Tag: Buds
Weekly Photo Challenge: Future
A few days ago during my visit to Prague I came across a tree with lovely fragrance. The tree was full of buds but not a single flower. I am sure it must be blooming by now. People who will pass it will notice the beauty and enjoy the fragrance.
.
गोधडी भाग ७: निखळ आनंद
Beauty is whatever gives joy ~ Edna St. Vincent Millay
गोधडी भाग ६: नवीन शिकण्याचा आनंद (Learning to enjoy)
“Learning never exhausts the mind”. Leonardo da Vinci
हे बरोबर कि चूक? आपल्या प्रत्येकाचा अनुभव वेगळा असणार, तेंव्हा आपले सर्वांचे उत्तर पण वेगळे असणार. असे लक्षात येते कि जेंव्हा कुठली गोष्ट आपण आपल्या आनंदा साठी म्हणून शिकतो तेंव्हा त्याचे ओझे फार जाणवत नाही पण तेच जर का शिकल्या नंतर त्याचे मोजमाप होणार असेल आणि आपल्याला आपली योग्यता सिद्ध करावी लागणार असेल तर मात्र त्याचे मनावर दडपण येते. आणि शिकण्यातील आनंद काही अंशी कमी होतो.
कालच्या चतुरंग मधील काही ओळी
“प्रत्येक मूल काहीतरी गुण घेऊनच जन्माला येतं यावर पालकांचा विश्वास हवा. तो गुण ओळखणं, फुलण्याला मदत करणं हे पालकांचं काम. मुलांमध्ये अनेक गुण असतात. शाळेत मात्र ठरावीक विषयच असतात त्यामुळे कधी कधी त्या गुणांचा पत्ताच लागत नाही. आणि जेव्हा संधी मिळते तेव्हा तो गुण साकार होतो. मुलांचं व्यक्तिमत्त्व त्याच्याभोवती आकार घेतं. हा गुण शोधण्यासाठी मुलांना अनेक चांगल्या गोष्टी करून, अनुभवून पाहता यायला हव्यात. लहानपणी त्यांना अनेक खेळ खेळू देत, अनेक कला हाताळू देत, गाणी म्हणू देत, वाद्यं वाजवू देत, गोष्टी ऐकू देत, पुस्तकांच्या जगात हरवून जाऊ देत, चित्रं काढू देत, नृत्य,अभिनय करू देत, अनेक चांगल्या माणसांचा सहवास मिळू दे, अनेक चांगली ठिकाणं पाहू देत, समाजासाठी काही करू देत. ही सगळी मुलांचा रिकामा अवकाश भरण्याची चांगली साधनं आहेत. ही मुलांना अनुभवू देत म्हणजे मोठेपणी त्यांची कोठी भरलेली राहील आणि दिखाव्याच्या खिडकीची गरजच भासणार नाही! ” असो.
जे लहानपणी राहिले ते मोठेपणी करू नये असे कुठे असते, जिथे आणि जेंव्हा जमेल आनंद घेण्याचा प्रयत्न करावा. छंद जोपासला कि दिवसाचा क्षीण कमी होतो असा माझा तरी अनुभव आहे.
सध्या मी फोटोग्राफी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. हल्लीच मला माझा पहिला DSLR कॅमेरा मिळाला आहे. तर त्याचे (त्याच्या वर ) प्रयोग चालू आहे. त्यात जमेची बाजू म्हणजे आता येथे हवा सुधारत आहे, वसंत ऋतू डोकावतो आहे, दिवस मोठा होऊ लागला आले. मोबाईल वर काढलेले फोटो आणि हे फोटो यात खूप फरक असतो हे जाणवते. कॅमेराचे फोटोंची स्पष्टता मस्तच असते. प्रोसेसिंग शिवाय पण फोटोत जान (जीव) दिसते. तर मी जे काही प्रयोग केले आहेत त्याची एक झलक येथे तुमच्या साठी देत आही. तुम्हा मंडळींना आवडेल अशी आशा वाटते. तुम्हास काही सूचना करावयाशा वाटल्या तर जरूर करा.
David Frost म्हणतो “Don’t aim for success if you want it; just do what you love and believe in, and it will come naturally”.
Recently I got my first DSLR camera and so am trying my hands on photography. Spring is doing me a favour.
To me, photography is an art of observation. It’s about finding something interesting in an ordinary place… I’ve found it has little to do with the things you see and everything to do with the way you see them.
Elliott Erwitt
You must be logged in to post a comment.