Shayari: “कल और आज”

नए घर की देहलीज़ लाँघ रही बहू से सास ने कहा

बहू पीहर का सब बाहर ही छोड़ आना

भीतर न लाना

हमारे घर के अपने रिवाज़,

अपने तौर तरीके हैं .

झुकी नजरों से सास की एक हलकी सी झलक लेते हुए

बहू ने सोचा

कितने दिन/बरस लगे होंगे

इन्हें इस घर को अपना कहने में

Mother’s Day Special: माँ भी इंसान है


“माँ”  पर अनगिनत रचनायें रची गयी हैं।  

आमतौर माँ  को देवी कहा जाता है या काफी स्टिरिओटाइप बताया जाता है। 

लेकिन,  

aai_baal
Mother and child

मेरी सोच कुछ अलग है,
मेरे लिए माँ एक इंसान है। 

शायद इस प्रयास में पद्य की बजाय गद्य ही दिखे

पर मैं अपनी बात कहना चाहती हूँ।

माँ भी इंसान है

उस में अच्छाई है

तो बुराई भी है।

उसकी अपनी सीमाएं भी हैं

वो सही बात करती है

तो कभी गलत भी होती है।

जहाँ वो पूर्ण है

वहीं वो अपूर्ण भी है।

वो बहुत कुछ सहती है

पर उसकी सहनशीलता की भी सीमा है।

वो बहुत कुछ देती है

पर उसकी अपनी छोटी छोटी ख्वाईशें भी होती हैं।

वो चाहती है सब ठीक हो

पर कभी कभार सब ठीक नहीं होता

संभालना चाहती है पर संभाल नहीं पाती है।

उसकी अपनी मजबूरियाँ होती हैं।

एक अदद निजी जिंदगी भी होती है।

जहाँ चाहतें और रुसवाइयाँ भी होती हैं।

उसकी खुद की कई समस्याएँ होती हैं।

कभी ये शारीरिक तो कभी मानसिक होती हैं

कई बार तो ये सांस्कृतिक भी होती हैं ।

बच्चों को पालते हुए वो भी काफी कुछ संभालती है

कभी अपना वजूद तलाश करती है तो कभी खुद कुछ नया सीखती है

गिरती है, संभलती है, औरों को लिए आगे बढ़ती है।

असली माँ “देवी ” या “स्टिरिओटाइप ” वाली माँ से अलग होती है

ये आपकी और मेरी तरह इंसान होती है।

शहर का हर शख्स जाना पहचाना लगता है।

सुबह की भाग दौड़ है कहीं
बसों की दौड़ हैं कहीं
गाड़ियाँ रुकीं हैं कहीं
हर रस्ता पहचाना लगता है।

कहीं उम्मीद तो कहीं उदासी है
किसी का पेट भरा हुआ तो कोई खाली है
कहीं घाव हरे तो कहीं दवा जारी है
हर दर्द पहचाना लगता है।

अंदर से बाहर तक संदेह छाया है
रिश्तों में अब झूठ गहराया है
नमकीन पानी सागर से ज्यादा आँखों में समाया है
हर जज़्बा पहचाना लगता है।

देखकर भी न देखने वाले हैं
सुनकर भी न सुनने वाले हैं
कहकर भी न कहने वाले हैं
तभी तो
हर पुतला पहचाना लगता है

शहर का हर शख्स जाना पहचाना लगता है।

गोधडी भाग ४४: शिकलेल्या तिची कथा – निमित्त जागतिक महिला दिन

महाराष्ट्रात खेड्यात नवऱ्याला मालक किंवा धनी असे संबोधतात असे ऐकले आहे. मी मात्र हे फक्त नाटक किंवा सिनेमांत पहिले आहे. हल्ली बायकां मालक किंवा धनी म्हणत असल्याचे शक्यतो आढळत नाही. शिकलेल्या तर नाहीच नाही. बऱ्याच ठिकाणी नाव घ्यायची पद्धत आली आहे.
बायका शिकल्या आणि नवऱ्याला नावाने हांका मारू लागल्या म्हणून परिस्तितीत कितीसा फरक झाला आहे असे वाटते? जो पर्यंत बायका स्वतःचे आणि घरातील निर्णय, लहान असो वा मोठे स्वतः घेऊ शकत नाही तो पर्यंत त्या “मालकी” चा परीघ ओलांडू शकत नाही. सांगितलेली कामे अगदी अचूकपणे पार पाडणे म्हणजे स्वातंत्र नव्हे.
जो पर्यंत आपल्या बायकोला कळते हे नवऱ्याला पटत नाही. दोघात आपणच जास्तं शहाणे याचा दुराभिमान त्याच्या मनातून जात नाही आणि वेळोवेळी मीच कसा शहाणा हे दाखविण्याचे तो सोडून देत नाही. तो पर्यंत तोच मालक. चुकीचा असला तरी भाव तोच.

