गोधडी भाग ३४: ये कहां आ गए हम

किती दिवस लिहावे म्हणते पण जमत नाही. घर आणि ऑफिस च्या कामा मुळे थकायला होते कि आळस, कळत नाही. ब्लॉग च्या रुपड्यात बदल करावा असा विचार आला आणि जुन्या पोस्ट चाळल्या वर लक्षात आले कि आपण किती दूर आलो आहोत. असे कसे झाले माझे मलाच कळले नाही.

ब्लॉग सुरु करण्यामागे हेतू होता रोज काही बाही लिहावे. सुरवातीला ते जमले. मग कळत नकळत इतर ब्लॉग वाचनात आले. त्यातून फोटोग्राफीची आवड लागली आणि ती वाढतच गेली. नवनवीन शिकायला बाहेर  पडावे लागले. शोधावे लागले. रोज काही नवीन दिसत गेले, ते टिपत गेले आणि गोळा बेरीज होत गेली. फिरायची आवड आणि फोटोग्राफी बहरत गेली पण त्याच्या मुळे लिहिणे लांबत गेले. जे काही लिखाण झाले ते फोटो किंवा फिरण्या संबंधी होते. सभोवताली घडते त्यावर चर्चा होते, मंथन होते पण शब्द रुपात साठवले जात नाही. लौकरच ते पण जमेल अशी positivity बाळगते. असो.

काही चांगले वाचनात आले कि त्याची नोंद व्हावी आणि जर कुणाला आवडत असेल तर त्यांना ही माहिती मिळावी या हेतू ने काही पोस्ट जन्माला आल्या. गेल्या वर्षी दिलेल्या पोस्ट ची लिंक देत आहे.

वेदनेतून सुटका

8 thoughts on “गोधडी भाग ३४: ये कहां आ गए हम

    • धन्यवाद. नक्की वाचीन.
      हे काल Bayern Munich आणि Atlético Madrid ची match सुरु असताना लिहिले होते. तेंव्हा जास्तीचे काही जमले नाही.

      Liked by 1 person

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.