तुमची गौरी शोधा पाहू!

india_1_15

हल्ली प्रत्येक सण गाजा वाजा करून साजरा केला जातो. पूर्वी सुद्धा सण साजरे होत असत पण त्यात भक्ती अधिक आणि दिखावा कमी होता. आता म्हणजे  “उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसी” च्या नादात भक्ती लोप पावली आहे. गणपती पेक्षा त्याची आरास महत्वाची वाटते.  आपले सण उपचार तर होत नाही ना!

दिलेला फोटो एका नदी काठी काढलेला आहे. कदाचित नदी स्वच्छता मोहिमेत हे सर्व बाहेर आले असावे. पण पुढे काय करावे हे न समजल्या मुळे, रस्त्यालगत झाडा खाली आसऱ्या ला आल्या.

धडकी

सभोवताली घडणाऱ्या गोष्टी आपल्याला बुचकळ्यात (पु.ल. चे वाऱ्यावरची वरातीत हेला सकट). प्रवास करताना सामानासाठी कुली करावा लागला तर त्याला आपण असंख्य सूचना देत असतो. आपले सगळे लक्ष तो कुली आणि त्याच्या हालचालीं वर असते. बरे तो समोर असल्याने आपण त्याला हवे ते सांगू शकतो.

तुम्हाला जर आपल्या वस्तूंची खूप चिंता असेल तर कसला हि प्रवास करा पण विमान प्रवास करू नका आणि समजा केलास आणि त्या वर जर डावी कडील सीटवर असाल तर प्रयत्न करा की विमानातून बाहेर बघणार नाही.

विमानातून बाहेर बघितल्या मुळे ज्यांचे heart weak असेल त्यांना heart attack ची शक्यता १०१% असते. त्याचे कारण, तुमची ती bag जी खरेदी करताना तुम्ही खूप विचार केलेला असतो, बरीच दुकाने फिरून आणि बऱ्याच चर्चे नंतर खरेदी केले असते. बरे तुम्ही तेवढे करून थांबत नसता तर सामान भरताना खूप विचार करून सगळे कसे व्यवस्थित बसवता. तुमची ती bag विमानात ठेवताना आणि त्याहून ती विमानातून बाहेर काढताना airport चा स्टाफ, ती अलगद उचलून (जी bag तुम्हाला खूप जड वाटलेली असते आणि check-in करताना ज्यावर “heavy” चा tag लावलेला असतो.) चेंडू टाकावा अश्या पद्धतीने luggage trolley त भिरकावतात. स्वतः च्या bag ची अशी अवस्था बघण्या साठी काळीज दगडाचे लागते.

नाताळची पूर्व तयारी: Juleverksted (Christmas workshop )

jul_2014_1

काल Advent Sunday होता, नाताळ आधीचा चौथा रविवार. काल  पासून नाताळ साठीची दिवे लावणी (प्रामुख्याने वेग वेगळ्या रंगातील मेणबत्या ) सुरु झाली आहे. तसे पाहता नोर्वेजिअन धार्मिक नाही पण सण मात्र उत्साहाने साजरा करतात.

सध्या बऱ्याच ठिकाणी,  शाळा आणि ऑफिस सुद्धा,नाताळ आधीचे वर्कशॉप सुरु आहे.                jul_2014_3                   त्याला येथे juleversted (jul (Chirstmas ) + verksted (workshop) ) असे म्हणतात.

सामील होणाऱ्यांचे स्वागत, गरम gløgg (mulled wine) ने केले जाते.  खायला रीस्ग्रोत  (risgrøt) असते. थोडक्यात दुधात शिजवलेला भात,  तो लोणी, साखर, दालचिनी पूड आणि बेदाणे घालून खातात. खाणे पिणे आवरल्या वर मग क्राफ्ट वस्तू तयार करतात. त्यात प्रामुख्याने pepperkake (ginger bread ) तयार करतात. इतर शोभेच्या वस्तू देखील तयार करतात.  ही असते नाताळची पूर्व तयारी.

jul_2014_2The risgrøt photo is from google.

 आवड असल्याच हे पण पाहा : बिस्किटांचे गाव (pepperkakebyen)!)

ऐसा भी होता है – अजि मी ” ” पाहिले

गेल्या आठवड्यात कॉन्फरन्स निमित्त एका बड्या हॉटेलात ३ दिवस होते. कॉन्फरन्स त्याच हॉटेलात असल्याने तेथेच राहणे योग्य वाटले. हॉटेल एकदम branded, त्याचे मूळ मालक मोठी विमान कंपनी. अतिशय झकास असे ठिकाण. हा हल्लीचा नवीन ट्रेंड आहे कि कॉन्फरन्सचे आयोजन बड्या हॉटेलात करायचे.

हॉटेल व्यवस्थापक एकदम हुशार, ते हि सोय उत्तम करतात. कुठे काही कसूर नाही. बोट ठेवायला जागाच नाही म्हणा. पैसे मात्र भरम साठ. मी तर म्हणते ऑफीस देते म्हणून ठीक. स्वतः खर्च करून जायचे तर मग कठीण आहे. पूर्वी कॉलेज/ युनिवर्सिटी चे हॉल घेतले जायचे. तिथलाच कॅन्टीनवाला खाण्याचे बघे. नंतर हळू हळू शैक्षणिक सोबत इतर क्षेत्रात पण कॉन्फरन्स/सेमिनार/वर्कशॉप  होऊ लागले.  बदल घडू लागले. असो.

