गोधडी भाग २७ : याला जीवन ऐसे नाव

रोज भवताली घडणाऱ्या गोष्टी काही वेळा आपले सगळे positive विचार बाजूला  सारतात. आपण किती ठरवले कि चांगले विचार मनात आणायचे तरी दुखी आणि त्रास देणाऱ्या गोष्टींना गव्हातल्या खड्या प्रमाणे बाजू सारणे सोपे नसते. किती तरी कोडी अशी असतातत ज्यांची उकल सापडत नाही.  आणि त्यात सोशल मिडिया वर येणारे “quotes” भर पडतात.  प्रश्न फक्त मलाच पडतात असे नाही अनेकांना पडत असणार पण प्रत्येकाची विचार करायची आणि त्यातून बाहेर पडायची पद्धत वेगळी असते. शेवटी सगळ्यांना सगळेच जमते असे नाही.

एक वाक्य आहे,

Life is not fair“.

आयुष्यात सगळी कडे “logic” दिसत नाही.  सगळी कडे ते “fuzzy” जास्त जाणवते. उपाय मात्र शून्य.  तर या फझीनेसची उदाहरणं बघू…

 • एकाच क्षणाला अनेक बाळ जन्माला येतात पण त्यांचे नशीब सारखे नसते. त्यांच्या ग्रहमाना बद्दल म्हणाल तर एकाच हॉस्पिटल मध्ये, किंवा एकाच कुटुंबात एकाच वेळी मुले जन्माला येतात पण त्यांना जे मिळते ते सारखे नसते. कां ?
 • एका घरात सगळे कष्ट करणारे असतात. पांघरून बघून पाय पसरतात पण त्यांच्या चिंता कमीच होत नाही. आयुष्य आज सुधारेल उद्या सुधारेल ह्या आशेवर माणसे येतात आणि जगाचा निरोप घेतात. कां?
 •  काही जण “happy go lucky” असतात, ते फार मोठं किंवा वेगळं करण्याच्या फंदात पडत नाही पण त्यांना हवे ते,  हवे तेंव्हा ताटात वाढल्या प्रमाणे मिळते. कां?
 • काही जण स्वार्थ याच्या पली कडे जात नाही पण आयुष्य मजेत जगतात. त्या वागण्यामुळे इतरांना त्रास झालेला त्यांना कधीच कळत नाही. आणि आयुष्यात उलट प्रसंग हि कधी येत नाही तेंव्हा आपल्या बरोबर असे केले तर काय वाटते याचा काही अनुभव त्यांना येत नाही. कां?
 •  काही जण  आयुष्यात नाटक करण्या पली कडे काही करत नाही पण त्यांचे कुठे हि अडत नाही. कां?
 • देवावर श्रद्धा (अंधश्रद्धा नव्हे) असणारी माणसे खितपत पडलेली असतात आणि देवा वरच्या श्रद्धे चा बाजार मांडणारी किंवा ग्लोरिफिकेशन करणारी माणसे समाजात मोठ्या तोऱ्याने मिरवत असतात. कां? पेपरात आणि सोशल मिडिया वर अशी उदाहरणे हवी तेवढी सापडतील.
 • आई-वडील आणि घरातील जेष्ठ यांचे करणारे चक्रव्यूत अडकलेले दिसतात आणि आई वडिलांची काळजी घेतो असे नाटक करणारे मजेत जगतात. कां?
 • प्रत्येकाला कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी एक सारखा काळ आणि इतर पाठबळ मिळत नाही. कां?
 • आयुष्यात मुंगीला न दुखवणारी माणसे मुंगी एवढ्या सुखा साठी तीळ तीळ जळतात. कां?
 • जे सर्व सामान्य माणसांना मिळते तेवढे हि काही लोकांना मिळत नाही. कां?
 • काही लोक आयुष्य कधीच ताठ मन करून जगू शकत नाही, तशी संधी त्यांना मिळत नाही. कां?

काळोख्या रात्री नंतर सूर्य प्रत्येकाच्या आयुष्यात कां उगवत नाही???

Many people don’t deserve what they get and many people don’t get what they deserve“.

असे का होते? ” भगवान के घर देर है अंधेर नाही” हे आणि अशी वाक्ये सिनेमा, नाटक किंवा मनोरंजन किंवा “दिल बहलाव्या”  साठी असतात का?

गोधडी भाग १७: Sexism का?

