Silent Sunday: Noooo

Yesterday was our Independence day. This morning after reading an article in “The Hindu” I asked myself “Are we really independent”?  And why was so?

The serene view of the Kodaikanal hills from the ‘Coaker’s Walk’ hides a tale of melancholy and everyday struggle.

‘Kodaikanal Won’t’, a groovy rap video released by the NGO Jhatkaa.org, is the latest social media anthem that highlights the popular outcry against the alleged mercury contamination in Kodaikanal by Hindustan Unilever’s thermometer factory.

In the UK, the permissible mercury level is 1mg/kg whereas the company wants a standard of 20-25mg/kg of soil here. By its own estimation, it let out 1.2 tonnes of mercury into the Pambar Shola forests. This is environmental colonialism,” says environment activist Nityanand Jayaraman,
The mainstream media had turned a blind eye to the pleas of the workers, says environmentalist Nityanand Jayaraman.

Thanks to Sofia Ashraf, the Chennai-based rapper for a YouTube video. ‘Kodaikanal Won’t’, a groovy rap video released by the NGO Jhatkaa.org, is the latest social media anthem.

Do watch this  “Kodiakanal Won’t”

http://www.youtube.com/watch?v=nSal-ms0vcI

References:

 1. http://www.thehindu.com/news/national/tamil-nadu/will-the-mist-lift-in-kodaikanal/article7544562.ece?homepage=true
 2. http://www.thehindu.com/news/national/tamil-nadu/how-the-kodaikanal-wont-video-went-viral/article7500019.ece

Timeline:

2001 TNPCB shuts down the HUL thermometer factory after sale of mercury contaminated glass to scrap dealers is detected. Health study of workers done
2003 Large amount of mercury scrap sent back to the U.S.
2006 Ex-employees move Madras High Court against Unilever. Health effects such as miscarriages, kidney and nervous system damages, mental disability in children etc. stated
2011 Committee constituted by Ministry of Labour concludes there was prima facie evidence of mercury-related ailments in workers
2015 Unilever CEO Paul Polman says he is determined to solve the issue after international focus following rap song

गोधडी भाग ३: म्हणी/ सुविचार चा गोंधळ

जगभरात सगळी कडे, प्रत्येक भाषेत, प्रत्येक संस्कृतीत म्हणी आणि सुविचार (quote) सापडतात. या पुढे सुविचार न लिहिता मी quote हा शब्द वापरणार. मला तो जास्त योग्य वाटतो.

समुद्रा खालून जेंव्हा मोती सापडतो, त्याचा रंग, आकार आणि चमक ती इतरां पेक्षा वेगळी असते. वेग वेगळ्या प्रकारचे मोती त्यांच्या “composition ” वरून ओळखले जातात. आणि ते composition  बाह्य घटकां  वर आधारित असते. प्रत्येक पाण्यात प्रत्येक तऱ्हेचा मोती तयार होत नाही. तसेच quotes/म्हणीचे पण विशिष्ट प्रसंगी योग्य वाटतात. कुठली ही म्हण/quote universal नसते.  एखादी म्हण/quote आवडण्या साठी ते कोणी प्रसिद्ध व्यक्तीचे असले पाहिजे असे मुळीच नाही. खरे सांगायचे झाले तर काही quotes मला पटतच नाही.  साधी माणसे रोज च्या व्यवहारात सुंदर असे काही म्हणून जातात कि आपल्या ते खूप भावते. असो.

” You get what you deserve”.

हे तोवर योग्य वाटते जोवर आपण एका व्यक्ती ला मिळालेले यश/अपयश हे आपण त्याने केलेले कार्य याच्याशी जोडतो. पण काही वेळा याचा दुरान्वये हि संबंध नसतो. गेल्या आठवड्यात जर्मन विमान ला अपघात होऊन दीडशे जणांचा जीव गेला. जर त्या अपघातास सहकारी विमान चालक जवाबदार असेल तर, त्याला हवे ते झाले पण त्या एकशे एकोणपन्नास जणांचा काय दोष होता.  शेवटी आपण प्रारब्ध म्हणू.