तर मुद्दा असा कि या कॉन्फरन्स मध्ये माझ्या नेटवर्क मधील काही मंडळी पण येणार होती. आमच्या भेटीचे ठरलेले आणि या निमित्ताने आमच्या काही मीटिंग होणार होत्या. पहिल्या दिवशी त्या मंडळीतील दोघे, जे एक जोडपे आहे, ते दिसले नाही. दुपारचे सेशन संपायची वेळ आली. चौकशी केल्या वर जे ऐकले ते माझ्या दृष्टीने नवलच.

तुम्ही ढेकूण बघितले आहेत का? तुमच्या घरी नसतील, कधी पाव्हण्यांच्या घरी, केंव्हा एखाद्या हॉटेलात, केंव्हा असेच कुठे तरी? कसे वाटते ऐकून 🙂

तर त्या जोडप्याला रात्री झोपेत काही चावते असे जाणवले. सकाळी त्यांना ढेकूण सदृश काही दिसले. त्यांनी हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधला. सेवकांची टीम हजर झाली. सर्व तपासल्यावर तेथे एक न दोन पूर्ण ढेकूण कॉलनी सापडली. They were quarantined. थोडक्यात त्या दोघांना खोली न सोडण्याचे फर्मान सुनविण्यात आले. नाश्ता  खोलीत मिळाला. त्यांचे सर्व समान सफाई साठी पाठविण्यात आहे. सगळ्या कपड्यांची special  धुलाई. त्यांची पद्धतशीर सफाई झाली आणि हॉटेल व्यवस्थापनची खात्री झाल्यावर त्यांना दुसरी खोली मिळाली. प्रचंड मनःस्ताप आणि गोऱ्या कातडी वर ढेकूण कंपनी ने जे काही रंग काम केले होते ते सांगण्याच्या पली कढले आहे.दुर्दैव दुसरे काय!

जर रहायची खोली आणि झोपायची जागा नीट आणि स्वच्छ नसेल तर मग चांगल्या नावाचा काय उपयोग. आणि हो खोलीचा दिवसाचा दर जवळ जवळ दोनशे dollar होता. आता हे पोस्ट लिहितांना मी सहज गुगल करून बघितले हॉटेल आणि ढेकूण हे combination तर, result मिळाले,

About 121,000 results (0.54 seconds) ……………

State of mind

खूप लिहावे से वाटते पण लिहायला बसले कि मात्र जमत नाही. हे लिहावे कि ते लिहावे यात गोंधळ होत आहे.
आपण लेखक नाही याची पराकाष्टा ने जाणीव होत आहे.

वीकेंड ला पेपर वाचले कि नुसते भाम्बायला होते.  हे सगळे कसे शक्य आहे असे वाटते. आपला देश चालला आहे म्हणजे देव नक्की असणार याची खात्री पटते. ती अश्या पद्धती ने पटावी हे दुर्दैव आहे.

एका ठिकाणी Paulo Coelho म्हणतो ” I write to empty my mind….”

कदाचित नंतर बैठक लागेल आणि पुढचे सुचेल. जबरदस्ती ने काही गोष्टी साध्य होतात, जसे स्वयंपाक करता येतो.   अभ्यास नाही पण तो करावाच लागतो, पण काही म्हणा लिखाण करता येत नाही.

तरी बरे माझे bread, butter आणि dessert लिखाणा वर अवलंबून नाही. नाही तर आनंदच होता 🙂

Summary: I am lacking  “the art of writing”…

गंमत: इकडे तिकडे चोहिकडे – भाग १

हल्ली पर्यंत वाचनासाठी वर्तमानपत्र, मासिके, नियतकालिके आणि पुस्तके यांचा पर्याय असायचा. आता त्यात भर पडली आहे ती ब्लॉग्सची. वाचावे तेवढे थोडेच अशी परिस्थिती आहे.

काही गोष्टी आपल्या कल्पने पलीकडच्या असतात. मी वाचलेल्या आणि मला नवल वाटलेल्या गोष्टी मी सांगू इच्छिते. सुरवात आज पासून…

एका डच लेखिके ने आपल्या लहानपणीच्या आठवणीत सांगितले, आठवड्यातून एक रात्री जेवताना pancake असायचे. ते त्यावर साखर पेरून खायचे. यात काही विशेष नाही. मी बऱ्याच लोकां कडून हे ऐकले आहे. बहुदा वीकेंड ला pancake असायचे आणि बऱ्याच घरी अजून सुद्धा असतात. लेखिकेच्या  माहेरी, तिच्या लहानपणी रोज रात्री जेवताना सूप असायचे. त्यात रोज बदल असायचा आणि ते पौष्टिक असायचे. सूप साठी आता वापरतात तसे वाडगे (bowl) नसून खोलगट बश्या वापरण्याची त्या काळी पद्धत होती. तर रोज फक्त सूप. आपल्या कडे हॉटेलात असते, तसे पांचट (पुचूक पाणी ) किंवा कॉर्नफ्लावर वापरून करतात तसे नव्हे तर ते सूप म्हणजे पूर्ण आहार, ज्यात भाज्या, कंद आणि मांस (किंवा मासे ) सर्व सामील. ज्या दिवशी pancake असायचे त्यादिवशी जेवताना आधी सूप मिळायचे आणि मग pancake. सूप पिउन झाले कि त्या बशीत pancake  कसे खाणार? पण दुसरी बशी मिळायची सोय नव्हती. कारण आज सारखे डिशवॉशर नव्हते आणि तो मंदीचा काळ असल्याने मोलकरीण देखील नव्हती. तर गंमत अशी कि त्या दिवशी ते बशीचा वापर दोन्ही बाजू ने करत. आधी सूप पियायचे आणि मग बशी उपडी किंवा उलटी करून त्यावर pankake खायचे.

कसे वाटते ऐकून?