गोधडी भाग २८: जैसा देश तैसा वेश (When in Rome…)

                  When in Rome do as the Romans do!                                                                        Mountain hiking on an ugly day in November

माझ्या लिखाणतून मी अनेक वेळा इथली माणसे (नोर्वेजिअन) आणि त्यांचे जीवन या बद्दल सांगते. हेतू एवढाच की एका सर्वसामान्यच्या नजरेतून तुम्हाला ही ते पाहता यावे. येथे कामाच्या वेळात आम्हाला आठवड्यातून दोन तास शारीरिक व्यायामा साठी मिळतात. मात्र कायदा असा कि ते ऑफिसला आल्या नंतर आणि घरी जायच्या आधी असले पाहिजे. नाही तर काही बहाद्दर दोन तास दांडी मारून व्यायाम केला असे सांगायचे. आणि हो त्यात आणिक एक अलिखित नियम, जर काम जास्त असले तर व्यायाम ला सुट्टी. असे नेहमी होत नाही पण काही वेळा व्यायाम चुकतोच.

माझे ही मागील काही आठवडे, काम आणि प्रवास या मुळे व्यायामा कडे सपशेल दुर्लक्ष झाले. आणि त्यात भर अशी कि ऑफिस मधील व्यस्त असल्याने कोणी एकमेकास विचारले नाही. असो.  माझी एक सहकारी ( वय वर्ष ५५ ) गावातील एक डोंगर ज्याला stoltzekleiven म्हणतात, तेथे नेहमी जाते, office hours training साठी आणि काही वेळा वीकेंड ला पण. या डोंगरवर जाण्या साठी साधारण ९०० पायऱ्या आहे. दर वर्षी सप्टेंबर च्या शेवटच्या शुक्रवारी तेथे दौड असते. पुरुषांचा रेकोर्ड आहे ७.५८ मी आणि स्त्रियांचा ९.५३. अधिक माहिती वाचायची असल्यास खाली लिंक देत आहे.

http://www.tripadvisor.com/Attraction_Review-g190502-d6491552-Reviews-Stoltzekleiven-Bergen_Hordaland_Western_Norway.html

तर परवाच्या शुक्रवारी माझ्या सहकारीची या वर्षीची शंभरावी फेरी होती. खूप अभिमानाची गोष्ट होती. आणि अर्थातच ऑफिस मध्ये तिचा सत्कार झाला. नोव्हेंबर हा महिना हवा अतिशय खराब असते. खूप पाऊस  आणि वारा. सूर्य दिसेल न दिसेल. एकदम depressing अशी हवा. त्यात पण तिच्या या महिन्यात stoltzen च्या ५ फेऱ्या झाल्या. हे ऐकून मला शरमल्या सारखे झाले. काम आहे. पण आपल्या बाहेर न जाण्या मागे हवा कारण नाही ना. असे मनात येवू लागले आणि मी अचानक ठरवले आपण stoltzen नाही तर जवळचा डोंगर तरी चढावा. शुक्रवार होता आणि काम आटोपत आले होते. या डोंगराची मला सवय आहे. तेंव्हा ठरले. तर दोन तासात मी मस्त पावसात फिरून आले. तापमान साधारण ८-९ डिग्री होते. सुरवातीला गारवा जाणवला, पण १००० फुट वर चढत गेल्यावर विशेष काही जाणवले नाही. वाऱ्याचा घोंगाट मात्र खूप होता. त्या वेळी काढलेले फोटो देत आहे. वाऱ्याचा आवाज मी रेकॉर्ड केला आहे. बघते upload  होतो का.

On last Friday,  in spite of the bad weather I went for hiking on mount Fløyen  after being inspired by one of my colleagues.

