मुखवटे!

आज पूर्ण तीन आठवड्या नंतर लोकसत्ता चाळायला मिळाला, e-editionच पण असो. महत्वाच्या बातम्या कळत होत्या पण पेपर हाताळायचे सुख नव्हते.

खरे तर ग्रीस सफर बद्दल हि लिहायचे आहे पण आत्ताच नको. तर, पेपरातले  आवडलेले पहिले वाक्य “स्पष्ट बोलण्याने नाराजीचा टॅक्स भरावा लागतो.”

शंभर टक्के खरे आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला कोणी प्रश्न विचारतो/ते. उत्तर आपेक्षित असलेले दिले कि स्वारी खूष. नाही तर थोडी अस्वस्थता जाणवते. पण मग लोक प्रश्न कां विचारतात. तो ही एक प्रश्नच आहे.

नेहमी उत्तरे देणे टाळता येत नाही. आणि म्हणून “तो टॅक्स वाचवण्यासाठी हा मुद्दा सोडून देऊ.”, पेपरात दिलेले वाक्य आपण अमलात आणू शकत नाही.

या वाक्य प्रेमातून बाहेर पाडायला अग्रलेख जवाबदार ठरले, अर्थातच ते  वाचले म्हणून हे घडले, अग्रलेखातील उतारा देत आहे,

“परवा, कल्याणहून पनवेलकडे जाणाऱ्या एका एसटी बसगाडीच्या वाहक महिलेला एका मुजोर गुंडाने भर रस्त्यात, प्रवाशांच्या देखत अमानुष मारहाण केली. बसमधील सारे प्रवासी मात्र, उघडय़ा डोळ्यांनी थंडपणे हा सारा प्रकार पाहत बसून राहिले. एका असहाय तरुणीवर ओढवलेल्या अशा प्रसंगाच्या वेळी कोणत्या पराभूत मानसिकतेमुळे प्रवाशांचे हात बांधले गेले होते?”… “‘त्या हैवानापेक्षाही, बघ्यांची भीती वाटते’, या त्या असहाय तरुणीच्या उद्विग्न उद्गारांनंतर, आता, प्रत्येकालाच शरमही वाटू लागली असेल.”

येथे कोणी कोणाला प्रश्न विचारला नाही, पण प्रत्येकाने तो स्वतास विचारायला हवा, अश्या वेळी आपण काय करणार.

“मी अण्णा” म्हणून टोप्या घालून फिरणारे खरंच भ्रष्टाचारच्या विरोधात आहे? एखाद्या निर्भयावरील अत्याचारानंतर कॅन्डल मार्च मध्ये भाग घेणारे स्त्री वर वाकडी नजर टाकत नाही? काय खरे आणि काय खोटे…

बैलगाडी शर्यतींवर बंदीच – परंपरेच्या नावाखाली जनावरांचे हाल!!

याच सोबत विविध प्राण्यांच्या टकरी कधी बंद होणार का?
आणि कोट्यावधी रुपयांचा उलाढाल असलेल्या घोड्यांच्या रेस चे काय? घोडे सुटकेचा श्वास कधी घेणार?

बैलगाडी शर्यतींवर बंदीच!

‘प्रत्येक प्राण्याला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे,’ असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी बैलगाडी शर्यतींवर बंदी आणली. प्राण्यांच्या हक्कांची संकल्पना व्यापक करतानाच या हक्कांना घटनात्मक अधिकारांचा दर्जा देण्यासाठी संसदेने प्रयत्न करावा, असा सल्लाही सर्वोच्च न्यायालयाने दिला.
सर्वोच्च न्यायालयाचे न्या. के. एस. राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने जल्लीकटू येथील प्रसिद्ध बैलगाडी शर्यतींची प्रथा चुकीची ठरवताना प्राण्यांचे हाल थांबविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याच्या सूचना सरकार आणि पशू कल्याण मंडळाला केल्या. ‘जल्लीकटू असो, तामिळनाडू असो की महाराष्ट्र असो देशात कोठेही बैलांचा वापर शर्यतींसाठी करता येणार नाही,’ असे खंडपीठाने स्पष्ट केले.
‘प्रत्येक सजीवाला शांतपणे जगण्याचा आणि मारहाण, लाथाडणे, अतिवापर करणे, छळ करणे, जास्त माल लादणे यांपासून स्वत:चे संरक्षण करण्याचा अधिकार आहे. मानवी जीवन प्राण्यांसारखे नाही, असे आपण नेहमी म्हणतो. मात्र, हा नरकेंद्री विचार असून प्राण्यांनाही स्वत:चा सन्मान आणि किंमत आहे, हे आपण सोयीस्करपणे विसरतो,’ असे मत खंडपीठाने मांडले.

