He is naughty. Just one touch. Melts the shield I create.
कहते हैं ” अकेला चना भाड नाही झोंक सकता” तो क्या लेकिन अकेला शक्स पहाड चढ सकता है. वही काफी है.
जरा हवा सुधारली की एक रुपाली आणि समस्त नोर्वेजिअन घरा बाहेर पडायला हवेच. असे माझ्या “near and dear ” यांचे म्हणे आहे. तर आज रविवार वर सूर्य आणि हवा ठीक ठीक. सूर्य होता म्हणजे गरम असणार असे येथे नसते. गावात तपमान शून्यच्या जवळ पास होते . उन असल्याने थोडा फरक पडला होता आणि म्हणून डोंगरावर तपमान उणे ३ ते ५ डिग्री दरम्यान होते. येथे राहून योग्य कापडे घालायची सवय आपोआप लागते आणि मग नो टेन्शन. सकाळी अकरा ते दुपारी चार पर्यंत हवा बरी राहणार होती याची माहिती कालच मिळाल्याने आज लौकर उठून तशी तयारी केली आणि खाणे- पिणेचे साहित्य (आलू पराठा हा महत्वाचा आईटम) आणि कॅमेरा सोबत घेतले.
नेहमीच्या सवयी प्रमाणे पहिला थांबा ११०० फुटावर घेतला. अंतर फार नव्हते (साधारण पणे साडेतीन किमी) पण काही ठिकाणी चढण दमवणारी होती. छोट्या विश्रांती नंतर मस्त फिरले फोटो काढले. ठिकठिकाणची तळी संपूर्ण गोठली होती. लोकांनी दगड, झाडाच्या फांद्या टाकून पाणी वर येते का बघण्याचा प्रयत्न केला होता. लोक तळ्यात पुढे जात नव्हते, कारण धोका आहे ची पाटी होती. वर बर्फ घट्ट असला तरी खाली पाणी असणार, मोठ्या फांद्या आपटल्या कि मोठा प्रतिध्वनी ऐकू येत होते.
अजून पुढे जायचे होते आणखीन दोन तळी बघायला पण झाले नाही. वाटेत काही ठिकाणी पूर्ण रस्ता बर्फ होता आणि तो घट्ट झाला होता. माझे बूट योग्य नव्हते.
वाटेत एका ठिकाणी जेवण घेतले, आलू पराठाचे आणि सोबत कडक कॉफी. छान उन होते पण प्रचंड गारठा जाणवत होता. काही वेळासाठी हातमोजे काढले तर बोटे सुन्न झाली. मग ती काढण्याची चूक केली नाही. घरी येवून अंतर मोजले तर आजची फेरी साडे आठ किमीची झाली आणि सर्वात उंच ठिकाण १३०० फुटावर होते.
You must be logged in to post a comment.