 

 

गोधडी भाग २७ : याला जीवन ऐसे नाव

रोज भवताली घडणाऱ्या गोष्टी काही वेळा आपले सगळे positive विचार बाजूला  सारतात. आपण किती ठरवले कि चांगले विचार मनात आणायचे तरी दुखी आणि त्रास देणाऱ्या गोष्टींना गव्हातल्या खड्या प्रमाणे बाजू सारणे सोपे नसते. किती तरी कोडी अशी असतातत ज्यांची उकल सापडत नाही.  आणि त्यात सोशल मिडिया वर येणारे “quotes” भर पडतात.  प्रश्न फक्त मलाच पडतात असे नाही अनेकांना पडत असणार पण प्रत्येकाची विचार करायची आणि त्यातून बाहेर पडायची पद्धत वेगळी असते. शेवटी सगळ्यांना सगळेच जमते असे नाही.

एक वाक्य आहे,

Life is not fair“.

आयुष्यात सगळी कडे “logic” दिसत नाही.  सगळी कडे ते “fuzzy” जास्त जाणवते. उपाय मात्र शून्य.  तर या फझीनेसची उदाहरणं बघू…

 • एकाच क्षणाला अनेक बाळ जन्माला येतात पण त्यांचे नशीब सारखे नसते. त्यांच्या ग्रहमाना बद्दल म्हणाल तर एकाच हॉस्पिटल मध्ये, किंवा एकाच कुटुंबात एकाच वेळी मुले जन्माला येतात पण त्यांना जे मिळते ते सारखे नसते. कां ?
 • एका घरात सगळे कष्ट करणारे असतात. पांघरून बघून पाय पसरतात पण त्यांच्या चिंता कमीच होत नाही. आयुष्य आज सुधारेल उद्या सुधारेल ह्या आशेवर माणसे येतात आणि जगाचा निरोप घेतात. कां?
 •  काही जण “happy go lucky” असतात, ते फार मोठं किंवा वेगळं करण्याच्या फंदात पडत नाही पण त्यांना हवे ते,  हवे तेंव्हा ताटात वाढल्या प्रमाणे मिळते. कां?
 • काही जण स्वार्थ याच्या पली कडे जात नाही पण आयुष्य मजेत जगतात. त्या वागण्यामुळे इतरांना त्रास झालेला त्यांना कधीच कळत नाही. आणि आयुष्यात उलट प्रसंग हि कधी येत नाही तेंव्हा आपल्या बरोबर असे केले तर काय वाटते याचा काही अनुभव त्यांना येत नाही. कां?
 •  काही जण  आयुष्यात नाटक करण्या पली कडे काही करत नाही पण त्यांचे कुठे हि अडत नाही. कां?
 • देवावर श्रद्धा (अंधश्रद्धा नव्हे) असणारी माणसे खितपत पडलेली असतात आणि देवा वरच्या श्रद्धे चा बाजार मांडणारी किंवा ग्लोरिफिकेशन करणारी माणसे समाजात मोठ्या तोऱ्याने मिरवत असतात. कां? पेपरात आणि सोशल मिडिया वर अशी उदाहरणे हवी तेवढी सापडतील.
 • आई-वडील आणि घरातील जेष्ठ यांचे करणारे चक्रव्यूत अडकलेले दिसतात आणि आई वडिलांची काळजी घेतो असे नाटक करणारे मजेत जगतात. कां?
 • प्रत्येकाला कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी एक सारखा काळ आणि इतर पाठबळ मिळत नाही. कां?
 • आयुष्यात मुंगीला न दुखवणारी माणसे मुंगी एवढ्या सुखा साठी तीळ तीळ जळतात. कां?
 • जे सर्व सामान्य माणसांना मिळते तेवढे हि काही लोकांना मिळत नाही. कां?
 • काही लोक आयुष्य कधीच ताठ मन करून जगू शकत नाही, तशी संधी त्यांना मिळत नाही. कां?

काळोख्या रात्री नंतर सूर्य प्रत्येकाच्या आयुष्यात कां उगवत नाही???

Many people don’t deserve what they get and many people don’t get what they deserve“.

