आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला !
मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते………
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा……
***
– कुसुमाग्रज
Tag: Marathi
गोधडी भाग ४४: शिकलेल्या तिची कथा – निमित्त जागतिक महिला दिन
तसेच काही घरात मालकीण बाई असू शकते. एकदम उलट परिस्थिती. टक्केवारी खूप कमी आहे. पण आहे. स्वतः ची कुवत काही नसतांना नवऱ्यावर उठसुठ चिडणाऱ्या, स्वतःचा न्यूनगंड लपविण्यासाठी, आपण किती त्रास सोसतो याचा पाढा कायम वाचणाऱ्या बायका पण समाजात असतात. तिथे तो बिचारा असतो. तरी त्याला “चॉईस ” असतो कारण तो दिवसाचा जास्त वेळ बाहेर असतो. आणि मग तो हळू हळू तिला टाळू लागतो.
घर आणि मुले ही तिची जवाबदारी असते! दिवसभर काम करून त्याचे दमणे साहजिक असते आणि तिला मात्र तिथे ही “चॉईस” नसतो. आपण बातम्या आणि राजनीती वर चर्चा बघतो, फुटकळ वेळेत ती आव आणून घरांत (भरीला सोशल मीडिया पण आहे ) वर करतो म्हणून आपण शहाणे असे वाटणारे महाभाग पुष्कळ आहे. पण ती बघत असलेली मालिका नेहमी भिकारडी असते.
जिथे एकमेकां बद्दल आदर असतो, ओढ असते, एकमेकांसाठी वेळ असतो आणि घरात दोघे मिळून निर्णय घेतात तिथे असे दिवस साजरे करावे लागत नाही. तुमच्याकडे असे दिवस साजरे करण्याची वेळ येऊ नये या साठी शुभेच्छा!
याला जीवन ऐसे नाव…
एक आई व्हेंटिलेटर वर आहे. येत्या सहा तारखेला तिचा वाढदिवस आहे.
तिची तीन मुले तीन ठिकाणी असतात. आज उद्यात सगळे तिच्या जवळ पोहोचतील.
शक्य तो लाईफ सपोर्ट काढणारच कारण ती कसला ही प्रतिसाद देत नाही आहे. तिच्या इच्छापत्रात अजून काही औषध उपचार करू नये असे नमूद केले आहे.
मुलांचा जीव कासावीस झाला आहे आणि तो होणारच.
..
..
..
काय झाले जर तिची मुले ७७, ७४ आणि ७० वर्षा ची आहेत आणि ती येत्या सहा तारखेला एकशेएक वर्षाची होणार आहे. शेवटी आई ती आईच.
सावरकर, पुलं आणि या सारखे अनेकांना मरण नाही!
स्वतःच्या वीस वर्षाच्या मुलाला सबंध दिवस अभ्यासाच्या टेबलाजवळ पाहून जे कोणत्या ही सामान्य आईला वाटेल अगदी तसेच मला वाटते. ना राहून शेवटी मी चाचपडत प्रश्न विचारला, उद्या परीक्षा आहे का?
उत्तर आले “नाही”.
मग!
अभ्यास आहे, प्री-Ph.D. कोर्सेसचे सबमिशन आहेत आणि पुढच्या वीकएंडला एक कॉन्फरन्स आहे त्याचे प्रेझेन्टेशन तयार करायचे आहे.
काय ना, “क्षण तो क्षणांत गेला” असे वहायला नको.
आता मात्र मी बोटें तोंडात टाकायची बाकी होते! मी प्रश्न टाकायच्या आधीच म्हणाला, तुला आठवत नाही का, अगं “शत जन्म शोधिताना” मध्ये आहे.
मी सावरकरांना मनातल्या मनात धन्यवाद दिले.
सावरकर, पुलं आणि या सारखे अनेक भौतिक रित्या हयात नसले तरी ते आपल्यातच आहेत. वेगवेगळ्या प्रसंगी त्यांची आठवण निघत राहते आणि मग जाणवते की या थोर माणसांना मरण नाहीं हेच खरे!
tip: मला तो अभ्यास करतोय याचे नवल वाटत नसून त्याला “शत जन्म शोधिताना” आणि पर्यायाने सावरकर लक्षात आहेत याचे कौतुक वाटते!
गोधडी भाग (आठवत नाही) : आमचीच लाल!
तर मित्रांनो यंदा मी दिवाळी निमित्त आतिशबाजी प्रत्यक्षात न पाहता फेसबुक वरून पहिली. ती कशी, आम्ही भारतीय दुसऱ्या धर्मा बद्दल, दुसऱ्या जाती बद्दल अतिशय पोटतिडकीने विनोद/ चेष्टा/ जोक करतोच. यात आमचा हात एक ब्रिटिश धरू शकला तर, पण त्याने त्यावर केलेला विनोद आम्हास कळला तर बेहेत्तर.
मूळ मुद्दा हा की हि अतिशबाजी मी मोती साबण, त्याचा कागद/चांदी, त्याची साठवण, आठवण… नंतर वेगवेगळ्या लाडवाचे आकार, त्यांचे प्रकार आणि त्यातील बेदाणे या वर पाहिली/वाचली. तुम्ही जाणकार मंडळी नी अर्थातच ती वाचली असणारच म्हणून ती माझ्या पर्यंत पोचली. आणि हो पुढे जाऊन विनोद बेशिस्ती आणि गबाळे राहणे किंवा टापटीप न राहणे वर देखील होते. थोडक्यात काय तर आम्ही मराठी माणसे आपापसात पण एकोप्याने राहू शकत नाही. बरे आता कसला हि टेंभा मिरवायचा झालाच तर एक सत्यकथा सांगते.