दुसरे: ” if you are poor at age 35 you derserve it”. हे वाक्य आहे चीन मधील एका अब्जादिशाचे, अलिबाबा या कंपनीच्या सर्वेसर्वाचे, सी. ई. ओ चे.

तुम्हास काय वाटते? मी विचार करते त्या लाखो तरुण/ तरुणींचा, जे कष्ट करून उच्च शिक्षण घेतात. पण नोकरी च्या बाजारात त्यांच्या डिग्री चा उपयोग होत नाही. सरकारी नियमां मुळे आणि राजकीय उदासीनते मुळे त्यांची  नोकरी  कायमची होताना त्रास होतो किंवा उशीर होतो. यात त्यांचा दोष कितपत असतो! सगळे काही  असताना आळसामुळे जर व्यक्ती गरीब राहत असेल किंवा आळसामुळे जवळ असलेले गमावत असेल तर हे quote लागू पडते. पण नेहमी तसे नसते तेंव्हा जाहीरपणे असे म्हणणे योग्य वाटत नाही.

“Learning never exhausts the mind”. Leonardo da Vinci.

मी पुढे जोडीन “conditions apply”, भारतात या जोड गोळी ची अतिशय गरज आहे, तुम्हाला ही पटेल जर शिक्षण पद्धत आणि सामाजिक भान चा विचार केला तर. पण वरील वाक्य ही चुकीचे नाही, हे कसे या साठी गोधडीचा पुढचा तुकडा. सध्या एवढेच!

विचारांची गोधडी भाग २: मार डालाsss

सायबांने आमच्यावर शंभर हून जास्त वर्ष राज्य केल. एक न दोन अनेक कारणांनी आपल्या कडे बऱ्याच  गोष्टी रुजविल्यात, त्यात महत्वाची म्हणजे इंग्रजी भाषा. आणि आता सायबाला जाऊन  साठाहून जास्त वर्षे  झाली तरी या भाषेचे प्रेम कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्यात आम्हा भारतीय लोकांत  ‘confidence’ इतका ठासून भरलेला आहे कि आपण जे बोलतो किंवा लिहितो ते बरोबर कि नाही याची खात्री करावी अशी आम्हांस जरूरच वाटत नाही.

सोशल मिडिया मुळे तर याला आणखीनच उधाण आले आहे. स्पेलिंग म्हणू नका, व्याकरण म्हणू नका, रोज नवनवीन विषय हास्यासाठी मिळतात. काही वेळा मात्र कळस होतो.

पूर्वी एखादी व्यक्ती गेली की ओळखीचे किंवा घरचे पेपरात निधनवार्ता म्हणून द्यायचे, त्याच्या भरी ला आता सोशल मिडिया ही आले आहे. त्यात चुकीचे असे काही नाही, उलट कमी वेळात जास्त लोकांपर्यंत बातमी पोचते.

अरे जिवंत माणसांचे काय हवे ते करा, ते सांभाळून घेतील स्वतःला पण जे एक तर अस्थीत रुपांतरीत झालेत किंवा सहाफूट जमिनी खाली गेलेत त्यांना तरी माफ करा.  ते कसे तर,

 •  कोणी नवीन पोस्ट दिली कि like करायलाच हवे असे गृहीत धरणारे बहाद्दूर अनेक आहेत, ते काही विचार न करता like  देवून मोकळे होतात.
 •  बातमी मराठी, हिंदी किंवा इतर प्रांतीय भाषेत असली तरी इंग्रजीत उत्तर देणारे काही कमी नाहीत. “RIP” चा अर्थ सगळ्यांना माहितच असेल याची मला खात्री नाही. कारण,
 • “RPI” लिहिणारे पण आहेत, एवढी कसली घाई असते, कि typing ची चूक दुरुस्त पण करता येत नाही. पण समजा “editing” जमत नसेल तर कोणाला तरी विचारावे, तर इभ्रत आडवी येते.
 • परवा तर कहरच झाला, RIP चा full form माहित असणाऱ्याने ने लिहिले “Rest in pieces”.