असे का होते? ” भगवान के घर देर है अंधेर नाही” हे आणि अशी वाक्ये सिनेमा, नाटक किंवा मनोरंजन किंवा “दिल बहलाव्या”  साठी असतात का?

आणि मी कपाळाला हात लावला – २

पूर्वी आपल्याकडे सांगायचे आपण सर्वांशी चांगले वागलो की सर्वजण आपल्याशी चांगले वागतात.  अजून देखील सांगत असतील, नाही असे नाही पण मला १००% खात्री नाही. कां ?

लहान मुले सुट्टीत वाट्टेल तिकडे खेळायची, कोणाचे तरी लक्ष असणार याची घरच्यांना खात्री आणि परत जावून जावून जाणार कुठे हि भावना पण मनात असायची. थोडक्यात लोकांचा एकमेकां वर विश्वास होता. आता कोणी खाऊ दिले तर घ्यायचे नाही, कोणी जवळ बोलावले तर जायचे नाही. असे करायचे नाही आणि तसे करायचे नाही याची एक मोठी फेरीस्त असते. यात चूक कोणाची? छोटेच कशाला मोठ्यांना ही घरा  बाहेर पडताना अनेक सूचना ऐकाव्या लागतात. आपण स्वतंत्र किंवा मोकळे आहोत का आणि नसू तर यात आपला दोष आहे का?

गेल्या आठवड्यात नॉर्वेत मला बस ने प्रवास करण्याचा योग आला. संध्याकाळची वेळ होती. एका लहानश्या गावातून प्रवास सुरु झाला. बस मध्ये बरेच (१०-१२) प्रवासी होते. शेवटी ५ -६ पुरूष चढले. ते आखाती देशातील वाटत होते. रंगाने उजळ होते पण किरीस्ताव नव्हते. केस काळे होते. दाढी वाढलेली होती. प्रत्येकाच्या हातात एक लहान पिशवी होती. बस मध्ये चढायच्या आधी ते सर्व सिगरेटी ओढत खाली उभे होते. त्यांच्या भाषेत हलक्या आवाजात चर्चा चालू होती. हात वारे करणे चालू होते. थोडक्यात काय तर सगळ “फिशी” वाटत होत.

माझ्या प्रमाणेच इतर काही सहप्रवासी त्यांच्या हालचाली वर लक्ष देवून होते. शेवटी बस सुरु झाली. त्यातील काही पुढे बसले आणि काही शेवटी जावून बसले. मधल्या जागा रिकामी असून सुद्धा.

नॉर्वेत वस्ती तुरळक ठिकाणी आहे. जंगल आणि ओसाड भाग बऱ्याच  प्रमाणात आहे. त्या दिवशी प्रवासात माझे काही लक्ष लागेना.  नेहमी निसर्ग पाहणारी मी पण काही बघणे झाले नाही. दिसत असून बघितले नाही.   राहून राहून शंका वाटत होती. त्या लोकां  कडे लक्ष जात होते. साधारण ४५ मिनिटे प्रवास झाल्या वर बसला फेरी वरून पाणी ओलांडावे लागणार होते. येथे असे बरेच भाग आहेत जिथे पाण्यावर पूल नाही तर दळणवळण साठी फेरीची सोय आहे. मोठ्या फेऱ्या माणसे आणि वाहने एका बाजूने दुसऱ्या बाजूला नेतात. ते पाणी ओलांडायला फेरीला २० मिनिटे लागणार होती अशी सूचना मिळाली. तेंव्हा मी वाऱ्यासाठी बस मधून उतरले. माझ्या सोबत ते सर्व जण बस मधून बाहेर आले. दोघा दोघाच्या गटात ते  फिरू लागले. विशेष म्हणजे ते एकत्र नव्हते. ती वीस मिनिटे शंका कुशंकेत गेली. त्यानंतात अर्ध्या तासाने बस एक अतिशय लहानश्या गावात आली. वस्ती म्हणाल तर खूप कमी. बस थांबायच्या आत एक माणूस चालक कडे गेला आणि काही बोलला. मग मागे येवून साथीदारांना काही सांगू लागला. बस थांबल्या वर कळायच्या आत ती माणसे खाली उतरी सुद्धा.  जसे आले तसेच गेले.