रोजच्या रुटीन मुळे घरात संवाद कमी होत असले तरी सुट्टीच्या काळात कधी आणि कशा वर किती वेळ चर्चा होवू शकते हे सांगणे कठीण असते.  तर मुद्दा बायकांचे गाडी/वाहन चालवणे.

भारतात आता बायका व्यावसायिक स्वरूपात रिक्षा, टैक्सी, बस, आगगाडी आणि विमान चालवू लागल्या आहेत. प्रमाण मात्र नगण्य असावे. त्या मानाने पाश्चिमात्य देशात हे प्रमाण बरेच आहे. निदान डोळ्याला सहज दिसते.

लोकल बस चालक (मला इतकी वर्षे महाराष्ट्रात राहून चालक आणि वाहक मधला फरक काही कळलेला नाही)  महिला बऱ्याच दिसतात. महिला ट्रक चालवत असतील का? ट्रक चालवणे तसे अवघड असणार ना?

प्रश्न युरेका करत काही मनात आला नाही तर ट्रक चालवणारी बघून उर भरून आले.  जे अवघड काम आपल्याला जमत नाही ते जर दुसरा करू शकत असेल तर आनंद वाटणाऱ्या जमातीची आहे मी.

बरी ती महिला नुसता ट्रक चालवत नव्हती तर तो oil tanker होता आणि मागे एक जादा tank जोडलेला होता.

कारला ट्रेलर लावून चालवणे कठीण असते असे मी अनेक सहकारी कडून ऐकले आहे. त्याचे एक कारण म्हणजे या देशातील बोगदे आणि डोंगराळ भागातील अरुंद रस्ते.  हा तर जोड tanker होता.

हा प्रश्न पडला आणि हा बाल बोध प्रश्न मी मुलाला केला. तुमच्या मुलाने लगेच तुमच्या हो मध्ये हो केले तर हमखास समजावे हॉस्पिटल मध्ये बच्चा बदल गया है. माझा बदललेला नाही.

तो: फार अवघड नसणार शेवटी मशीन ते!

मी: अरे पण मशीन जेवढे मोठे तेवढे वापरताना ताकत नाही का लागणार?

तो: अं अं …  (याला हो समजावे )

मी: म्हणजे या बायकांना ताकत किती असणार?

तो: भारतात  ट्रक बस चालवतात त्यांच्या पेक्षा नक्कीच जास्त. आपल्या कडे बऱ्याच वेळा बस आणि ट्रक चालवणारे कुपोषित वाटतात. (सबसिडी चे जेवण ज्यांना मिळते ते कुपोषित नसतात, आपल्या कडे कामगार वर्गाच्या कुपोषणाचा कोण विचार करतोय.)

( हे निरीक्षण बहुतांश महाराष्ट्रात लक्झरी बसेस जिथे थांबतात, फूड मॉल तत्सम भागात बघितलेले ट्रक आणि बस driver आणि दिल्ली, उत्तरांचल,  हिमाचल भागात लक्झरी बसेस चालवतात ती पोरं ( अक्षरश पोरंच ती), तेंव्हा पंजाब मधील ट्रक driver सरदार चे चित्र डोळ्या समोर आणू नये. )

गोधडी भाग १६: किती (गैर)जवाबदार असावे!

पेपरात आधीच असलेले सुडोकू आणि शब्द कोडी कमी वाटतात म्हणून “सकाळ” आता अश्या बातम्या देणार कि काय असा प्रश्न पडतो.

आज “सकाळ” मध्ये एक बातमी वाचली, त्या बातमी तून काही अर्थ निघत नाही. कोल्हापूरात अनेक पेठा आणि असंख्य दादा आहेत. त्यामुळे या बातमीत नेमके कोणा बद्दल सांगायचे आहे ह्याचा थांगपत्ता लागणार नाही शिवाय कां जर दुर्दैवा ने घटणेच्या वेळी तुम्ही तिथे हजर असलाच.  त्यातील काही भाग खाली नमूद करत आहे, अंदाज येण्यासाठी.

“शीर्षक” : ‘दादां’च्या भाचाकडून कॉन्स्टेबललाच ‘दादागिरी’
बातमी: पेठेतील एका “दादां‘च्या भाच्याने आज चक्क शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कॉन्स्टेबललाच दादागिरी‘ केली. राजारामपुरीतील जनता बझार चौक परिसरात आज दुपारीही घटना घडली. घटनेनंतर खुद्द दादां‘नी मध्यस्थी केल्यानंतर सुमारे पाऊणतास सुरू असलेल्या वादावर पडदा पडला….”

