गोधडी भाग १५: आवड निवड (पुस्तकांची)

प्रसिद्ध लेखकांची पुस्तके सोडून नवीन लेखक वाचावे असे बरेच दिवस मनात होते. मनात आले कि लगेच गोष्टी घडतात असे नाही. काही का असेना एक दिवस लायब्ररीत जाण्याचा योग आला. हातात फार वेळ नव्हता म्हणून हाती लागली ती पुस्तके उचलली आणि  नेली प्रवासाला.

पहिले पुस्तक होते रायदा याकूब्स चे आणि पुस्तकाचे नाव “कन्फेशन्स ऑफ ए गेम्ब्लर”. मला ते पुस्तक पचनी पडले नाही. न समजलेले हे काही पहिले पुस्तक नव्हे. तीन मध्यमवयीन स्त्रिया आणि त्यांचे जग. त्यांचे आपापसातील राजकारण, नवरा (टाकून तरी गेलेला किंवा त्या वाटेवर असलेला), मुले व त्यांची लफडी, स्वतः लावून घेतलेले सिगरेटीचे आणि पुढे जुगाराचे व्यसन. या सर्व भोवती गुरफटलेली कथा. या पुस्तकाला दोन पुरस्कार मिळाले आहेत, “संडे टाईम्स फिक्शन एवार्ड” आणि “हर्मन चार्ल्स बोस्मन प्राईस”. कसे आणि कां हे माझा बाल बुद्धी न कळलेली गोष्ट. माझा एक भाबडा समज असा आहे कि पाश्चात्य सोडून दुसऱ्या कुठल्या हि समाजातील चांगली गोष्ट वा  चांगला बदल याला प्रसिद्धी मिळत नाही पण जर का वाईत चाली रिती किंवा कोणत्या ही प्रकारचे शोषण वरील कथा असेल तर भरपूर वाह वाह मिळते.

Advertisements

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s