More images on “close ups“
Category: हटके
Cee’s Fun Foto Challenge: Colourful Monotones
This is my try, I hope you like it. More “Colourful Monotones” on Cee’s fun foto challenge
तुम्हाला हे चित्र कुठे पाहिल्या सारखे वाटते का?
Weekly Photo Challenge: Reward
Living in a country known for its fjords is in a way rewarding. Moreover, if you go on hiking then it is even more rewarding for body and soul.
More rewards on WPC
Weekly Photo Challenge: Symmetry
Check more entries on WPC
नाताळची पूर्व तयारी: Juleverksted (Christmas workshop )
काल Advent Sunday होता, नाताळ आधीचा चौथा रविवार. काल पासून नाताळ साठीची दिवे लावणी (प्रामुख्याने वेग वेगळ्या रंगातील मेणबत्या ) सुरु झाली आहे. तसे पाहता नोर्वेजिअन धार्मिक नाही पण सण मात्र उत्साहाने साजरा करतात.
सध्या बऱ्याच ठिकाणी, शाळा आणि ऑफिस सुद्धा,नाताळ आधीचे वर्कशॉप सुरु आहे. त्याला येथे juleversted (jul (Chirstmas ) + verksted (workshop) ) असे म्हणतात.
सामील होणाऱ्यांचे स्वागत, गरम gløgg (mulled wine) ने केले जाते. खायला रीस्ग्रोत (risgrøt) असते. थोडक्यात दुधात शिजवलेला भात, तो लोणी, साखर, दालचिनी पूड आणि बेदाणे घालून खातात. खाणे पिणे आवरल्या वर मग क्राफ्ट वस्तू तयार करतात. त्यात प्रामुख्याने pepperkake (ginger bread ) तयार करतात. इतर शोभेच्या वस्तू देखील तयार करतात. ही असते नाताळची पूर्व तयारी.
The risgrøt photo is from google.
आवड असल्याच हे पण पाहा : बिस्किटांचे गाव (pepperkakebyen)!)
गंमत: इकडे तिकडे चोहिकडे – भाग 2
तर या पोस्टचा विषय आहे: फोटोग्राफी
माझ्या सकट या जगात असंख्य ( जगाची लोकसंख्या मोजता आली तरी या छंदा बाबत अचूक माहिती मिळणे अशक्य म्हणून असंख्य ) माणसे असतील ज्यांना फोटोग्राफी आवडते. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या विषयातील फोटो काढायला आवडते. माझ्या सारखे हौशे नवशे करतात प्रयत्न. पण professional फोटोग्राफर चे फोटो बघण्याची मजा काही औरच असते. त्यात ते फोटोशॉपी आणि इतर software चा वापर करत असले तरी काढलेले फोटो काही कमी प्रतीचे नसतात.
मध्यंतरी तान्ह्या बाळांचे फोटो काढण्यासाठी कश्या पद्धती ने आयोजन करावे हे वाचले आणि प्रथम मी उडालेच. असे असते? म्हणतात न हौशे ला मोल नसते. ते खरेच आहे. त्या पोस्ट सोबत दिलेले फोटो खूप सुंदर होते. professional फोटोग्राफर काय काय क्लुप्त्या करत असतील असे जाणविले. असो . तर ते काही दिवसाचे निष्पाप बाळ इतके सुंदर दिसत होते कि भीती वाटली, दृष्ट लागायला नको आणि तिथून या पोस्टचे लिखाण सुचले.
दृष्ट लागणे: कोणे एके काळी घरोघरी मर्फी radio असायचे, त्यावर एका सुंदर गोंडस बाळाचे चित्र होते. नंतर ऐकले कि ते बाळ गेले म्हणजे वारले. तसेच त्याच काळी कपडे धुण्यासाठी “निरमा” नावाचा साबण चुरा वापरला जायचा. त्यावर एका मुलीचे नाचतानाचे चित्र होते. छान फ्रॉक घातलेली गोड मुलगी. ती सुद्धा अचानक गेली, देवा घरी. या बातम्या खऱ्या कि खोट्या याची माहिती नाही. जे नेहमी कानावर पडत असे ते असे कि, दृष्ट लागली दुसरे काय. तेच कशाला घरी आलेल्या पाहुण्यांनी बाळाचे जरा जास्त कौतुक केले आणि ते पाहुणे घरून बाहेर पडण्याची खोटी आणि जर बाळ आजारी पडले तरी तेच, दृष्टं लागली. शेवटी काय तर हेच मनावर बिंबत गेले कि जास्त वाहवाह झाली कि दृष्ट लागते. विशेष करून लहान मुलांना. असो.
त्या पोस्ट मध्ये सांगितल्या प्रमाणे, जर का तान्ह्या बाळाचे फोटो काढायचे असतील तर, शक्य तो त्याला/तिला सव्वा ते दीड तास झोपू देवू नये. जिथे फोटो काढायचे आहे, ती जागा/खोली चांगली उबदार असावी. तुम्हाला घामाच्या धारा लागल्या तरी बेहेत्तर. पण बाळाला आपण उबदार जागेत आहोत याची जाणीव झाली पाहिजे. फोटो काढायच्या आधी खायला/प्यायला मिळाले कि बाळ लगेच झोपणार. मग खुशाल हवे तसे फोटो काढा. घाम पुसत 🙂
दोन्ही फोटो गुगल वरून मिळविलेले आहे. माझे नाही याची नोंद घ्याव.