आयुष्य खूप सुंदर आहे…

आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला !
मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते………
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा……
***
– कुसुमाग्रज

गोधडी १०: (शाळेत!) ऑफीसला रोज जाताना मज विघ्ने येती नाना

(शाळेत) ऑफीसला रोज जाताना                                                                                                              मज विघ्ने येती नाना                                                                                                                              कधी पक्षी गाती गाणी    …

मराठीतील निवडक बाल साहित्य “वाचू आनंदे” या पुस्तक संच मुळे  माझ्या पर्यंत पोचले. माधुरी पुरंदरे यांनी संपादित केलेली हि पुस्तके ज्योत्स्ना प्रकाशन ने बाजारात आणली. त्यातील एक पुस्तकात  ना. ग. लिमयेंची ही सुंदर कविता माझ्या वाचनात आली आणि मनात घर करून राहिली. लहान मुलांचे विश्व उलगडून सांगणारी हि कविता आहे.  रोज शाळेत जाणे भाग आहे पण मोहात पाडणाऱ्या इतर अनेक गोष्टी पण सोबत आहेच. तरी शाळेत जाणे काही थांबत नाही.

आता ही कविता आठवायचे कारण “ऑफीसला रोज जाताना मज विघ्ने येती नाना” आणि त्याचे सोपे कारण आहे “कुतूहल”. येथे हवामान रोज बदलते. त्यामुळे रोज रोज दिसणाऱ्या गोष्टी पण वेगळ्या दिसतात. वर बदलत्या मौसम मुळे यात भरच पडते. रोज ऑफीसला जाताना वाटेत ठराविक लोक दिसतात. काही एकटे तर काही कुणा सोबत. प्रत्येकाची भेटायची आणि लपायची ( वाटेतून हटायची ) जागा साधारण ठरलेली असते. गम्मत म्हणजे ही भेट तेवढ्या वेळा पुरतीच असते.  या सर्वांमुळे उशीर होत नाही पण ते routine चा भाग होते. तर ही झाली माणसांची भेट.

वाटेत लागणारी झाडे सोबत त्यावरील फुले, पाने आणि पक्षी नुसते लक्ष वेधत नाही तर त्यांच्यात एक ओढ असते. काही केल्यास दुर्लक्ष करणे कठीण असते. यात भर पडते ती पाणी आणि आकाशची. या सर्वांनी केलेली माझ्या विरुद्ध ची “conspiracy” जणू. रोज मी असे “निरीक्षण” कां करते?  ऑफिसला पोचायची इतर साधने असताना ही मी रोज कां चालते? याला उत्तर नाही!  काही जणांना वाटते बापरे मी रोज कसे एवढे चालते. आणि ते सुद्धा ऑफिसला जाताना आणि येताना. नियमित फिरायला जाणारे खूप असतात पण ऑफिसला चालत जाणारे जरा कमीच सापडतात.  थोडक्यात मला ते आवडते. धो धो पाऊस असताना, जबरदस्त वारा असताना देखील वाटेतील गोष्टी मला आनंद देतात. अमुक तमुक झाडाला पालवी आली असेल, कळीचे फूल झाले असेल, पक्षी आज घरट्यात असतील की नाही, समुद्र शांत असेल का, अश्या अनेक गोष्टींची उत्सुकता माझा रोजचा प्रवास interesting करते.

हल्लीच एका ब्लॉग वर वाचलेले आठवते, “एका विमान प्रवासात ढगा वरून सूर्योदय  पाहिल्या पासून माझ्या डोक्यात एक किडा शिरला आहे, सूर्योदय पाहायला मिळणार असेल तर विमानातील सीट निवडून घेतो”. आवडी निवडी अशाच पद्धती ने नकळत आपल्या जीवनाचा भाग बनतात.

तर ऑफिसला जाताना विघ्ने आणणाऱ्या गोष्टींचे मी फोटो देत आहे.

परि उशीर टाळायला                                                                                                                                    मी निघे तडक ऑफीस ला!

I have taken these pictures on my way to office.

गोधडी भाग ८: रानफुलें (Wildflowers)

You belong somewhere you feel free ~Tom Petty

निसर्गावर जेवढे लिहावे तेवढे थोडे. वेगवेगळ्या ऋतू वेगवेगळे रंग उधळतात. निसर्ग निरीक्षण करण्यातला आनंद काही औरच असतो. येथे प्रत्येक पान नि फूल वेगळे असते. लहान सहान गोष्टींच्या पण असंख्य छटा. गवताच्या लहानश्या पाती पासून थेट मोठाले वृक्ष सगळे आपले लक्ष वेधून घेतात. अर्थातच त्याची आवड मात्र लागते.   किंवा असे म्हणू ती आवड निर्माण करावी लागते.  जसे जसे आपण निसर्गाशी एक रूप वहायला शिकतो तसे तसे आयुष्यातील ताण तणाव आपसूप कमी होत जातात.