 

Animal rights activists hail ban on jallikattu

Jallikattu is a rural sport of bull fighting in Tamil Nadu, India

हापूस + निर्यात = फुस्स = व्यावसायिकतेचाचा आभाव!

युरोप दर वर्षी अंदाजे ४०० करोड (४bn ) US$ किमतीचे फळ, भाज्या, आणि इतर शेती उत्पादने भारतातून आयात करते. या वर्षी पासून युरोपिअन संघाने भारतातून येणाऱ्या आंबा आणि चार भाज्या वर बंदी घातली आहे. हि बातमी प्रसिद्ध झाल्या पासून (१ मे  २०१४) जवळ जवळ प्रत्येक पेपर मध्ये या वर चर्चा झाली.

Destroying Mango
Destroying Mangoआयात करते. या वर्षी पासून युरोपिअन संघाने भारतातून येणाऱ्या आंबा आणि चार भाज्या वर बंदी घातली आहे. हि बातमी प्रसिद्ध झाल्या पासून (१ मे  २०१४) जवळ जवळ प्रत्येक पेपर मध्ये या वर चर्चा झाली.

भारता कडून दिले गेलेले पहिले उत्तर होते “आमच्या कडील नियम अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया पेक्षा कठोर असून ते अमलात आणले जातात”.  हे उत्तर कशाच्या आधारावर दिले गेले कुणास ठाउक.

इंग्लंडच्या संबंधित कार्यालय ( Deapartment for environment, food and rural affairs (DEFRA)) कडून मिळालेल्या माहिती वरून, या बंदी मागील कारण आहे “फळमाशी” चा प्रादुर्भाव. या फळमाशी चे इंग्रजी मधील नाव आहे “tobacco whitefly”. ही फळमाशी युरोपात सापडत नाही, EU मधील देश या फळमाशी पासून संरक्षित आहेत.

मागील अनुभवातून इस्राईल येथे या माशीमुळे टोमेटो चे १००% पीक नष्ट झाले आहे. या माशीचा इंग्लंड मधील शिरकाव येथील पिकांसाठी हानी कारक आहे. या माशीमुळे इंग्लंडचे सलाड (salad) चे पीक सहज नष्ट होऊ शकते. पुढे असे हि सांगण्यात आले कि जे दोन लॉट (consignments) जप्त करण्यात आले होते त्यावर उष्ण वाफेचे फवारे देऊन सुद्धा या माशीचा प्रादुर्भाव नष्ट नाही करता आला. याच्या वरून प्रादुर्भावचे गांभीर्य लक्षात येते.

EU संघा ने स्वतः चे अंतरीम पीक जोपासण्यासाठी ही बंदी घातली. पण आमच्या कडे पूर्ण परिस्थिती लक्षात न घेत अर्थ लावला गेला आणि जो तो उठ सूठ आम्ही कसे सच्चे याची ग्वाही देऊ लागला. हा आमचा एक मोठा दुर्गुण आहे, न विचारता हि काही देणे, सल्ला पासून शुभेच्छा पर्यंत. मला आठवते रसायन शास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळविलेले श्री वेंकटरामन रामकृष्णन नी लोकांना निवेदन केले होते कि “please do not send me best wishes and well done messages.” कामाचा वेळ असले मेसेज डिलीट करण्यात घालवावा लागत होता. असो.

आंबाला युरोपात बंदी या बातमीवर काही ठिकाणी काही सुशिक्षित /उच्चशिक्षित (अडाणी माणसाला असले timepass करायला वेळ आणि साधन दोन्ही नसतात) वाचकांनी नोंद केलेली कि चला आता आम्हाला  वाजवी दारात हापूस मिळणार. आश्चर्य म्हणजे या अतिशिक्षितवर्गा  कडून स्वतः च्या आरोग्याची अशी किंमत लावली गेली. शिक्षण व्यवस्थेचे अपयश, दुसरे काय म्हणावे.