मी कपाळाला हात लावला.

सोशल मिडिया च्या अतिरेकामुळे खरे पाहता सगळ्याच भाषा “Rest in pieces” झाल्यात जमा होतात कि काय याची शंका आल्या शिवाय राहत नाही!

मिठानुभव!

मीठ  कश्या प्रकारे हाताळू नये याच्या बऱ्याच कथा आपल्या कडे ऐकायला मिळतात,  अगदी लहान असल्या पासून. काही उदाहरणं द्यायची झाली तर,

मीठ सांडले कि मेल्या नंतर पापणी  ने उचलावे लागते.  मीठाचा डबा दुसऱ्याच्या  हातून घेतल्यास भांडण होते. त्यावर उपाय म्हणजे, एकाने डबा उचून खाली ठेवणे दुसऱ्याच्या हातात न देता समोर ठेवावा आणि मग दुसऱ्याने तो  उचलावा.  ताटात मीठ सोडू नये, जेवण झाल्या वर त्यावर पाणी घालावे.

ताटात मीठ वाढण्याची पद्दत अजून हि बऱ्याच ठिकाणी आहे. जेवणाऱ्याला high blood pressure  असो किंवा जेवण dining टेबल वर असले, म्हणजे मिठाचे लहान भांडे ठेवायची सोय असून सुद्धा.

हो पण,  देवाला नैवेद्या साठी वाढलेल्या पानात मात्र मीठ वाढत नाही. आहे कि नाही गम्मत. वर नैवेद्य द्यायच्या आधी चव बघायची नाही. नाही तर ते उष्टे होते. पुराणातील शबरीची गोष्ट फक्त ऐकायची आचरणात आणण्यावर बंदी.  अनेक ठिकाणी logic लागत नाही पण प्रश्न विचारणे म्हणजे मोठ्यांचा अवमान.

नॉर्वेत सध्या तापमान शून्यच्या जवळपास असल्याने, काही गावांत जागोजागी फुटपाथवर नगरपालिका जाडे मीठ पसरते, बर्फ लवकर गोठू नये यासाठी.  त्याचे (पसरलेल्या मिठाचे) प्रमाण बघित्यला वर लक्षात येते कि यांच्यावर मिठाचे संस्कार नक्कीच झाले नसावे. 🙂

भेटी

लिहिण्यास कारण हे की हल्लीच एका “अमृत महोत्सव” सोहळ्यास हजेरी लावली. आजकाल आपल्या कडे घरगुती समारंभ थोडे आणि सोहळेच जास्त असतात. कारण काहीही असो.

तर हा समारंभ एका आजी साठी होता आणि त्यांच्या मुलींनी/मुलांनी आणि इतर कुटुंबीयांनी तो योजिला होता. घरच्यांनी कौतुक केल्या वर मग इतर आप्तेष्टांनी भेटी देण्यास सुरु केले. नाही नाही म्हणत १५ – २० साड्या, १०-१५ शाली, ५-१० चादरी, काही पाकिटे आणि इतर गोष्टी गोळ्या झाल्या. सोबत मिठाई चे डबे होतेच.

अधून मधून संभाषण असे होते की, अगं  खूप दिवसापासून यायचेच होते भेटायला  पण जमलेच नाही, या निमित्ता  ने भेटणे झाले. मागे काही महिन्या/वर्षा पूर्वी कुठल्या तरी कार्या निमित्त  भेट झाली होती वगेरे वगेरे. वाक्ये आलटून पालटून सारखीच होती. पूर्वी आजी कडे कामा निमित्त येणाऱ्यांची संख्या जास्त असावी. असे वाटण्याचे कारण हे ऐकू वाक्य “पूर्वी भेटणे जास्त होत होते”. आजी कामात आणि मदतीला चोख, त्या मुळे  तिची बऱ्याच जणांना अडी – अडचणीत मदत झाली. पण झाले गेले आपल्या सोयी ने विसरणे हा समाजाचा अलिखित नियम आहे.