वाट कोणती असो, वस्ती कोणती असो, हवामान कोणता हि असो, जेथे झाडे तेथे पक्षी आणि हे दोन्ही असल्यास, eye tonic तर मिळतेच वर आनंद आणि भरून पावल्याचे समाधान. बस “नजर” हवी. तर सध्या येथे वसंत असल्याने, झाडांना पालवी फुटत आहे, इवले इवले रोप पण आपल्या फुलां सकट डोलू पाहतायेत. दुकानातील फुले सुरेख असतात पण त्याहून ही सुरेख असतात ती “रानफुलें: मनस्वी आणि मुक्त”.  जेंव्हा अधून मधून सूर्य देवता दर्शन देतात, त्या किरणात समस्त जीव (माणूस, जनावरे आणि वनस्पती ) उजळून निघतात. सगळे स्मित हास्य देत आहेत असेच वाटते. अश्याच दिवशी घेतलेल्या या काही तस्वीरी.

 

There are always flowers for those who want to see them ~Henri Matisse

तुमची गौरी शोधा पाहू!

india_1_15

हल्ली प्रत्येक सण गाजा वाजा करून साजरा केला जातो. पूर्वी सुद्धा सण साजरे होत असत पण त्यात भक्ती अधिक आणि दिखावा कमी होता. आता म्हणजे  “उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसी” च्या नादात भक्ती लोप पावली आहे. गणपती पेक्षा त्याची आरास महत्वाची वाटते.  आपले सण उपचार तर होत नाही ना!

दिलेला फोटो एका नदी काठी काढलेला आहे. कदाचित नदी स्वच्छता मोहिमेत हे सर्व बाहेर आले असावे. पण पुढे काय करावे हे न समजल्या मुळे, रस्त्यालगत झाडा खाली आसऱ्या ला आल्या.

नाताळची पूर्व तयारी: Juleverksted (Christmas workshop )

jul_2014_1

काल Advent Sunday होता, नाताळ आधीचा चौथा रविवार. काल  पासून नाताळ साठीची दिवे लावणी (प्रामुख्याने वेग वेगळ्या रंगातील मेणबत्या ) सुरु झाली आहे. तसे पाहता नोर्वेजिअन धार्मिक नाही पण सण मात्र उत्साहाने साजरा करतात.

सध्या बऱ्याच ठिकाणी,  शाळा आणि ऑफिस सुद्धा,नाताळ आधीचे वर्कशॉप सुरु आहे.                jul_2014_3                   त्याला येथे juleversted (jul (Chirstmas ) + verksted (workshop) ) असे म्हणतात.

सामील होणाऱ्यांचे स्वागत, गरम gløgg (mulled wine) ने केले जाते.  खायला रीस्ग्रोत  (risgrøt) असते. थोडक्यात दुधात शिजवलेला भात,  तो लोणी, साखर, दालचिनी पूड आणि बेदाणे घालून खातात. खाणे पिणे आवरल्या वर मग क्राफ्ट वस्तू तयार करतात. त्यात प्रामुख्याने pepperkake (ginger bread ) तयार करतात. इतर शोभेच्या वस्तू देखील तयार करतात.  ही असते नाताळची पूर्व तयारी.

jul_2014_2The risgrøt photo is from google.

 आवड असल्याच हे पण पाहा : बिस्किटांचे गाव (pepperkakebyen)!)

डायरीचे पान – Happiness

It is not how much we have, but how much we enjoy, that makes happiness.
~ Charles  Spurgeon 

सगळे आहे म्हणून कोणी आनंदी होत नाही तसेच सगळे नाही म्हणून आनंदी होता येत नाही असे नाही. आनंदाचा क्षण आपण ओळखला की झाले.

प्रसंग एक:

तो हल्ली नियमित फिरायला जातो. सध्या हवा बरी असल्याने बरेच जण फिरायला बाहेर पडतात, कोणी एकटे, कोणी कुटुंब सह. गर्दी आपल्या कडे भारतात असते तशी मुळी नाहीच, म्हणाल तर तुरळक, पण बर्फात चीट पाखरू दिसत नाही. तसे काही नाही. या काळात चिऊ ताई देखील आपल्या फौजे सह दिसते.