एका बातमीत असे म्हटले होते कि ” युरोपने ही बंदी तातडीने उठवावी, यासाठी केंद्र सरकारचे शिष्टमंडळ चर्चेला जाणार आहे. या शिष्टमंडळात महाराष्ट्र सरकारचे अधिकारी असावेत, अशी भूमिका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली आहे.”

दुसरी कडे, “भारताने युरोपातून येणाऱ्या चॉकलेट, वाइन व स्कॉच यांच्या गुणवत्तेबाबत विचारणा करून त्यासाठी मानके पूर्ण करण्याचा आग्रह धरला होता, त्याला प्रत्युत्तर म्हणून सूडभावनेने युरोपीय संघाने ही बंदी लादली असावी असा तर्क केला जात आहे. भारतातून येणाऱ्या विविध प्रकारच्या मालाबाबत वेळोवेळी इशारा देऊनही भारताने त्याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही, त्यामुळे बंदीसारखा अंतिम उपाय करणे भाग पडल्याचे युरोपीय संघाचे म्हणणे आहे.”

आज ची बातमी आहे,

“हंगामापूर्वीच हापूस आंबा बाजारात आणण्यासाठी बागायतदार कल्टार ऍसिडचा वापर करत असल्याची आणि व्यापारी त्यांना प्रोत्साहन देत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. युरोपमधील हापूस बंदीलाही हाच प्रकार कारणीभूत ठरला आहे. या रसायनाच्या वापरामुळे आंब्यांच्या बागाही धोक्‍यात आल्या आहेत. “

“हंगामात पहिल्यांदा बाजारात येणाऱ्या हापूसला चांगला भाव मिळतो. तो बाजारात आणण्यासाठी आंबा बागायतदार आणि व्यापारी यांच्यात चढाओढ सुरू होते. मग त्यासाठी काही शेतकरी कल्टार ऍसिडसारख्या रसायनाचा वापर करतात. यामुळे मोहोर आणि फळे लवकर येतात, परंतु त्याचा विपरीत परिणाम झाडांवरही होतो. त्याची प्रतिकारशक्ती कमी होते. यामुळे आंब्याला फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. तोच युरोपियन देशातील आंबाबंदीला कारणीभूत ठरला आहे. एरवी मार्च किंवा एप्रिलमध्ये हापूस आंबा बाजारात यायचा; मात्र काही वर्षांपासून तो जानेवारी आणि फेब्रुवारीतच बाजारात दिसत आहे. याला कल्टार ऍसिडचा वापर कारणीभूत आहे, असे नारायण शिंदे या आंबा व्यापाऱ्याने सांगितले.”

इतर देशांने नाकारलेला आंबा टिकवून तो आपण खावा की नाही हे सर्वस्वी आपणच ठरवायचे आहे. पूर्वी family doctor सांगायचे कि फळे त्या त्या हंगामात खावी पण आता रासायनिक फवारणी मुळे ती वर्षभर मिळतात, त्यांना चव असते कि नाही हा विषय निराळाच, पण ती खाण्या योग्य असतात का? फळावर लावण्यात येणारे wax (मेण ) आरोग्यास अपायकारक असते का? लहान मुलांना हल्ली वरचेवर सर्दी होते, ती आजारी पडतात आणि काही थेट दवाखान्यात admit होतात याला करणे अनेक कारणं असली तरी या असल्या फळांचे सेवनाचे काय?

शेवटी एवढेच म्हणीन

Discontent, blaming, complaining, self-pity cannot serve as a foundation for a good future, no matter how much effort you make. – Eckhart Tolle

Reference:

रोहयो (रोजगार हमी योजना) लाभार्थीमध्ये गोव्याचे मुख्यमंत्रीचे पण नाव!

गोव्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) लाभार्थ्यांमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, सचिन तेंडुलकर, बरोबरच आमिर खान, कपिलदेव, राहुल द्रविड, सौरव गांगुली, युवराजसिंग यांचीही नावे आहेत.

एवढेच नव्हे तर या नामवंतांच्या कुटुंबातील अन्य व्यक्तींची नावेही यादीत असून अमिताभ यांच्या दिवंगत मातोश्री तेजी बच्चन यादेखील या यादीनुसार रोहयो कामांवर राबत आहेत. या सर्वाना रोज शंभर रुपये याप्रमाणे दीडशे दिवसांची मजुरी दिली गेली आहे.

