गोधडी भाग १७: Sexism का?

रोजच्या रुटीन मुळे घरात संवाद कमी होत असले तरी सुट्टीच्या काळात कधी आणि कशा वर किती वेळ चर्चा होवू शकते हे सांगणे कठीण असते.  तर मुद्दा बायकांचे गाडी/वाहन चालवणे.

भारतात आता बायका व्यावसायिक स्वरूपात रिक्षा, टैक्सी, बस, आगगाडी आणि विमान चालवू लागल्या आहेत. प्रमाण मात्र नगण्य असावे. त्या मानाने पाश्चिमात्य देशात हे प्रमाण बरेच आहे. निदान डोळ्याला सहज दिसते.

लोकल बस चालक (मला इतकी वर्षे महाराष्ट्रात राहून चालक आणि वाहक मधला फरक काही कळलेला नाही)  महिला बऱ्याच दिसतात. महिला ट्रक चालवत असतील का? ट्रक चालवणे तसे अवघड असणार ना?

प्रश्न युरेका करत काही मनात आला नाही तर ट्रक चालवणारी बघून उर भरून आले.  जे अवघड काम आपल्याला जमत नाही ते जर दुसरा करू शकत असेल तर आनंद वाटणाऱ्या जमातीची आहे मी.

बरी ती महिला नुसता ट्रक चालवत नव्हती तर तो oil tanker होता आणि मागे एक जादा tank जोडलेला होता.

कारला ट्रेलर लावून चालवणे कठीण असते असे मी अनेक सहकारी कडून ऐकले आहे. त्याचे एक कारण म्हणजे या देशातील बोगदे आणि डोंगराळ भागातील अरुंद रस्ते.  हा तर जोड tanker होता.

हा प्रश्न पडला आणि हा बाल बोध प्रश्न मी मुलाला केला. तुमच्या मुलाने लगेच तुमच्या हो मध्ये हो केले तर हमखास समजावे हॉस्पिटल मध्ये बच्चा बदल गया है. माझा बदललेला नाही.

तो: फार अवघड नसणार शेवटी मशीन ते!

मी: अरे पण मशीन जेवढे मोठे तेवढे वापरताना ताकत नाही का लागणार?

तो: अं अं …  (याला हो समजावे )

मी: म्हणजे या बायकांना ताकत किती असणार?

तो: भारतात  ट्रक बस चालवतात त्यांच्या पेक्षा नक्कीच जास्त. आपल्या कडे बऱ्याच वेळा बस आणि ट्रक चालवणारे कुपोषित वाटतात. (सबसिडी चे जेवण ज्यांना मिळते ते कुपोषित नसतात, आपल्या कडे कामगार वर्गाच्या कुपोषणाचा कोण विचार करतोय.)

( हे निरीक्षण बहुतांश महाराष्ट्रात लक्झरी बसेस जिथे थांबतात, फूड मॉल तत्सम भागात बघितलेले ट्रक आणि बस driver आणि दिल्ली, उत्तरांचल,  हिमाचल भागात लक्झरी बसेस चालवतात ती पोरं ( अक्षरश पोरंच ती), तेंव्हा पंजाब मधील ट्रक driver सरदार चे चित्र डोळ्या समोर आणू नये. )

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s