तसेच काही घरात मालकीण बाई असू शकते. एकदम उलट परिस्थिती. टक्केवारी खूप कमी आहे. पण आहे. स्वतः ची कुवत काही नसतांना नवऱ्यावर उठसुठ चिडणाऱ्या, स्वतःचा न्यूनगंड लपविण्यासाठी, आपण किती त्रास सोसतो याचा पाढा कायम वाचणाऱ्या बायका पण समाजात असतात. तिथे तो बिचारा असतो. तरी त्याला “चॉईस ” असतो कारण तो दिवसाचा जास्त वेळ बाहेर असतो. आणि मग तो हळू हळू तिला टाळू लागतो.

घर आणि मुले ही तिची जवाबदारी असते! दिवसभर काम करून त्याचे दमणे साहजिक असते आणि तिला मात्र तिथे ही   “चॉईस” नसतो. आपण बातम्या आणि राजनीती वर चर्चा बघतो, फुटकळ वेळेत ती आव आणून घरांत (भरीला सोशल मीडिया पण आहे ) वर करतो म्हणून आपण शहाणे असे वाटणारे महाभाग पुष्कळ आहे. पण ती बघत असलेली मालिका नेहमी भिकारडी असते.

जिथे एकमेकां बद्दल आदर असतो, ओढ असते, एकमेकांसाठी वेळ असतो आणि घरात दोघे मिळून निर्णय घेतात तिथे असे दिवस साजरे करावे लागत नाही. तुमच्याकडे असे दिवस साजरे करण्याची वेळ येऊ नये या साठी शुभेच्छा!

गोधडी भाग (आठवत नाही) : आमचीच लाल!

तर मित्रांनो यंदा मी दिवाळी निमित्त आतिशबाजी  प्रत्यक्षात न पाहता फेसबुक वरून पहिली. ती कशी, आम्ही भारतीय दुसऱ्या धर्मा बद्दल, दुसऱ्या जाती बद्दल अतिशय पोटतिडकीने विनोद/ चेष्टा/ जोक करतोच. यात आमचा हात एक ब्रिटिश धरू शकला तर, पण त्याने त्यावर केलेला विनोद आम्हास कळला तर बेहेत्तर.

मूळ मुद्दा हा की हि अतिशबाजी मी मोती साबण, त्याचा कागद/चांदी, त्याची साठवण, आठवण… नंतर वेगवेगळ्या लाडवाचे आकार, त्यांचे प्रकार आणि त्यातील बेदाणे या वर पाहिली/वाचली. तुम्ही जाणकार मंडळी नी अर्थातच ती वाचली असणारच म्हणून ती माझ्या पर्यंत पोचली. आणि हो पुढे जाऊन विनोद बेशिस्ती आणि गबाळे राहणे किंवा टापटीप न राहणे वर देखील होते. थोडक्यात काय तर आम्ही मराठी माणसे आपापसात पण एकोप्याने राहू शकत नाही. बरे आता कसला हि टेंभा मिरवायचा झालाच तर एक सत्यकथा सांगते.

त्या आधी एक फॅक्ट, महाराष्ट्राच्या उत्तरे कडे म्हणजे मध्यप्रदेश आणि पुढे, मराठी माणसाला  “कढी-चट” हे टोपण नाव आहे. कारण काय तर म्हणे ती फडतूस ताकाची कढी देखील मराठी माणूस शेवटी सोडत नाही, तर चाटून संपवतो. आणि मराठी माणसात सगळे आले, सब घोडे बारा टक्के.

आता सत्यकथा, मी युनिव्हर्सिटीत शिकत असताना एकदा माझी एक प्राध्यापिका (अतिशय सज्जन बाई असे प्रत्येकाचे मत होते नव्हे अजून आहे!) मला म्हणाली मराठी माणसे चांगली पण काय ग तुमच्या पद्धती. मी अर्थातच चाट पडले. प्रश्न बोलून दाखवावा लागला नाही. किस्सा असा, ” काल मी एका जुन्या विद्यार्थिनीच्या लग्नाला गेले होते. दुपारचे लग्न होते आणि त्यात काल पाऊस होता. जावे कि नाही याच्या विचारात होते पण आग्रहाचे आमंत्रण होते म्हणून इथला तास संपवून गेले. मंगल कार्यालयाच्या बाहेर बरीच गर्दी दिसली. माणसे हळू हळू पुढे जात होती. पाऊस असल्याने सगळ्यांची पंचाईत होती. मी दारा जवळ पोचल्या वर कळले की दारात दोन्हीं पक्षाचे लोक याद्या घेऊन उभे होते. आलेला पाहुणा तुमचा कि आमचा याची खात्री करून आणि त्याचे नाव खोडून आत सोडत होते. किती ग चिकू पणा हा. मी वेगवेगळ्या समाजातील लग्न पहिली हि अशी मात्र पहिलीच वेळ”. आम्हीं का तुमच्या मंडळींचे जेवणाचे पैसे द्यायचे हा सरसकट मुद्दा असावा. माझ्या तो वरच्या आयुष्यातला हा असा पहिलाच प्रसंग. मला काय म्हणावे सुचेना. आडनाव विचारले तर दोन्ही बाजू ची मंडळी एका पोटजातीची नसून शत्रू पक्षातील (हे ही आपणच ठरवले आहे) होती. कोणाला वेगळं  म्हणायची सोय नाही.