हे सर्वजण गोव्यातील रोजगार हमी योजनेत दिवसाला शंभर रुपये मेहनतान्यावर राबत असतील, अशी शंकाही कुणाला येणार नाही. पण हे ‘गुपित’ माहिती अधिकारातूनच फुटले आहे! राज्याच्या ग्रामविकास विभागाकडूनच ‘गोवा परिवर्तन मंच’ या संस्थेने माहिती अधिकारात ही यादी मिळविली.

आपल्या देशात अनेक प्रकारे सरकारी योजनांचा गैर वापर होतो.  योजनांचा उपयोग पैसे लाटणे एवढाच राहतो.  याचेही उत्तर सोपे आहे, आपल्या देशात गुन्हेगारांना शिक्षा होण्यास खूप विलंब होतो किंवा ते पळवाट शोधून काढतात. मोठा वकील शोधून सुटतात देखील. म्हणून गैर कारभार करणायांची मजल मुख्यमंत्रीचे नाव सामील करण्या पर्यंत गेली आहे.  परंतु हे प्रकार गोव्यात घडत असतील याची साधी कल्पना करवत नाही. शेवटी गोवा हा भारताचाच भाग आहे. हम सब भाई – भाई हैं. राष्ट्रीय एकात्मतेचे उदाहरण म्हणा हवे तर.

पूर्ण बातमी  लोकसत्तेत आली आहे.

आमच्या राज्यकर्त्यांची लाचारी – सत्तेची हाव!

समीर-पंकज भुजबळ, नीलेश-नीतेश राणे, पंकजा मुंडे, पूनम महाजन, मिलिंद देवरा, विश्वजित कदम, lokrang_6april14अमित देशमुख यांच्या वयाएवढी वर्ष पक्षाचं काम केलेले निष्ठावान कार्यकर्ते यांच्या पक्षात आहेत; मग त्यांना डावलून यांना का संधी? सतत निवडणुका जिंकणाऱ्या साहेबांना त्यांच्या पश्चात लोकसभेवर पाठवायला पक्षात आणि मतदारसंघात फक्त ‘सुप्रिया’च लायक वाटते!

आज लोकसत्ते मध्ये डोळ्यात अंजन घालणारा श्री संजय पवार यांचा लेख “कार्यकर्त्यांनी ‘पालख्या’ उचलणे बंद करावे” वाचला. लेखकाचे  विचार १००% खरे आहेत. पण प्रश्न असा आहे कि मुळात हि बाब सर्वसामान्य कार्यकर्ता समजू शकेल का? त्याच्या पर्यंत यातील विचार कसे पोहचतील? सर्वसामान्य कार्यकर्ता हे भुलीचे चक्रव्यू कसे भेदेल?

देशाच्या साठ वर्षांहून अधिक काळातल्या आपल्या संसदीय राजकारणात जवळपास सर्वच पक्षांत ‘तो’ आहे. अगदी कम्युनिस्ट पक्षातही. आणि दिवसेंदिवस अशा कार्यकर्त्यांची परिस्थिती कठीण होत आहे.

सर्वपक्षीय सामान्य, निष्ठावान, जुन्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी एकच निर्णय करावा. पक्ष कुठलाही असो, नेत्याची मुलं, नातलग किंवा आयाराम-गयाराम यांची अनामत रक्कम जप्त करायची. घराणेशाहीवर बोलणाऱ्यांनी आपल्या घरापासून सुरुवात करावी.आपण साऱ्यांनीच पक्षभेद बाजूला ठेवून सरंजामी रक्ताचे ‘वंशाचे दिवे’ त्यांच्या विरोधात मतदान करून विझवले तरच खऱ्या अर्थाने लोकशाहीची पहाट होईल. तेवढे तरी आपल्या आणि त्या- त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हातात नक्कीच आहे. ‘बदल’ अशाच छोटय़ा छोटय़ा गोष्टींनी होईल. सुरुवात तर करू या!

संपूर्ण लेख अवश्य वाचा कार्यकर्त्यांनी ‘पालख्या’ उचलणे बंद करावे

संस्कृती आणि पारंपरिक कर्मकांड की ‘रॅशनल थिंकिंग?

आज लोकसत्ते मध्ये एक छान लेख वाचला. बरेच दिवस या संदर्भातले वेग वेगळे विचार मनात घोळत होते. लेखिकेचे आभार माझे लिखाणाचे श्रम वाचविल्या बद्दल.

