      ‘रू’ बद्द्ल म्हणशील तर “चलता है” 🙂

      Liked by 1 person

  1. हाहाहा…. खरं आहे. लोक निधनाची बातमी पण like करतात. खूपच छान लिहिलयत तुम्ही. लिहित राहा 🙂

    Liked by 1 person

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.