आपुलकी – मनाची घालमेल!

रोज समाजात वावरत असताना आपल्या कानी अनेकांचे शब्द/बोल पडतात. लक्ष द्या देऊ नका ते पडतात. हं light1याला अपवाद एकच जर तुम्ही स्वतः ला मुद्दाम लोकां पासून दूर केलेत आणि कायम earphones लावून फिरत असाल.

परवाचीच  (मराठीतील परवा 🙂 ) गोष्ट. काही कारणास्तव अर्धा – पाऊण तास वेळ काढायचा होता आणि त्या साठी दोन options होते. एक तर macdonalds  किंव्हा starbucks. मी अर्थातच दुसरे निवडले.

येऊन टेकत नाही तेच मराठी बोल कानी पडले. ते टेबल थोडे आडोश्याला होते म्हणून बसलेल्या व्यक्ती काही दिसल्या नाहीत.

मुलगा १: अरे मी मुद्दाम तुला इथे बोलावले, घरी हिच्या समोर बोलायचे नव्हते.

मुलगा २: कायरे, काय झाले?

मु. १: अरे तसे विशेष काही नाही पण कोणाकडे मन हलके करावे असे वाटत होते म्हणून तुला बोलविले.

मु.२: ???

मु.१: तू बघितलेच आहे हिची नेहमी तक्रार असते कि मी पैसे खर्च करत नाही. चिकू मारवाड्या सारखा राहतो.

मु.२: अरे ती काही खोटे सांगत नाही. आता हेच बघ न! तुझा mobile किती outdated  झाला आहे. परत तुझे कपडे आणि हो shoes पण. काय रे साल्या इतका पैसा मिळवितो मग विचार कसला करतो? तरी बरे तुझी बायको – मुले tiptop असतात.

मु.१: पैसा मिळवितो बरोबर आहे. पण खर्च करायला होत नाही. हेच तर सांगायला तुला इथे बोलावले आहे. अरे गावा कडे आई- बाबा, मोठा भाऊ त्याचे कुटुंब राहतात. धाकटी बहीण ही दुसऱ्या गावाला असते. सगळे कमावते असले तरी माझ्या शिक्षणासाठी आई-बाबा सोबत प्रसंगी भावाने आणि बहिणीने या ना त्या कारणाने मदत केली आहे. ते विसरता येत नाही रे. माझी परिस्थिती खूप सुधारली पण त्यांची नाही.

मु.२: तिथे काही problems आहेत का?

मु.१: तसे नाही रे. पण इथल्या पेक्षा तिथे कष्ट खूप असतात. आईच्या retirement ला अजून काही वर्षे आहे. पण ती थकली आहे रे.

मु.२. मग तुझा काय विचार आहे?

मु.१: त्यांना नियमित मदत करायचा विचार आहे. तसेच शक्य झाले तर भावाला आणि बहिणीला ही काही मदत करावी असे वाटते.

मु.२: खूप भावुक होतो आहेस असे वाटते. नीट विचार कर.

मु.१: हे बघ मी गेले तीन वर्षात हिला आणि मुलांना कधी कशाला ही नाही म्हटले नाही पण माझ्या कडून जमेल तसे काही रक्कम save  केली आहे. तुला सांगतो दुकानात नवीन काही नुसते बघितले तरी खूप चोरट्या सारखे होते. जो पर्यंत ती रक्कम मी दादाला आणि  धाकटी देत नाही तो पर्यंत निवांतपण नाही बघ.  अरे त्यांनी मागितली नाही किंव्हा ते घेतील याची guarantee नाही. पण मी देणार आहे.

मु.२. You are different. अरे तू असा असशील असे वाटले नव्हते रे. केवढा विचार करतोस. Your family is really lucky.

मु.१: तुला पटते ना. मग आता तू मला मदत करायची हिला convince करण्यात. उगीच तिचे परत गैरसमज  नको.

…चल lunch break संपत आला निघूया.

सिनेमा- सिरिअल मध्ये असतात तसा प्रसंग, पण खरा. त्या मुलाचे बोलणे ऐकून खूप बरे वाटले.  अजून समाजात संवेदना जागी आहे पाहून खूप बरे वाटले.