गोधडी भाग ३२: Sunny Sunday + Hiking + आलू पराठा

कहते हैं ” अकेला चना भाड  नाही झोंक सकता” तो क्या लेकिन अकेला शक्स पहाड चढ सकता है. वही काफी है.

जरा हवा सुधारली की एक रुपाली आणि समस्त नोर्वेजिअन घरा बाहेर पडायला हवेच. असे माझ्या “near and dear ” यांचे म्हणे आहे. तर आज रविवार वर सूर्य आणि हवा ठीक ठीक. सूर्य होता म्हणजे गरम असणार असे येथे नसते. गावात तपमान शून्यच्या जवळ पास होते . उन असल्याने थोडा फरक पडला होता आणि म्हणून डोंगरावर तपमान उणे ३ ते ५ डिग्री दरम्यान होते. येथे राहून योग्य कापडे घालायची सवय आपोआप लागते आणि मग नो टेन्शन. सकाळी अकरा ते दुपारी चार पर्यंत हवा बरी राहणार होती याची माहिती कालच मिळाल्याने  आज लौकर उठून तशी तयारी केली आणि खाणे- पिणेचे साहित्य (आलू पराठा हा महत्वाचा आईटम) आणि कॅमेरा सोबत घेतले.

नेहमीच्या सवयी प्रमाणे पहिला थांबा ११०० फुटावर घेतला. अंतर फार नव्हते (साधारण पणे  साडेतीन किमी) पण काही ठिकाणी चढण दमवणारी होती. छोट्या विश्रांती नंतर मस्त फिरले फोटो काढले. ठिकठिकाणची तळी  संपूर्ण गोठली होती. लोकांनी दगड, झाडाच्या फांद्या टाकून पाणी वर येते का बघण्याचा प्रयत्न केला होता. लोक तळ्यात पुढे जात नव्हते, कारण धोका आहे ची पाटी होती.  वर बर्फ घट्ट असला तरी खाली पाणी असणार,  मोठ्या फांद्या आपटल्या कि  मोठा प्रतिध्वनी ऐकू येत होते.

अजून पुढे जायचे होते आणखीन दोन तळी  बघायला पण झाले नाही. वाटेत काही ठिकाणी पूर्ण रस्ता बर्फ होता आणि तो घट्ट झाला होता. माझे बूट योग्य नव्हते.

वाटेत एका ठिकाणी जेवण घेतले, आलू पराठाचे आणि सोबत कडक कॉफी. छान उन होते पण प्रचंड गारठा जाणवत होता. काही वेळासाठी हातमोजे काढले तर बोटे सुन्न झाली. मग ती काढण्याची चूक केली नाही. घरी येवून अंतर मोजले तर आजची फेरी साडे आठ किमीची झाली आणि सर्वात उंच ठिकाण १३०० फुटावर होते.

गोधडी भाग २९: नवीन वर्ष-नवीन पर्व!

A single sunbeam is enough to drive away many shadows ~ Francis of Assisi

घरच्यांची माफी मागून माझ्या भटकंतीची कथा सांगते. तर झाले असे, या हिवाळ्यात नेहमी सारखा बर्फ अजून कुठे झालेला नाही पण सायबेरियातील थंड वारे पुढे आले असून हा समस्त देश गारठला आहे. उत्तरे कडे गेल्या आठवड्यात तपमान उणे ४१डिग्री होते. येथे उणे सहाच्या जवळ पास असावे. वाटताना ते उणे दहा असावे.

नवीन वर्षाचा पहिला दिवस ऊन होते आणि तपमान बरे असल्याने फिरणे झाले. अर्थातच वाटेत भेटणारे बरेचशे नोर्वेजिअन आणि अगदी तुरळक परदेशी होते. वर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्य दर्शन झाल्याने वर्षभर ते होईल अशी भाबडी आशा. त्या दिवशी काढलेले दोन फोटो देत आहे.

एक ते आठ तारखे पर्यंत तपमानाचा पारा बराच खाली असल्याने आणि ऑफिसात अजिबात फुरसत नसल्याने बाहेर जाणे झाले नाही. पण शुक्रवारी वीकेंड मूड, आटोपते काम आणि सर्वात म्हत्वाचे म्हणजे तपमान उणे चार वर आलेले असून वारा फार नव्हता. मग काय मी नेहमीच्या डोंगर वर जायचे ठरविले. डोंगर वरून झिरपणारे पाणी रस्त्यावर आल्याने जागो जागी घट्ट बर्फ साठला होता. चालताना खाली बघून सांभाळून चालावे लागत होते. पण हवा छान होती आणि हिवाळ्यातील सूर्य झाडा मागून सुंदर दिसत होता आणि त्याच्या उजेडात पाला पाचोळा पण आखीव रेखीव वाटत होता.  दोन तास भटकंती ने नवीन उत्साह आला.