“precaution is better than cure” हे वाक्य राम नामा सारखे ऐकतो. पण या मुळे होते काय? आपण आपले मानसिक स्वात्रंत्र पण घालवून बसलो आहोत. त्यात भरी ला दूरदर्शन आणि वृतपत्र आहेच. समाजातील चांगल्या गोष्टी आपल्या पर्यंत पोचतात का माहित नाही पण समाज सुरक्षेच्या नावा खाली घाबरवून सोडणाऱ्या बातम्या मनात घर करून राहतात. त्याचा परिणाम? आज एकमेकांवर विश्वास ठेवणे कमी झाले आहे.

त्याचा परिणाम मी माझ्या प्रवासाचा तो काळ मनावर दडपण ठेवून केला. सुंदर निसर्ग असून सुद्धा मी भीती खाली होते. खरे तर मी कपाळाला हात लावला, लाज वाटली म्हणा हवे तर. आपण किती दूषणे मनात साठवून ठेवतो हे जाणवले. माणसांचे दिसणे, त्यांचे वागणे, त्यांच्या हालचाली मुळे आपण ते बरे कि वाईट  याचा शिक्का वेळ न घालवता लावून टाकतो. माझ्या मनातील ही आकसपणाची भावना मी घालवायचे ठरविले आहे.

शुभं भवतु

गोधडी भाग २६: तद्रूपत

आजचा गोधडी चा तुकडा लोकसत्तेतील लेख “‘आज, आत्ता, इथे’” ह्यावर बेतलेला आहे.

तद्रूपत म्हणजेच एकाग्रता, तन्मयता, तंद्री. आपण रोज नाना गोष्टी करतो पण त्यातल्या किती गोष्टी करताना आपण संपूर्ण अनुभव घेतो किंवा किती गोष्टी आपण आकंठ बुडून करतो?

लेखातून…

“जॉन कोबाल्ट झिन या मानसशास्त्रज्ञाने तद्रूपतेवरील संशोधनातून असं दर्शवून दिलं की, जे लोक असे अनुभव वारंवार घेतात त्यांची रोजची प्रतिकारक्षमता अधिक बळकट असते. त्यांच्या हव्याशा भावनांमध्ये वाढ झालेली दिसते. इतकंच नाही तर स्मरण/आकलनासारख्या प्रक्रिया मेंदूतील ज्या भागांवर (ग्रे मॅटर) वर अवलंबून असतात त्यांच्या घनतेमध्येही वाढ झालेली आढळते. अशा व्यक्तींबाबत विध्वंसक वागणुकीची शक्यता जवळजवळ शून्यावर येते.”

“आपण फक्त निरीक्षण करायचं. काय मनापासून होतंय? काय लादलं जातंय? कशात निखळ आनंद आहे? कशाचं ओझं झटकावंसं वाटतंय? स्वत:ला कुठलीही लेबलं (दूषणं) न लावता अशा वेळी स्वत:चा स्वीकार करता येतो. आपल्या अधिकाधिक कृती जास्त निश्चितपणे ठरवून आणि ‘स्व-खुशीने’ होतात. (त्यात शारीरिक-मानसिक ताण असला तरीही!) किती तरी चाकोरीबाहेरच्या कल्पना ज्या मनात अंधूकपणे लपलेल्या असतात त्या आकार घ्यायला लागतात.”

