संस्कृति!

हजारों साल पुरानी संस्कृति के बचाव हेतु,
हाथों में हमने पत्थर उठा लिए हैं,
बस हम न अपने दशरथ के राम हो सके
और न अपने राम के लक्ष्मण,
ये बात अलग है।
-रुपाली

Hajaron sal purani sanskriti ke bachav hetu,

hatho mei hamne patthar utha liye hain,

bas ham na apne dashrath ke ram ho sake,

aur na apne ram ke lakshman,

ye baat alag hai.

-Rupali

Back to Business/Busyness

Hello friends, I hope all is good at your end!

I am overwhelmed by your kindness and would like to thank each and everyone of you for supporting my scheduled posts.

Here is my first regular post for “floral friday” after Hong Kong and Tokyo trip. The picture was taken in Botanical garden in Hong Kong. I shall soon be writing detailed posts on both the cities including travel, accommodation, food, culture and sight seeing information.

floralfriday_29sep17

I have taken a great deal of photos and will need time to sort and work on them.  Most important is I will not keep you waiting forever 🙂

Have a nice weekend!

 

गोधडी भाग (आठवत नाही) : आमचीच लाल!

तर मित्रांनो यंदा मी दिवाळी निमित्त आतिशबाजी  प्रत्यक्षात न पाहता फेसबुक वरून पहिली. ती कशी, आम्ही भारतीय दुसऱ्या धर्मा बद्दल, दुसऱ्या जाती बद्दल अतिशय पोटतिडकीने विनोद/ चेष्टा/ जोक करतोच. यात आमचा हात एक ब्रिटिश धरू शकला तर, पण त्याने त्यावर केलेला विनोद आम्हास कळला तर बेहेत्तर.

मूळ मुद्दा हा की हि अतिशबाजी मी मोती साबण, त्याचा कागद/चांदी, त्याची साठवण, आठवण… नंतर वेगवेगळ्या लाडवाचे आकार, त्यांचे प्रकार आणि त्यातील बेदाणे या वर पाहिली/वाचली. तुम्ही जाणकार मंडळी नी अर्थातच ती वाचली असणारच म्हणून ती माझ्या पर्यंत पोचली. आणि हो पुढे जाऊन विनोद बेशिस्ती आणि गबाळे राहणे किंवा टापटीप न राहणे वर देखील होते. थोडक्यात काय तर आम्ही मराठी माणसे आपापसात पण एकोप्याने राहू शकत नाही. बरे आता कसला हि टेंभा मिरवायचा झालाच तर एक सत्यकथा सांगते.

त्या आधी एक फॅक्ट, महाराष्ट्राच्या उत्तरे कडे म्हणजे मध्यप्रदेश आणि पुढे, मराठी माणसाला  “कढी-चट” हे टोपण नाव आहे. कारण काय तर म्हणे ती फडतूस ताकाची कढी देखील मराठी माणूस शेवटी सोडत नाही, तर चाटून संपवतो. आणि मराठी माणसात सगळे आले, सब घोडे बारा टक्के.

आता सत्यकथा, मी युनिव्हर्सिटीत शिकत असताना एकदा माझी एक प्राध्यापिका (अतिशय सज्जन बाई असे प्रत्येकाचे मत होते नव्हे अजून आहे!) मला म्हणाली मराठी माणसे चांगली पण काय ग तुमच्या पद्धती. मी अर्थातच चाट पडले. प्रश्न बोलून दाखवावा लागला नाही. किस्सा असा, ” काल मी एका जुन्या विद्यार्थिनीच्या लग्नाला गेले होते. दुपारचे लग्न होते आणि त्यात काल पाऊस होता. जावे कि नाही याच्या विचारात होते पण आग्रहाचे आमंत्रण होते म्हणून इथला तास संपवून गेले. मंगल कार्यालयाच्या बाहेर बरीच गर्दी दिसली. माणसे हळू हळू पुढे जात होती. पाऊस असल्याने सगळ्यांची पंचाईत होती. मी दारा जवळ पोचल्या वर कळले की दारात दोन्हीं पक्षाचे लोक याद्या घेऊन उभे होते. आलेला पाहुणा तुमचा कि आमचा याची खात्री करून आणि त्याचे नाव खोडून आत सोडत होते. किती ग चिकू पणा हा. मी वेगवेगळ्या समाजातील लग्न पहिली हि अशी मात्र पहिलीच वेळ”. आम्हीं का तुमच्या मंडळींचे जेवणाचे पैसे द्यायचे हा सरसकट मुद्दा असावा. माझ्या तो वरच्या आयुष्यातला हा असा पहिलाच प्रसंग. मला काय म्हणावे सुचेना. आडनाव विचारले तर दोन्ही बाजू ची मंडळी एका पोटजातीची नसून शत्रू पक्षातील (हे ही आपणच ठरवले आहे) होती. कोणाला वेगळं  म्हणायची सोय नाही.

