गोधडी भाग २१: जिंदगी एक सफर है सुहाना (Expedition to Norwegian countryside)

मागील काही आठवडे मराठीतून लिखाण झाले नाही. फोटो घेणे ब्लॉग अपडेट करणे चालू होते पण मनातील काही लिहिता आले नाही. तसे रोज काही न काही लिहिण्या सारखे घडत असते, वाटत (फील होत) असते पण ते कागदवर ( वा कीबोर्ड)  उतरेल असे नसते, त्याला अनेक कारणे असतात, महत्वाचा म्हणजे excuse दुसरे काय.

परवा मात्र एक छान प्रवास घडून आला. प्रवासात जे मी पहिले ते नयनरम्य होतेच पण जे मी टिपले ते देखील काही अंशी share  करण्या सारखे आहे, निदान मला तरी तसे वाटले 😉 तेंव्हा एवढे तरी लिखाण झाले.

नॉर्वेत डोंगराळ भागातील बरेच रस्ते तसे अरुंद आहेत, ही मंडळी बोगदे करण्यात पटाईत आहेत पण काही ठिकाणी अजून बोगदे नसून लहान रस्ते आहेत. काही विशिष्ट रस्ते तर उन्हाळ्यातील काही महिनेच चालू असतात. असो. तर अश्या एका रस्त्या वरून प्रवास करण्याचा योग नुकताच मिळाला. रस्त्याची अवस्था आणि गाडीचा वेग या मुळे फोटोची क्वालिटी खूप चांगली आली नसली तरी समाधान देण्यापात आहे.

प्रवासाची सुरवात आणि सांगता समुद्र सपाटी वर झाली पण वाटेत येताना सर्वात उंच ठिकाण ३३०० फुट वर होते. ही देखील नॉर्वेची खासियत. ३००० फुट असलेल्या तळ्यात अजून काही ठिकाणी बर्फ आहे. तेवढ्या उंची वर मोठी झाडे उगवत नाही तर लहान उंचीची वनस्पती आणि गवत तेवढे दिसते. इथल्या पद्धती प्रमाणे उन्हाळ्याच्या सुरवातीला शेळी, मेंढ्या आणि गायी डोंगरवर सोडतात. चार महिने त्या डोंगर वर राहतात. रस्त्यावर गायी प्रथमच पाहायला मिळाल्या. गंमत  वाटली.

4 thoughts on “गोधडी भाग २१: जिंदगी एक सफर है सुहाना (Expedition to Norwegian countryside)

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.