तर मुद्दा असा कि जर बातमी खरी होती तर त्यात पेठेचे आणि त्या दादाचे नाव कां नव्हते? अश्या अघळ पघळ बातम्या देवून निष्पन्न काय येणार. हे वर्तमानपत्राचे उदाहरण झाले तसेच प्रसंगी सामान्य लोक आणि काही जवाबदार व्यक्ती पण खऱ्या ची बाजू न घेता गप्प राहणे पसंत करतात.  उगीच कोणाशी वाकडे म्हणून.

जवाबदारी न घेणे कधी आणि किती योग्य असते?

“If you really want something, you will find a way. If not, you will find an excuse”

गोधडी भाग ५: युरेका…

आजचा शोध:

एका साधवी चा फोटो पहिला.  राजकारणातील स्त्रियांना (पूर्वी बायकांना असे लिहिले तर चालायचे, आजकाल ते बरे दिसत नाही! ) वाहिनी, काकी मामी असे संबोधन असते तसे भक्ती रसातील स्त्रियांना माता, दीदी, मां असे संबोधन असते.  बरे यांचा पेहराव प्रामुख्याने पांढरा नाही तर केशरी असतो. कुंकू लावण्याची तऱ्हा वेगवेगळी पण एकदम एकदम स्टायलिश असते. जीवनातील असुरक्षा इतकी वाढली आहे कि जन समुदाय चे कल्याण करायला “हा वर्ग” लागतोच.   त्या स्वतः इंटरनेट वापरत असतील किंवा नसतील पण मग कोणी भक्त ते बघत असेल.  तर एवढे सगळे लिहायचे कारण कि या साधावीचा नीटनेटका, सुस्वरूप, छान असा प्रोफाईल फोटो पहिला आणि मी उडाले ना. कारण भुवया कोरलेल्या होत्या अगदी ताज्या ताज्या. भक्ती रसातील हा भाव मला आजच दिसला. माणसाने प्रेझेनटेबल असणे इतके गरजेचे झाले आहे याचा दृष्टांत मला आज लागला. “साधी राहणी उच्च विचार” सारख्या म्हणी फक्त परीक्षेतील निबंधा पुरत्याच असतात बहुदा.

विचारांची गोधडी भाग २: मार डालाsss

सायबांने आमच्यावर शंभर हून जास्त वर्ष राज्य केल. एक न दोन अनेक कारणांनी आपल्या कडे बऱ्याच  गोष्टी रुजविल्यात, त्यात महत्वाची म्हणजे इंग्रजी भाषा. आणि आता सायबाला जाऊन  साठाहून जास्त वर्षे  झाली तरी या भाषेचे प्रेम कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्यात आम्हा भारतीय लोकांत  ‘confidence’ इतका ठासून भरलेला आहे कि आपण जे बोलतो किंवा लिहितो ते बरोबर कि नाही याची खात्री करावी अशी आम्हांस जरूरच वाटत नाही.

सोशल मिडिया मुळे तर याला आणखीनच उधाण आले आहे. स्पेलिंग म्हणू नका, व्याकरण म्हणू नका, रोज नवनवीन विषय हास्यासाठी मिळतात. काही वेळा मात्र कळस होतो.

पूर्वी एखादी व्यक्ती गेली की ओळखीचे किंवा घरचे पेपरात निधनवार्ता म्हणून द्यायचे, त्याच्या भरी ला आता सोशल मिडिया ही आले आहे. त्यात चुकीचे असे काही नाही, उलट कमी वेळात जास्त लोकांपर्यंत बातमी पोचते.