लग्ना नंतर सासरी घरांतल्या मंडळी कडून ओळखीच्या एका लग्नाचा असाच किस्सा ऐकला, त्यात वधूचा भाऊ का कोण त्यांच्या कडील यादी घेऊन फिरत होती. खातरजमा करून आपल्या यादीतील लोकं मोजत होता.  शेवटी वराकडच्या एका जेष्ठाने सांगितले कि पैशाची तुम्ही काळजी करू नका, आम्ही बघतो पण माणसे मोजायची नाही.

तर बोला आता. तुम्ही शहाणे कि आम्ही शहाणे!

मुखवटे!

आज पूर्ण तीन आठवड्या नंतर लोकसत्ता चाळायला मिळाला, e-editionच पण असो. महत्वाच्या बातम्या कळत होत्या पण पेपर हाताळायचे सुख नव्हते.

खरे तर ग्रीस सफर बद्दल हि लिहायचे आहे पण आत्ताच नको. तर, पेपरातले  आवडलेले पहिले वाक्य “स्पष्ट बोलण्याने नाराजीचा टॅक्स भरावा लागतो.”

शंभर टक्के खरे आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला कोणी प्रश्न विचारतो/ते. उत्तर आपेक्षित असलेले दिले कि स्वारी खूष. नाही तर थोडी अस्वस्थता जाणवते. पण मग लोक प्रश्न कां विचारतात. तो ही एक प्रश्नच आहे.

नेहमी उत्तरे देणे टाळता येत नाही. आणि म्हणून “तो टॅक्स वाचवण्यासाठी हा मुद्दा सोडून देऊ.”, पेपरात दिलेले वाक्य आपण अमलात आणू शकत नाही.

या वाक्य प्रेमातून बाहेर पाडायला अग्रलेख जवाबदार ठरले, अर्थातच ते  वाचले म्हणून हे घडले, अग्रलेखातील उतारा देत आहे,

“परवा, कल्याणहून पनवेलकडे जाणाऱ्या एका एसटी बसगाडीच्या वाहक महिलेला एका मुजोर गुंडाने भर रस्त्यात, प्रवाशांच्या देखत अमानुष मारहाण केली. बसमधील सारे प्रवासी मात्र, उघडय़ा डोळ्यांनी थंडपणे हा सारा प्रकार पाहत बसून राहिले. एका असहाय तरुणीवर ओढवलेल्या अशा प्रसंगाच्या वेळी कोणत्या पराभूत मानसिकतेमुळे प्रवाशांचे हात बांधले गेले होते?”… “‘त्या हैवानापेक्षाही, बघ्यांची भीती वाटते’, या त्या असहाय तरुणीच्या उद्विग्न उद्गारांनंतर, आता, प्रत्येकालाच शरमही वाटू लागली असेल.”

येथे कोणी कोणाला प्रश्न विचारला नाही, पण प्रत्येकाने तो स्वतास विचारायला हवा, अश्या वेळी आपण काय करणार.

“मी अण्णा” म्हणून टोप्या घालून फिरणारे खरंच भ्रष्टाचारच्या विरोधात आहे? एखाद्या निर्भयावरील अत्याचारानंतर कॅन्डल मार्च मध्ये भाग घेणारे स्त्री वर वाकडी नजर टाकत नाही? काय खरे आणि काय खोटे…