लग्ना नंतर सासरी घरांतल्या मंडळी कडून ओळखीच्या एका लग्नाचा असाच किस्सा ऐकला, त्यात वधूचा भाऊ का कोण त्यांच्या कडील यादी घेऊन फिरत होती. खातरजमा करून आपल्या यादीतील लोकं मोजत होता.  शेवटी वराकडच्या एका जेष्ठाने सांगितले कि पैशाची तुम्ही काळजी करू नका, आम्ही बघतो पण माणसे मोजायची नाही.

तर बोला आता. तुम्ही शहाणे कि आम्ही शहाणे!

फालतूपणाची अर्थपूर्ण गोष्ट!

‘स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट‘ या पुस्तकासाठी अवधूत डोंगरे यांची युवा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

या कादंबरी ची माहिती शोधली तेंव्हा उपलब्ध होते ते:

एक:

कादंबरीचा नायक असलेल्या तरुणामध्ये स्वत:ला फालतू समजण्याची मनोवृत्ती कशी जन्मली, याचा शोध घेता घेता नाव नसलेल्या या तरुणाची ही गोष्ट प्रातिनिधिक आणि बरीच अर्थपूर्ण असल्याचे लक्षात येते.

दोन:

पुणे शहराच्या सदाशिव पेठ नामक बर्म्युडा ट्रॅंगलमध्ये असणार्‍या एका खाजगी होस्टेलवर राहणारा संवेदनशील स्वभावाचा तरुण (की न नायक?) टिळक रोड व्हाया अलका चौक, लकडी पूल ते फर्ग्युसन रस्त्यावरील रानडे जर्नालिझम डिपार्टेंट, वर्तानपत्राचे ऑफिस येथे होणारी त्याची नियमित “वारी”. यात सोबतीला आहेत जर्नालिझम डिपार्टेंटलमधील मोडून पडलेलं झाड, लायब्ररी, त्याच आवारातील तीन पायाचा नेहमीच गप्प असणारा कुत्रा, दसनूरकर, सहअध्यायी (मित्र किंवा वर्गमित्र नव्हे), लकडी पुलावर जुनी पुस्तके विकणारा सुधाकर व त्याच्यासोबतचा बिडी ओढणारा फाटका माणूस, तेथेच “नवा काळ”मधील कोडे सोडवणारे बाळासाहेब, म्हातार्‍यांचा ग्रुप, गुलाबी ड्रेसवाली मुलगी, पुठ्ठेवाला म्हातारा, टिळक रोडवरील पेपर विकणारी बाई, शेवटचे आचके देत असलेले मराठी वर्तानपत्राचे ऑफिस व त्यातील लोक, होस्टेलवरचा परप्रांतीय उदय, मोबाईल, रेडिओवरील फिल्मी गाणी, निवडक पुस्तके, आजूबाजूचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्थानिक असे गोंधळात टाकणारे वातावरण व त्यांचा भयंकर फाफटपसारा. परिणाम त्यामुळे आपण फालतू आहोत ही चुकीची पण प्रांजळ, प्रामाणिक जाणीव, त्यातून पडलेले प्रश्न, त्यांची आपल्या परीने उत्तरे मिळवण्याचा घेतलेला शोध व आत्महत्या करण्यापेक्षा स्वत:ला फालतू समजणे चांगले हा हाती लागलेला निष्कर्ष. अशी या कादंबरीची कहाणी.

हे पुस्तक अजून हाती आलेले नाही पण वरील पुनरावलोकन वाचून आपला समाज दिसतो. आपल्या आजू-बाजूला वास्तव्य करणारी अशी अनेक माणसे आपल्या लक्षात येतात. आपला समाज दोन तऱ्हेच्या लोकांनी व्यापला आहे, स्वतःला खूप शहाणे समजणारे आणि स्वतःला फालतू समजणारे. नॉर्मल माणसे या इतर दोघांच्या गर्दीत हरवली आहेत. असे कां?

आपल्या कडे अगदी बालवाडी/शाळे पासून प्रत्येकाची तुलना दुसऱ्याशी जाते  आणि हे इतक्या सहज रिती ने होते कि आपण जग हे असेच असते असे धरून चालतो. वास्तव्यात दोन व्यक्तींची तुलना ही योग्य नव्हेच. मी मी आहे तुम्ही तुम्ही आहात. जुळी भावंडे पण वेगळी असू शकतात आणि बहुतांश वेळा ती वेगळीच असतात. आणि हाच निसर्ग आहे. जेंव्हा आमच्या बालवाड्या/शाळा/घर/परिसर इथून असा तुलनात्मक अभ्यास बंद होणार तेंव्हा समाजातून फालतूपणाची/ शहाणपणाची भावना नाहीसी होणार. तोवर मात्र अश्या अनेक कथा आमच्या अवती भवती घोटाळत राहणर.

संदर्भ:

स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट

स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट