महिला दिन विशेष – आज की ताजा खबर

स्थान:  पलासिया थाना  इलाका, इंदोर ( इंदूर येथे एका पोलीस चौकी जवळ)  8march14

वेळ: भर दिवसा

एक महिला चार चाकी गाडी चालवत गर्दीतून वाट काढत होती. नेहमी प्रमाणे खूप गर्दी असल्याने  वेग अर्थातच कमी होता. आपल्या देशात सरकारी कामकाज मुंगीच्या गती ने होत असले तरी सर्व सामान्य माणूस मात्र भिर- भिरलेल्या अवस्थेत वावरत असतो  सिग्नल म्हणून नका कि अरुंद बोळ, दुसऱ्यांना overtake करून कधी पुढे जातो असते चालू असते.

अचानक त्या गर्दीत डावी कडून एक जण activa  वरून आला आणि त्या गर्दीत जिथे मुंगीचा जीव ही गुदमरला असता,  त्याने आपले कौशल पणाला लावत गाडीला overtake  करण्याच्या अतोनात प्रयत्न केला. त्या नादात  गाडीची समोरची नंबर प्लेट निघाली.  या मुळे  ट्राफिक थांबले. जे नेहमी होते तेच झाले मागच्यांनी विचार न करता हॉर्न वाजवायला सुरवात केली.  त्याच्या मागे सीट वर असलेल्याने नंबर प्लेट महिलेस दिली. कमीपण घेतले  तर तो “आज का नौजवान” कसा.

activa वाला: क्या मेडम गाडी चलानी नही आती तो क्यू चलाते हो?

(त्याला अर्थातच इतरांचा दुजोरा. अश्या वेळीस public जे बोलते तेच झाले.  सार्वजनिक सल्ला मेडम traffic क्यून रोका है, नंबर प्लेट लागवालो ).

त्या महिले ने नंबर प्लेट  घेतली आणि काही न बोलता पुढे निघाली.  रस्ता मोकळा झाल्यावर, जरा पुढे गेल्यावर,  police station च्या अली कडे त्या activa ला overtake  केले आणि आणि गाडी आडवी लावली.  ती उतरली आणि म्हणाली,

म:  “तुम चलो थाने में ”

activa : मेडम गलती मेरी नही थी. आपकी  थी.

म: ठीक है थाने जाकर देखेंगे. मैं  सीधी आ राही थी. लेफ्ट से overtake तुमने किया .

activa : थाने  जाके क्या होगा मै नंबर प्लेट  लागवा देता हू.  ( म आणि activa  मधील discussion. )

(हे संभाषण चालू असताना त्याचा साथीदार हाथ जोडून गाडीत बसलेल्या दुसऱ्या महिलेस म्हणाला, मेरी कोई गलती नही है, मैं तो पीछे बैठा था. मैने बस गिरी हुई नंबर प्लेट उठा के मेडम को दी थी. मैं  तो इसे कह रहा था  गाडी धीरे चला. आवाज खालच्या पट्टीतला, विनंती विशेष style)

ती  महिला  activa  ची किल्ली काढते पाहून activa  वाल्याने नमते घेतले म्हणाला मेडम  मैं  भागूंगा नाही. आणि थोड्या वेळात  नंबर प्लेट लावून मिळाली. प्रश्न पैशाचा  नसून,  चूक नसताना निव्वळ स्त्री असल्यामुळे होणाऱ्या अन्यायचा आहे.

लक्षात घ्या प्रत्येक दिवस तुमचा असू शकतो जर तुम्ही ठरविले तर  🙂