थोडक्यात आपण आपल्याशी मैत्री वाढवावी. रोजची सर्व कामे आपणास आनंद देत नाही पण ह्या न त्या कारणाने काही गोष्टी करणे आपल्याला आवडते. त्या गोष्टी लहान का असेना पण वेगळा आनंद देतात. आपण कोणाच्या ही नकळत प्रफुल्लीत होतो. जेंव्हा हे रसग्रहण करणे वाढते तेंव्हा आपली एकाग्रता ही हळू हळू वाढू लागते. आपल्याला आपलाच हरवलेला सूर सापडतो. आणि मनावरचा ताण जावून आपण “या क्षणी ” जगायला शिकतो.

संदर्भ: http://www.loksatta.com/aajchepasaydan-news/amazing-facts-about-the-human-heart-1149078/

गोधडी भाग २५: निसर्ग/ Nature

Nature does not hurry yet everything is accopmlished ~ Lao Tzu

काल दुपारच्या फेरी वेळी काढलेली काही छायाचित्रे देत आहे. दुपारची फेरी ऐकल्यावर वेगळे वाटते. आपल्या कडे फेरी एक तर सकाळी नाही तर संध्याकाळी /रात्री. येथे मात्र हवामान अंदाजावर वर सर्व ठरते. काल  हवा काही वाईत नव्हती. ढग-उन होते, ढगच जास्त. वारा नव्हता आणि तपमान साधारण १३ डिग्री से. एकूण काय तर बाहेर पडायला हवा चांगली होती. आधीच गावात माणसे कमी आहेत त्यात सुट्टीचा काळ (autumn break) असल्याने बहुतेक नोर्वेजिअन डोंगरा वर पोहोचलेत.

गोधडी भाग २४: एक क्षण आनंदाचा

कसली हि प्रस्तावना न करता एक प्रसंग सांगते. आज सकाळी ६ चा दरम्यान बराच काळोख होता. हसू नका. खरेच काळोख होता, काल पर्यंत काळोख जाणवत नव्हता.  उत्तरे कडे उन्हाळा संपून आता autumn येत आहे, आलाच म्हणा. या वर्षीचा extended summer किंवा late summer संपला आता. सकाळी ढग नव्हते. स्वयंपाकघराच्या खिडकीतून वर पाहते तर पूर्वेकडे एक छोटासा तारा लुकलुकत होता. भल्या मोठ्या डोंगरवर आकाशाचे मुकुट होते आणि त्यावर तो तेजपुंज. इतके दिवस त्याच्या अवती भवती इतका उजेड होता कि त्याचे असणे जाणवले नव्हते. आज ते जाणवले. मन प्रसन्न झाले. मला आनंदी होण्यासाठी फार मोठ्या गोष्टी लागत नाही  ( उंचे लोग उंची पसंत, हे बिरुद लागू पडत नाही). मस्त वाटले त्याला बघून. एकदम positive. दिवस छान जाणार याची हमी वाटली. एवढासा तारा पण केवढा विश्वास जागवून गेला.

त्या इवल्याशा ताऱ्या प्रमाणेच आपल्या आयुष्यात अनेकजण वावरत असतात फक्त त्यांचे अस्तित्व आपल्याला जाणवत नाही. इतर मोठ्या ताऱ्यांचा प्रकाश त्यांचे असणे जाणवू देत नाही. पण जेंव्हा इतरांचा उजेड कमी होतो तेंव्हा हे छोटे तारे आपल्याला सोबत करतात.

काही वेळा आपण तो तारा असतो. लोक आपल्याकडे दुर्लक्ष करतात, त्यांचे लक्ष सूर्य आणि चंद्र वेधून घेतात. आपण खचून न जाता आपले असणे टिकवून ठेवायचे.  कोणजाणे  कधीतरी आपले नुसते असणे सुद्धा कोणाला क्षणाची सोबत करून जाईल.

Keep a little fire burning; however small, however hidden.

