Today: Rain + Rain + …

monday_24nov14पाचोळे, आम्ही हो पाचोळे
काय कुणासी देऊ, काय कुणाचे घेऊ?
वणवण भटके वनांतले
पाचोळे आम्ही वादळातले

कधी भरारी अथांग गगनी
केव्हा न कळे येतो अवनी
मोहपाश ना आम्हां कुणाचा
स्वैर अम्ही आपुले

– अण्णा जोशी