 वाट नेहमीची असल्याने तो बराच सरावाला आहे आणि त्यात आयपॉड वर गाणी. तो जणू आपल्याच दुनियेत वावरत असतो. परवा, एक लहान ब्रिज ओलांडताना, त्याच्या लक्षात आले कि एक म्हातारे जोडपे मधेच उभे आहे आणि खाली पाहून कश्या बद्दल चर्चा करतायेत.  त्या दोघांचे दुसरी कडे मुळीच लक्ष नव्हते. म्हातार्याच्या हातात, दोरी होती. दोरीच्या  दुसऱ्या टोकाला कुत्र्याचे एक लहान पिल्लू होते. त्या तिघां मुळे  रस्ता/फुटपाथ अडला होता.  त्याने वेग मंदावला, तो चाचपणी करू लागला, जर गाडी येत नसेल तर आपण थोडे रस्त्या वरून चालावे का? असा विचार करत असताना एक गम्मत झाली. बरे ते म्हातारे जोडपे, जणू या जगातच नव्हते. त्यांचे संभाषण चालूच होते.  लहान पिल्लू ने याच्या कडे पहिले आणि ते अलगद जागा सोडून ब्रिज च्या रेलिंग च्या बाजूस गेले. एका लहान मुलाने बाजू ला होऊन वाट करून द्यावी अगदी तसे.   तो हसला आणि पुढे गेला, त्याने मागे वळून पहिले,  त्या पिल्लू चे लक्ष आता दुसरी कडे होते. याला मात्र गम्मत वाटली.

प्रसंग दोन:

नेहमीच्या वाटेने न जाता आज तो डोंगरा वर चालत गेला. बरेच वर चढून गेल्या वर त्याचा चालण्याचा  वेग कमी झाला. वेग मंदावल्या मुळे तो गोष्टींचे निरीक्षण करू लागला. डोंगर वरील शेती, कुंपणापली कडे चरणाऱ्या मेंढ्या, झाडे, फळे फुले आणि खूप काही. त्या मेंढ्याच्या गळ्यात घुंगरू होते आणि एक ताल बद्ध आवाज येत होता. हे सर्व बघत असताना समोरून एक कुटुंब आले. आई – वडील, लहान मुलगी आणि बाबागाडीत बसलेले एक बाळ. लहान मुली कडे खेळण्यातली बाबागाडी होती आणि त्यात एक सुंदर बाहुली झोपली होती. आई – वडील त्या मुलीचे कौतुक करत होते व त्यांचे बाबा गाडीतील बाळा कडे लक्ष नव्हते. त्या बाळा ने मेंढ्यांचे निरीक्षण करणाऱ्या याला पाहिले आणि स्मित हास्य केले. तो ही हसला.  इतरांचे लक्ष नव्हतेच. ते कुटुंब पुढे गेल्यावर  बाबा गाडीतील बाळ  मागे वळून पाहू लागले आणि हात करू लागले. तो ही हसला आणि त्याने हि हात हलवून त्या बाळा ला बाय केले.

 कुत्र्याचे लहान पिल्लू आणि माणसाचे लहान बाळ या दोघांची त्याला गम्मत वाटली. जगण्यातील एकसुरी पण घालवण्या साठी मोठ्या घटनांची जरून नसून काही क्षण पुरेसे असतात.

The longest road tunnel in the World

Lærdal Tunnel in Norway

जगातील सर्वात लांब भुयारीमार्ग/ बोगदा (road tunnel)                                                                      lærdaltunnel3नॉर्वेत असून तो २४. ५१ कि. मी. चा आहे. हा बोगदा ल्यारदाल (lærdal) आणि औरलांद (Aurland) या दोन गावांना मध्ये आहे.  ह्या बोगद्याला तयार करायला ५ वर्षाचा कालावधी लागला असून यातील रस्ता दुपदरी आहे. हा बोगदा तयार करण्यासाठी २५,०००,०० क्युबिक मीटर दगड काढावा लागला.

                                                                             lærdaltunnel2बोगदाची रचना करताना वाहन चालकांच्या मानसिकतेचा  अतिशय अचूकपणे विचार केला आहे. बोगदाला चार भागात विभागले आहे आणि प्रत्येक दोन भागात एक मोठी गुहा तयार केली आहे. त्या गुहा मध्ये जामळट- निळसर रंगाची प्रकाश व्यवस्था असून कडेला पिवळट प्रकाश आहे. सूर्योदयाचा भास होण्यासाठी. वाहन चालकांचा कंटाळा घालवण्यासाठी आणि थोडा उत्साह येण्यासाठी  आणि तसेच आपण एका ठिकाणी बंदिस्त आहोत (claustrophobia), असे वाटू नये म्हणून हा सर्व खटाटोप. हे चोवीस किमी अंतर कापायला साधारणपणे २० मिनिट लागतात, आत वेग मर्यादा आहे आणि ती पाळली जाते. बोगदात हवा खेळती राहावी याची व्यवस्था देखील आहे. जगातील दुसरा सर्वात लांब बोगदा चीन येथे आहे.

The longest road tunnel in the Worldis called “Lærdal Tunnel” is a 24.51-kilometre tunnel conencting Læardal and Aurland in Norway. Detailed information is given on Lærdal Tunnel information page.