अरे जिवंत माणसांचे काय हवे ते करा, ते सांभाळून घेतील स्वतःला पण जे एक तर अस्थीत रुपांतरीत झालेत किंवा सहाफूट जमिनी खाली गेलेत त्यांना तरी माफ करा.  ते कसे तर,

 •  कोणी नवीन पोस्ट दिली कि like करायलाच हवे असे गृहीत धरणारे बहाद्दूर अनेक आहेत, ते काही विचार न करता like  देवून मोकळे होतात.
 •  बातमी मराठी, हिंदी किंवा इतर प्रांतीय भाषेत असली तरी इंग्रजीत उत्तर देणारे काही कमी नाहीत. “RIP” चा अर्थ सगळ्यांना माहितच असेल याची मला खात्री नाही. कारण,
 • “RPI” लिहिणारे पण आहेत, एवढी कसली घाई असते, कि typing ची चूक दुरुस्त पण करता येत नाही. पण समजा “editing” जमत नसेल तर कोणाला तरी विचारावे, तर इभ्रत आडवी येते.
 • परवा तर कहरच झाला, RIP चा full form माहित असणाऱ्याने ने लिहिले “Rest in pieces”.

मी कपाळाला हात लावला.

सोशल मिडिया च्या अतिरेकामुळे खरे पाहता सगळ्याच भाषा “Rest in pieces” झाल्यात जमा होतात कि काय याची शंका आल्या शिवाय राहत नाही!

विचारांची गोधडी: “my space”

godhadi1या ना  त्या कारणाने वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या जागी,  आपण अनेक  विचार ऐकत, बघत किंवा वाचत असतो. त्यांची एक चित्र विचित्र गोधडी तयार होते. काही विचार पटतात तर काही नाही. काहीं बाबतीत आपण पुढे विचार करतो तर काही तेवढे पुरते ठेवतो. असेच काही विचार ज्यांनी मला विचार करायला लावले ते मांडत आहे.   त्यातील पहिला विचार किंवा गोधडी चा पहिला तुकडा आहे  “ज्याची त्याची स्पेस”.

 • नवरा बायकोचे जर एकमेका वर खरे प्रेम असेल तर त्यांना वेगळी अशी  “स्पेस” लागत नाही, असे कुठे वाचल्या सारखे आठवते. आणि हा विचार मनात खूप घोळत होता. हे बरोबर कि चूक कि दोन्ही हे समजत नव्हते. ते समजून घेण्यासाठी चा हा प्रयत्न.

‘Personal space’ हा शब्द हल्ली बऱ्याच वेळा कानी पडतो. सोबत जोडगोळी असतेच. ह्या असल्या गोष्टी म्हणजे “western world” चे चोचले. सुरवात करूया, स्पेस  पासून. ही स्पेस म्हणजे नक्की काय असते?

शाब्दिक अर्थात जरी स्पेस चा विचार केला तर असे दिसते कि, निसर्गाने space_2प्रत्येक जिवात, स्वतःच्या स्पेसची भावना अगदी जन्मतः  दिलेली आहे. ज्याला स्पेस मिळते, त्याची वाढ होते. फुलातून झाडातून हे दिसते. एका जातीची/ एका प्रकारची झाडे सुद्धा सारखी नसतात. याचे छान उदाहरण म्हणजे नारळाचे झाड. जी झाडे मोकळ्या जागेत लावली जातात, ज्यांच्या स्पेसच्या मध्ये, इतर झाडे किंवा वास्तू येत नाही ती झाडे सरळ वाढतात, गगनचुंबी होतात.  इतर झाडे मात्र सरळ न वाढता, त्या झाडा पासून किंवा वास्तू पासून लांब जातात. ज्या बाजूने सूर्याची किरणे जास्तजास्त मिळतील त्या बाजूस ती वाकतात. मोकळीक शोधत स्वतः साठी सूर्य किरणे गोळा करतात. फुलणाऱ्या गुलाबांची पण तीच तरह. जर अनेक फुले एकत्र असतील तर बाजूची नीट फुलतात. मधल्या फुलांना जागाच  उरत नाही. फुलणाऱ्या गुलाबांची पण तीच तरह. जर अनेक फुले एकत्र असतील तर बाजूची नीट फुलतात. मधल्या फुलांना जागाच  उरत नाही.

space_1घरातील लहान मुले सुद्धा, ज्यांची स्वतंत्र खोली नसते ती घरातील एक विशिष्ट जागा किंवा एक कोपरा आपलासा करून ठेवतात. फक्त माझी ही भावना असते. इतरांचे पण तसेच असते. एकाच घरातील माणसांची आवडीची जागा वेगवेगळी असते. आणि तसे नसले कि काय होते? सोपे … भांडण. तुझी जागा माझी जागा वरून. हे झाले प्रत्यक्षातील स्पेस बद्दल virtual space चा विचार करू.