 ~Cormac McCarthy 

गोधडी भाग २3: वारी (odyssey + passion)

“Surround yourself with people that reflect who you want to be and how you want to feel, energies are contagious” 

आपल्या कडे (महाराष्ट्रात) वारीला न चुकता जाणारी बरीच मंडळी आहे. दर वर्षी नेमाने ते वारी करतात. वारी हा त्यांच्या आयुष्याचा भाग आहे. तसेच उत्तरे कडे वैष्णव देवीला जाणाऱ्यांचे आहे. कदाचित इतर राज्यात पण अश्या परंपरा असणार ज्यांची मला माहिती नाही. माझ्या लहानपणी वेगवेगळ्या यात्रा असायच्या. या यात्रांना जाणे वारी करण्यासारखे होते. कुठे ही फार सोयी नसायच्या मग मंडळी मैल न मैल चालत जायची. घरी परत आल्यावर शारीरिक थकवा असला तरी प्रचंड समाधान असायचे. तो आनंद  उसणा नसायचा.  अश्या पद्धती ने वारी करणारे आणि नुसतेच देवळात जाणारे यात फरक असतो.

मला आता येथे वारी आठवण्याचे कारण म्हणजे “नोर्वेजिअन” मंडळी आणि यांच्या सवयी. निसर्गाशी यांची जवळीक. सगळी साधने हाताशी असताना पण डोंगर आणि फिरायला जाणाऱ्या अश्या जागा आहेत जिथे वाहन नेता येत नाही. फिझीकल फिटनेस पायी डोंगरावर धावणारे आहेत तेवढच किंबहुना जास्त कुटुंब वत्सल लोक नियमित डोंगरवर फिरायला जाणारे आहेत. आणि ती नुसतीच हजेरी टाकत नसतात तर झाडत जावून मुलांना काही बाही दाखवत पण असतात. दगड , काठ्या, पाने गोळा करणे आणि ते रचवणे, वसंत – उन्हाळ्यात  मुली रान फुलांना गुंफून त्याचे मुकुट ( tiara) किंवा बेंड करतात आणि मस्त फुलंराणी प्रमाणे बागडतात. त्यांना बघितल्या वर आपले आदिवासी आठवतात किंवा शकुंतला – दमयंती चे कॅलेंडर वरील चित्र.

वीकेंडला ही मंडळी घरातील कामे करतात, गाडी सफाई, घर सफाई (खिडक्यांच्या काचा पुसण्या पासून ते अंगणातील गावात काढण्या पर्यंत), आणि मुख्य म्हणजे कुटुंबासह वेळ घालवतात. बरेच आजी आजोबा आपल्या नातवंड सोबत डोंगरा वर दिसतात. पाहून गम्मत वाटते. नेमाने न चुकता ते वेगवेगळे डोंगर चढतात आणि आनंदी घरी परततात.

हे सर्व मी लिहित आहे तो माझा अनुभव आहे ऐकीव नाही, एवढ्या वर्षात माझी नोर्वेजिअन मित्र मंडळी आणि सहकार्यांचा माझ्यावर खूप प्रभाव पडला आहे.  त्यांनी वेळोवेळी मला आपल्यात सामील करून घेतले आणि नोर्वेजिअन संस्कृती मला अनुभवता आली.  काही गोष्टी आता अंगवळणी पडल्या आहेत. त्यातली महत्वाची  म्हणजे डोंगरावर जाणे. व्यायाम तर होतोच पण निसर्ग जवळून अनुभवता येतो आणि स्वतः ला वेळ दिला जातो. कोणी बरोबर असले तर उत्तम आणि नसले तर दुखः नाही.  सोबत आता फोटोग्राफी आहेच.