मी येथे मला आवडलेले लेखातील मुद्दे मांडत आहे. पण हा लेख शिकलेल्यांनी अवश्य वाचवा असे मला वाटते. अश्या गोष्टींची चर्चा तरुण पिढीत होणे गरजेचे आहे. महाविद्यालातून अश्या प्रकारचे प्रबोधन झाले तर खूप प्रश्न आपसूप मिटतील.

  • सणावारांबद्दल असं सांगितलं जातं की अमुक निमित्तानं लोक जमतात, तमुक निमित्तानं माणसं भेटतात. सगळय़ांच्या भेटी होतात. पण ती सगळी निमित्त धर्माशी निगडित, धार्मिक असणं हे शंभर वर्षांपूर्वी ठीक होतं. नव्हे योग्यच होते, पण आता तर या काळात साध्या कारणांनीसुद्धा सारखी गेट टुगेदर होत असतात.
  • पूर्वीचे सणसमारंभ, रीतीभाती, परंपरा या त्या काळच्या समाजाला एक बांधीव स्वरूप देण्यासाठी पूर्वजांनी निर्माण केल्या. प्रत्येकामागे निश्चित असा वैज्ञानिक दृष्टिकोन पूर्वजांनी ठेवला असणारच, परंतु तो दृष्टिकोन नंतरच्या पिढय़ांना फारसा कुणी शिकवला नाही. रीतीभाती, परंपरांना पापपुण्याच्या कल्पना चिकटवून समाजाला फक्त धाक दाखवला गेला. तो धाक पिढय़ान्पिढय़ा ‘पोसलाही’ गेला.
  • रीतीभाती-लग्नकार्यातले विधी, कधीही एकमत न होणाऱ्या व्रतवैकल्यातल्या गोष्टी आणि सर्वात शेवटी चाललेली कर्मकांडं, सध्याच्या काळात या सगळय़ाला आलेलं उत्सवी स्वरूप.. हे सगळं प्रचंड गोंधळात टाकणारं आहे. बरं हे सारं यथासांग करणारी मंडळी आपापल्या सोयीप्रमाणे ती कर्मकांडं बदलत राहतात. आणि समोरच्याला मात्र त्यातला अट्टहास समजावून (धमकावून )सांगतात.
  • चांगला नवरा मिळावा, चांगलं घर मिळावं, मुलगा व्हावा, धनधान्य, वैभव मिळावं म्हणून व्रतवैकल्य करणं आणि कडक उपास करणं हे आजही कित्येक आई आणि सासू यांच्यासाठी महत्त्वाचं ठरतं आहे. आणि ते केले नाहीत तर त्यांना ते ते मिळणारच नाही, अशी सोयीस्कर समजूत घालून आजही अनेक तरुणींवर ते लादलं जातंय.
  • संस्कृती टिकवण्यासाठी सुसंस्कृत विचारसरणी आवश्यक आहे. एकमेकांना समजून घेणं, एकमेकांमध्ये सुसंवाद असणं आणि सोयीप्रमाणं आपल्या कुटुंबाची रचना ठेवणं हे जास्त आवश्यक आहे.
  • ‘लग्न’ या प्रकारात तर सध्या साधेपणा म्हणजे कोणतं तरी पाप असण्यासारखं पिसाटासारखे खर्च होताना दिसतात.
  • रीतीभाती, अंधश्रद्धा, अंधविश्वास यांना आपलं आपणच आम्ही बांधून घेतलं आहे. आणि तिथेच घुमतोय सारखे.. पिंगा ग बाई, पिंगा ग बाई पिंगा.. कुणी डोळसपणानं पुढे जात असेल तर त्याला टोमणे मारून मारून मागे ओढायचं आणि घ्यायचं या खेळात पुन्हा घुमायला. आणि आसुरी आनंदानं पुन्हा त्या दिशाहीन, परंपरांचा पिंगा घालायला लावायचं. पिंगा ग बाई, पिंगा ग बाई पिंगा..

 

संपूर्ण लेख येथे सापडेल पिंगा ग बाई पिंगा..

अंधश्रद्धा आणि निवडणूक!

सावधान!  ज्यांची स्वतः ची प्रगती झाली नाही ते तुमची आमची प्रगती कशी साधणार.

puran2

मूळ बातमी सकाळ च्या कोल्हापूर edition  मध्ये कोल्हापूर टुडे येथे पान ८ वर दिली आहे. लिंक