फिरायला जाणे पूर्व नियोजित नसल्याने, कामाच्या वेळेत असल्याने आणि माझ्या e-calender वर नसल्याने घरी कळले नाही. संध्याकाळी फोटो दाखवून चकित केले आणि थोडा प्रेमळ दम पण खाल्ला.

I had my first mountain trip in the first week of 2016. I am looking forward to enjoy more of such trips in different places. Long walks are beneficial for both my physical and mental health.

Walk yourself happy

 

आरंभशूर

 रोजच्या एकसुरी आयुष्यात नाविण्य आणण्यासाठी आपण छंद जोपासतो. मित्र – मैत्रीण, परिवार, ग्रुप मध्ये चर्चा होते आणि मग छंदाला सुरुवात. एकदम जोर शोर से.

यात प्रामुख्याने  आलेले छंद म्हणजे,  व्यायाम – सकाळ/संध्याकाळ फिरायला जाणे, पुस्तक वाचन ( धार्मिक ग्रंथ पण आले ),  … यात आता ब्लॉग लिहिण्या (blogging) ची भर पडली आहे.

 सुरुवात होते  पण  सातत्य राहते का?

बहिणाबाई म्हणतात …

‘मन मोकाट मोकाट

याच्या ठाई ठाई वाटा

जशा वार्‍यानं चालल्या

पान्यावर्‍हल्या रे लाटा’


मग आज इधर और कल उधर. आज एक छंद उद्या दुसरा.

मी  analyst आहे हा काही माझा दोष नव्हे तेंव्हा माहिती हातात आली की त्याचे आकलन (analyse)  होणे हे स्वाभाविक आहे. थोडक्यात काय तर आदत से मजबूर.  बहिणाबाई परत असे ही म्हणतात…

‘मन वढाय वढाय

उभ्या पीकातलं ढोर

किती हाकला हाकला

फिरी येतं पिकांवर ‘

शेवटी मी  analysis करायचे ठरविले. एक लक्षात असू देत कि statistical  analyst ला एका unit/item मध्ये रस नसतो. तो संपूर्ण गटाचा अभ्यास करतो. मी तेच केले.

साधारणपणे  ४०० मराठी ब्लॉग्सचे अवलोकन केल्या वर असे दिसते कि

  •  साधारण पणे १० ब्लॉग्स पैकी ४ ब्लॉग्स ‘कविता, कथा, सिनेमा, करमणूक (entertainment)चे, १  खाणे/पिणे/पदार्थ करणेची माहिती विषयी, १ technology, १ चालू घडामोडी विषयी, १ फालतू आणि २ इतर विषयीचे असतात.
  •  सातत्य न राखणारे किंवा राखू न शकणारे, साधारणपणे  ५ posts मधेच गारद होतात.
  • आणखीन एक म्हणजे एका व्यक्तीने अनेक blog सुरु केले तर सातत्य राखणे कठीण असते किंवा हातात खूप वेळ हवा. नाहीतर लोकांचा कल एका विशिष्ट blog कडेच राहतो.
  • चालू न शकणारे काही personal blogs  आहेत किंवा होते, जे देशातील- विदेशातील बातम्या (चालू घडामोडी ) देतात. एवढी online मोफत वृतपत्रे मिळत असताना कोणी blog  का वाचेल?
  • तुरळक वेळा एकच post एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या blog वर दिसते.
  •  बरेच ब्लॉग्स जाहिरातींनी भरले आहेत.
  • साहित्य क्षेत्राशी निगडीत लोकांना ब्लॉग्सचा विशेष फायदा होताना दिसतो.
  • तसेच आपल्या productची अप्रत्यक्षपणे जाहिरात करणारे पण आहेत.

एवढा सगळा अभ्यासकरून मला काय करू नये एवढे मात्र समजले. आणि जे मला आवर्जून टाळायला आवडेल ते म्हणजे ब्लॉग वरून “पैसा मिळविणे “.