

For Becca’s Nurturing Thursday
Picture taken when a fight broke out for a piece of bread. I tried my best to caputre the scene but was hard to decide and focus. Thanks to WPC WordPress, for giving me chance to share it with fellow bloggers 😀
Two photographs from street for WPC
Inspired by Becca’s Nurturing Thursday theme.
When in Rome do as the Romans do! Mountain hiking on an ugly day in November
माझ्या लिखाणतून मी अनेक वेळा इथली माणसे (नोर्वेजिअन) आणि त्यांचे जीवन या बद्दल सांगते. हेतू एवढाच की एका सर्वसामान्यच्या नजरेतून तुम्हाला ही ते पाहता यावे. येथे कामाच्या वेळात आम्हाला आठवड्यातून दोन तास शारीरिक व्यायामा साठी मिळतात. मात्र कायदा असा कि ते ऑफिसला आल्या नंतर आणि घरी जायच्या आधी असले पाहिजे. नाही तर काही बहाद्दर दोन तास दांडी मारून व्यायाम केला असे सांगायचे. आणि हो त्यात आणिक एक अलिखित नियम, जर काम जास्त असले तर व्यायाम ला सुट्टी. असे नेहमी होत नाही पण काही वेळा व्यायाम चुकतोच.
माझे ही मागील काही आठवडे, काम आणि प्रवास या मुळे व्यायामा कडे सपशेल दुर्लक्ष झाले. आणि त्यात भर अशी कि ऑफिस मधील व्यस्त असल्याने कोणी एकमेकास विचारले नाही. असो. माझी एक सहकारी ( वय वर्ष ५५ ) गावातील एक डोंगर ज्याला stoltzekleiven म्हणतात, तेथे नेहमी जाते, office hours training साठी आणि काही वेळा वीकेंड ला पण. या डोंगरवर जाण्या साठी साधारण ९०० पायऱ्या आहे. दर वर्षी सप्टेंबर च्या शेवटच्या शुक्रवारी तेथे दौड असते. पुरुषांचा रेकोर्ड आहे ७.५८ मी आणि स्त्रियांचा ९.५३. अधिक माहिती वाचायची असल्यास खाली लिंक देत आहे.
तर परवाच्या शुक्रवारी माझ्या सहकारीची या वर्षीची शंभरावी फेरी होती. खूप अभिमानाची गोष्ट होती. आणि अर्थातच ऑफिस मध्ये तिचा सत्कार झाला. नोव्हेंबर हा महिना हवा अतिशय खराब असते. खूप पाऊस आणि वारा. सूर्य दिसेल न दिसेल. एकदम depressing अशी हवा. त्यात पण तिच्या या महिन्यात stoltzen च्या ५ फेऱ्या झाल्या. हे ऐकून मला शरमल्या सारखे झाले. काम आहे. पण आपल्या बाहेर न जाण्या मागे हवा कारण नाही ना. असे मनात येवू लागले आणि मी अचानक ठरवले आपण stoltzen नाही तर जवळचा डोंगर तरी चढावा. शुक्रवार होता आणि काम आटोपत आले होते. या डोंगराची मला सवय आहे. तेंव्हा ठरले. तर दोन तासात मी मस्त पावसात फिरून आले. तापमान साधारण ८-९ डिग्री होते. सुरवातीला गारवा जाणवला, पण १००० फुट वर चढत गेल्यावर विशेष काही जाणवले नाही. वाऱ्याचा घोंगाट मात्र खूप होता. त्या वेळी काढलेले फोटो देत आहे. वाऱ्याचा आवाज मी रेकॉर्ड केला आहे. बघते upload होतो का.
On last Friday, in spite of the bad weather I went for hiking on mount Fløyen after being inspired by one of my colleagues.
You must be logged in to post a comment.