बस मधील प्रसंग:
दोघे ओळख असलेले बस मध्ये भेटले. ओळख असली तरी काही दिवसाच्या अंतराने भेटत होते. सुरवातीची सगळी चौकशी करून झाल्या वर.
पहिला: काय मग “कट्यार” बघितला कि नाही?
दुसरा: काय?
पहिला: अरे सुबोध भावे चा नवीन सिनेमा “कट्यार काळजात घुसली”? एक दम भारी.
दुसरा: नाही रे, पण वसंतरावांची त्यातली गाणी मला खूप आवडतात.
पहिला: कोण वसंतराव?
माझी सहिष्णुता संपल्याने मी पुढच्या थांब्याला खाली उतरले.