गोधडी भाग ३१: माझ्या सहिष्णुतेचा अंत

बस मधील प्रसंग:

दोघे ओळख असलेले बस मध्ये भेटले. ओळख असली तरी काही दिवसाच्या अंतराने भेटत होते. सुरवातीची सगळी चौकशी करून झाल्या वर.

पहिला: काय मग “कट्यार” बघितला कि नाही?

दुसरा: काय?

पहिला: अरे सुबोध भावे चा नवीन सिनेमा “कट्यार काळजात घुसली”? एक दम भारी.

दुसरा: नाही रे, पण वसंतरावांची त्यातली गाणी मला खूप आवडतात.

पहिला: कोण वसंतराव?

माझी सहिष्णुता संपल्याने मी पुढच्या थांब्याला खाली उतरले.

MM 2-40: Monochrome Madness

bnw_11jan16

For more on Monochrome Madness, please visit Leanne Cole’s blog.

घर परतीच्या वाटेवरती धूसर धूसर धूळ उडे
अंधूक होते नजर आणखी थकलेले पाऊल अडे

घर परतीच्या वाटेवरती मलूल, वत्सल, सांज उन्हें
कुरवाळिती मज स्‍नेहभरानें विसरून माझे लाख गुन्हें

–शान्‍ता शेळके