गावात मध्यावर एक डोंगर आहे,  सर्वांचा आवडता जिथे २४ x ७ लोक असतात. वर टोकाला जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. त्यातील एक माझा आवडता. मी कितीही प्रयत्न केला तरी या लोकां सारखी क्षमता माझ्यात नाही हे माझ्या लक्षात असून मी माझी मर्यादा सांभाळून चालणे – डोंगर चढणे असले व्यायाम प्रकार करते. तर त्या मार्ग वरील एक ठिकाण आहे, जेथे मी रोज जाणे पसंत करायचे.  कित्तेक महिने ते मी केले पण मग जागा बदलली आणि त्या जागी जाणे  झाले नाही. म्हणजे मी घरात बसून होते असे नाही तर नवीन भाग एक्स्प्लोर करत होते. पण काही हि असले तरी पूर्वीची जागा साद देत होती आणि काही महिन्यांनी तेथे जाणे  जमले. खूप आनंद झाला. एक बरे मी एकटी होते त्यामुळे माझ्या जुन्या मित्रांना भेटता आले. त्या वाटेवरील किती तरी झाडे, दगड, शेवाळे आणि झाडांच्या सावल्या चे मनसोक्त निरीक्षण करता आले आणि फोटो काढता आले. तर काल जे मी अनुभवले त्यातील काही फोटो येथे देत आहे. तुम्हाला आवडतील या आशे वर.

Stunning view point at Mt. Fløyen ( 320m(1050 ft ) above sea level).

गोधडी भाग २२: The first signs of Autumn

काळ कोणासाठी थांबत नाही. जसा आम्ही काही गोष्टींत गर्दी करतो किंवा आळस करतो अगदी तशाच रीतीने आमच्या कळत नकळत निसर्ग रंग बदलतो. नॉर्वेत या वर्षी उन्हाळा उशिरा आला, चेरी बेरी येतायेत म्हणे पर्यंत Autumn (शरद ऋतू) च्या खुणा जाणवू लागल्या. ही तर नुसतीच  चुणूक आहे. पुढे खऱ्या अर्थी जेंव्हा शरद स्थिरावेल त्यावेळीस रंगांची लाल-पिवळी- केशरी छटा बघायला मिळेल. पुढचे पुढे सध्या एवढेच.

… आणि मी कपाळाला हात लावला…

आज पासून मी एक नवीन सदर सुरु करत आहे… आणि मी कपाळाला हात लावला…

तुम्ही लावता का कपाळाला हात? लहानपणी ऐकले होते असे करू नये, पण आजकल  बऱ्याच वेळा हे आपोआप घडते. काय करणार प्रसंगच असे येतात. काय आहे ना कि लोकांचे चित्र-विचित्र वागणे बघितले कि त्यांचा राग येण्यापेक्षा कीव येते.  आणि मग कपाळाला हात लावला जातो.

एक म्हण आहे “झाकली मूठ ….” पण सोशल मिडिया मुळे काही मुठी permanently उघड्या आहे. पूर्वी सिनेस्टार आणि तत्सम मंडळी  “out of sight, out of mind” च्या भीतीने लोकांच्या नजरेत राहण्यासाठी वेग वेगळ्या क्लुप्त्या करायचे. वेळ पडल्यास paid news देत. आता सोशल मिडिया मुळे त्यांचा खर्च वाचला पण सर्वसामान्य माणूस मात्र या फंद्यात अडकला.  आवड म्हणून काही करणे वेगळे पण प्रत्येक बाबतीत भाष्य करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली. आणि ते का थोडे होते म्हणून काही तर स्वतः ची रोजनिशी चे जाहीर वाचन करू लागले. होणार काय …. कपाळावर हात दुसरे काय.

परवा नारळी किंवा राखी पौर्णिमा झाली. राखी हा आमचा सण आहे कि नाही तो वाद वेगळा. पण भाऊ बहिणींच्या प्रेमाचे जे प्रदर्शन बघितले त्या वरून  “सब घोडे बारा टके” ची जाणीव झाली. सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्र च्या यादीत सार्वजनिक रक्षाबंधन. प्रेम आपुलकी पेक्षा उपचाराचाची जाणीव होती.  मग काय …मी. क. हा. ला.

तुम्ही कधी कपाळाला हात लावला होता का? आठवते का बघा