त्या आधी एक फॅक्ट, महाराष्ट्राच्या उत्तरे कडे म्हणजे मध्यप्रदेश आणि पुढे, मराठी माणसाला “कढी-चट” हे टोपण नाव आहे. कारण काय तर म्हणे ती फडतूस ताकाची कढी देखील मराठी माणूस शेवटी सोडत नाही, तर चाटून संपवतो. आणि मराठी माणसात सगळे आले, सब घोडे बारा टक्के.
आता सत्यकथा, मी युनिव्हर्सिटीत शिकत असताना एकदा माझी एक प्राध्यापिका (अतिशय सज्जन बाई असे प्रत्येकाचे मत होते नव्हे अजून आहे!) मला म्हणाली मराठी माणसे चांगली पण काय ग तुमच्या पद्धती. मी अर्थातच चाट पडले. प्रश्न बोलून दाखवावा लागला नाही. किस्सा असा, ” काल मी एका जुन्या विद्यार्थिनीच्या लग्नाला गेले होते. दुपारचे लग्न होते आणि त्यात काल पाऊस होता. जावे कि नाही याच्या विचारात होते पण आग्रहाचे आमंत्रण होते म्हणून इथला तास संपवून गेले. मंगल कार्यालयाच्या बाहेर बरीच गर्दी दिसली. माणसे हळू हळू पुढे जात होती. पाऊस असल्याने सगळ्यांची पंचाईत होती. मी दारा जवळ पोचल्या वर कळले की दारात दोन्हीं पक्षाचे लोक याद्या घेऊन उभे होते. आलेला पाहुणा तुमचा कि आमचा याची खात्री करून आणि त्याचे नाव खोडून आत सोडत होते. किती ग चिकू पणा हा. मी वेगवेगळ्या समाजातील लग्न पहिली हि अशी मात्र पहिलीच वेळ”. आम्हीं का तुमच्या मंडळींचे जेवणाचे पैसे द्यायचे हा सरसकट मुद्दा असावा. माझ्या तो वरच्या आयुष्यातला हा असा पहिलाच प्रसंग. मला काय म्हणावे सुचेना. आडनाव विचारले तर दोन्ही बाजू ची मंडळी एका पोटजातीची नसून शत्रू पक्षातील (हे ही आपणच ठरवले आहे) होती. कोणाला वेगळं म्हणायची सोय नाही.
लग्ना नंतर सासरी घरांतल्या मंडळी कडून ओळखीच्या एका लग्नाचा असाच किस्सा ऐकला, त्यात वधूचा भाऊ का कोण त्यांच्या कडील यादी घेऊन फिरत होती. खातरजमा करून आपल्या यादीतील लोकं मोजत होता. शेवटी वराकडच्या एका जेष्ठाने सांगितले कि पैशाची तुम्ही काळजी करू नका, आम्ही बघतो पण माणसे मोजायची नाही.
तर बोला आता. तुम्ही शहाणे कि आम्ही शहाणे!
प्रगती / Improvement!
आधी आईच्या आणि नंतर सासूबाईंच्या तालमीत स्वयंपाकात मी इतके तरबेज झाले की आता नवऱ्याच्या आणि मुलाच्या हाताखाली वावरत असताना माझ्या हातून कमी चुका होतात.
नवरात्र चालू आहे, स्त्री जागर चा काळ आहे तेंव्हा याला हसण्यावारी घेऊ नका.
I am thankful to my mother & my mother-in-law who have trained me so well in cooking. Just because of them i make less mistakes when i am serving as sous chef to my husband or my son these days 😀
वस्त्र उद्योग: गम्मत!
काल रात्री नॉर्वेत गाऊन/मॅक्सी घालून शतपावली घालणारी आजी बघितली आणि मी चाट पडले (सुदैवाने खाली पडले नाही)!
अर्जुनाला विश्वरूप दर्शन झाले होते म्हणे, आमचे एवढे भाग्य थोर कुठे, आम्हाला फक्त भारत दर्शन. गम्मत वाटली.
मड्डम्मा रात्री झोपताना नाईट गाऊन घाली, त्याची आमच्या काकू मंडळींनी ( हा एक सुपर सेट आहे, फूट पाडू नका) मॅक्सी केली आणि ती शयनकक्ष सोडून दिवाणखान्यात आली. आता तर हिला लोकाश्रय आहे! तर मंडळी भारतातील गल्ली बोळातील मॅक्सी नॉर्वेत येऊन ठेपली. आपण सर्वांचे अभिनंदन.
तिची कथा
ती जिवंतपणी जळत होती तेंव्हा ती नव्हतीच मुळी, ती गेल्यावर मात्र तिचा तेज, तिची उब सर्वांना जाणवते.
दुखणी
वर वर पाहता वेगळी वाटली तरी प्रत्यक्षात मात्र जगातील सर्व आयांची दुखणी जवळ पास सारखीच असतात.
Recalling Rhododendrons
रोढोडेन्ड्रॉन (rodhodendrons ) किंवा रोडीस हि फुलं मी भारतात कधी हि पहिली नव्हती. पण इंटरनेट वरून ही हिमाचल प्रदेश आणि त्याहून उत्तरे कडे, आणि उत्तर – पूर्व राज्यात होत असावी असे कळले. मध्यंतरी एका ब्लॉग वेळ वाचले होते कि सिक्कीम मध्ये आणि जवळील भागात हि फुले खूप मोठ्या प्रमाणात आढळतात.
Information on Sikkim Trek from web:
You must be logged in to post a comment.