निवडणुकीचे वारे!

सध्या भारतात निवडणूक हा “HOT” विषय आहे. सत्ताधारी आणि विपक्ष सर्वजण आपण निवडून आल्यावर पुढे काय करू याची यादी वाचण्यात गुंग आहेत. जनतेला  “short term memory” चे शाप असल्याने या यादीचे फार महत्व नाही. असो.

निवडणूक म्हणजे उमेदवार, त्याचा पक्ष आणि त्या पक्षाचे खंदे कार्यकर्ते. पक्ष कोणाच्या बळावर चालतो? नेता कि कार्यकर्ता?

गेले काही महिने विविध पक्ष यात्रा, रोड शो आणि मेळावे घेवून मतदारांना आपले म्हणणे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. नेता कोणत्याही पक्षाचा असो त्याच्या मागे कार्यकर्तांची फौज असते. कोण असतात हि मंडळी.

सर्वसामान्य नोकरदारा पासून ते उच्चपदस्त सगळेच वर्षातील CL (casuality leave) अतिशय जपून वापरतात. निदान कुटुंब वत्सल तर नक्कीच. स्वतःचा व्यवसाय असलेले तर त्याहून काळजी घेतात आणि गरजे पेक्षा जास्त सुट्टीच्या नादाला लागत नाही.

निवडणूक जाहीर झाल्या पासून ते निवडणुकीचा निकाल लागे पर्यंत नेते मंडळींच्या सोबत असलेल्या कार्यकर्तांना एवढी रजा कोण देतो? यांची नोकरी जात नाही का? जर यांचे व्यवसाय असतील तर ते चालतात कसे? यांना पगार कोण देतो? यांच्या कुटुंबाची काळजी कोण घेतो? संसाराचा खर्च कसा चालतो? सर्वात शेवटी या तरुणांचे पुढे म्हणजे निवडणुकी नंतर काय होते?