स्वतःच्या वीस वर्षाच्या मुलाला सबंध दिवस अभ्यासाच्या टेबलाजवळ पाहून जे कोणत्या ही सामान्य आईला वाटेल अगदी तसेच मला वाटते. ना राहून शेवटी मी चाचपडत प्रश्न विचारला, उद्या परीक्षा आहे का?
उत्तर आले “नाही”.
मग!
अभ्यास आहे, प्री-Ph.D. कोर्सेसचे सबमिशन आहेत आणि पुढच्या वीकएंडला एक कॉन्फरन्स आहे त्याचे प्रेझेन्टेशन तयार करायचे आहे.
काय ना, “क्षण तो क्षणांत गेला” असे वहायला नको.
आता मात्र मी बोटें तोंडात टाकायची बाकी होते! मी प्रश्न टाकायच्या आधीच म्हणाला, तुला आठवत नाही का, अगं “शत जन्म शोधिताना” मध्ये आहे.
मी सावरकरांना मनातल्या मनात धन्यवाद दिले.
सावरकर, पुलं आणि या सारखे अनेक भौतिक रित्या हयात नसले तरी ते आपल्यातच आहेत. वेगवेगळ्या प्रसंगी त्यांची आठवण निघत राहते आणि मग जाणवते की या थोर माणसांना मरण नाहीं हेच खरे!
tip: मला तो अभ्यास करतोय याचे नवल वाटत नसून त्याला “शत जन्म शोधिताना” आणि पर्यायाने सावरकर लक्षात आहेत याचे कौतुक वाटते!