जॉर्ज एस पेटन नावाचा एक अमेरिकी सैन्यातील जनरल होता, त्याचे एक सुंदर वाक्य आहे.

“If everyone is thinking alike, then somebody isn’t thinking.” किती योग्य वाक्य आहे.  मेंढे कसे एका पाठोपाठ जातात अगदी तसे.  आपल्याकडे म्हण आहेच “अति परिचयात अवज्ञा”. कुठल्या ही नात्यात जास्त जवळीक ही अयोग्यच. जिथे मोकळा श्वास नाही तिथे काहीच मोकळे नाही.

दोन व्यक्तींचे बऱ्याच वेळा एक मत होते. त्यांच्या आवडी निवडी ही सारखी असू शकतात पण म्हणून दोघांना उठता बसता सगळे सारखेच हवे असे म्हटले तर, चटकन जाणवते, त्यातील एक माघार घेत असणार. वाद नको म्हणून.  जेंव्हा एकमेकास स्पेस द्यायचे नाकारले जाते, तिथे योग्य ‘respect’ ची कमतरता असते. जेंव्हा दुसऱ्यास स्पेस द्यायचे लक्षात राहत नाही तेंव्हा माणूस हा स्वकेंद्री आहे आहे उगीच जाणावते.

गोधडी चा फोटो गुगल वरून घेतला आहे.

पूजा, वैशाली आणि सामाजिक ढोंगीपण

भारतात सुरु झालेल्या “स्वच्छ भारत अभियान”  विषयी चर्वण झाले, फोटो झाले, मोठ मोठ्या बातम्या छापून आल्या, बऱ्याच प्रसिद्ध व्यक्तींना सामील केले गेले, काही संघटना यांना हि आमंत्रण दिले गेले. जे झाले त्याचा खूप गाजावाजा झाला. असो.

जो वर्ग खरेच स्वच्छ भारत साठी रोज झगडत असतो, त्याचे काय झाले? “Who cares”, त्याची पर्वा न राजकारण्यांना आणि न जनतेला. राजकारणी कालचे आणि आजचे,  हे फक्त धोरणे तयार करणे, त्याचा गाजावाजा करणे, प्रसिद्धी मिळवणे आणि पुढे जाणे यात इतके रममाण असतात कि खऱ्या अर्थी अश्या योजनांचे काय होते याची त्यांना परवाच नसते. आणि आमच्या जनतेला काय होत आहे याची फिकीर नसून नवीन काय होणार आहे यात रस असतो.

परवा राष्ट्रपती भवनात विंग कमांडर पूजा ठाकूर यांनी इतिहास रचला. हे कौतुकास्पद आहे. पण आता वाट पहायची आहे ती जेंव्हा खऱ्या अर्थाने अशी एक वैशाली पण पूजा होऊ शकेल, गेला बाजार तिला सन्मानाने जगता येवू शकेल. नाही तर प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताच्या सांस्कृतिक वैभवाचे दिमाखदार प्रदर्शन जे होते ते थोतांडच्या पली कडे जाणार नाही. कारण पूजा एक दिवस गाजवते पण वैशाली आणि तिच्या सारख्या अनेक स्त्रिया एकाच दिवसात अनेक मरण मरत असतात. तुमच्या आमच्या देखत. 

 “सार्वजनिक संडास साफ करणं हे तिचं काम. रोजच्या रोज येणारे असहय़ अनुभव सहन करायला तिला ताकद मिळते ती ‘कशासाठी पोटासाठी’ या मंत्राची. वाचतानाही अंगावर काटा येणारे अनुभव तिला रोज घ्यावे लागतात. तरीही ती जगते आहे, समाजाची घाण उपसते आहे, त्या मेहतर वैशालीचे हे अनुभव.”

एका वैशाली चे अनुभव शनिवार च्या लोकसत्तेत प्रसिद्ध झाले आहे. 

“भोगले जे दु:ख त्याला – घाणीतच जगायचं नि घाणीतच मरायचं”

Silent Sunday Prayer

silentsunday_25jan15Nandi (Sanskrit: नन्दी) is the name for the bull which serves as the mount (Sanskrit: Vahana) of the god Shiva and as the gatekeeper of Shiva and Parvati. In Hindu Religion, he is the chief guru of eighteen masters (18 siddhas) including Patanjali and Thirumular.[1] Temples venerating Shiva display stone images of a seated Nandi, generally facing the main shrine.

For more check wiki page on Nandi