बहुतेकांनी आवर्जून सांगितले दिलेली वस्तू वापर हं. सांगितले प्रेमाने असावे आपण मानूया. पण तो भेटींचा ढीग बघून मनात आले की आजींना या सर्व गोष्टींचा खरच उपयोग आहे का? नाही न, मग काय देणे  योग्य असावे?

भेटी देताना, काही तरी द्यायचे म्हणून दिले या पेक्षा थोडी कल्पकता  असावी.  आर्थिक परिस्थिती चांगली असली कि वृद्ध व्यक्तींना वस्तू पेक्षा साथ-सोबत गरजेची असते.   ती कशी देत येईल ते पाहावे. एखाद  सकाळ, दुपार किंवा संध्याकाळ त्यांच्या साठी ठेवली तर? त्यांना कुठे फिरायला घेवून गेला तर? त्यांच्या बरोबर गप्पा मारल्या तर? त्यांना नियमित फ़ोन  केला तर. हे वाटते तितके अवघड नाही, फक्त त्यासाठी आम्ही आमचा “बिझी आहोत” चा बुरखा बाजूला काढायला हवा.  आणि दुर्देवाने आर्थिक बाजू कमकुवत असेल तर नीट विचार करून योग्य अशी मदत करावी.

मुली – सुना नोकरी करायला लागल्या पासून आणि विभक्त कुटुंब झाल्या पासून आजी- आजोबांच्या जवाबदाऱ्या  वाढल्या आहेत. मग त्यांचा वापर हि जास्तं  होवू लागला आहे. ते कामाचे असे पर्यंत नियमित संवाद/संबंध ठेवणे आणि नंतर त्यांच्या गरजेच्या वेळीस आपल्या व्यस्थतेचे कारण सांगणे, हे योग्य नव्हे.

“पाणी नेहमी पुढे जाते” असे म्हणतात. थोडक्यात आपल्या मुलांची काळजी म्हणून त्यांच्या वर नजर  ठेवायची, त्यासाठी  सोबतीस  mobile , फेसबुक, whatsup वरून संपर्कात असायचे. पण आधीच्या पिढीत असणाऱ्यांना मात्र “विशिष्ट दिवशीच” आठवायचे. त्या दिवशी एक फोन मारायचा, आपला फेसबुक स्टेट्स अपडेट करायचा आणि मोकळे वहायचे. परत वर्षाची विश्रांती.  जर कोणी समारंभ केलेच तर एक भेट देवून मोकळे व्हायचे.

William Arthur Ward चे सुंदर वाक्य आहे,

God gave you a gift of 86,400 seconds today. Have you used one to say ‘thank you’?

ऐकून छान वाटावे असे!

माणसाचे मन म्हणजे अजब रसायन आहे. सुख आणि दुखः कशात वाटेल सांगता येत नाही.  आज एक ६८

Mother and child
Mother and child

वर्षाची व्यक्ती भेटली. काय कुठे निघालात विचारल्या वर स्वारी खुलली आणि लगेच म्हणाली, ” जरा गावात जात आहे, थोडी फुले आणायची आहेत आणि येताना पोस्टात जाणार”. चेहरा प्रफुल्लीत होता म्हणून लगेच विचारून टाकले पोस्टात, …  काय विशेष? उत्तर आले, “माझ्यासाठी parcel आले आहे असे समजले”. चेहरा प्रश्नांकित केल्यावर पुढचे उत्तर लगेच मिळाले. दोन दिवसाने माझा वाढदिवस आहे. भेट आली आहे. In advance शुभेच्छा दिल्या आणि म्हटले अरे वाह! व्यक्ती हसली आणि म्हणाली आई ने पाठविले आहे. त्यावर माझा मोठ्ठा काय ऐकून आजू-बाजूचे लोक क्षण भर थांबले. स्वारी  शांतपणे म्हणाली, ” माझी आई ९८ वर्षाची आहे. अमेरिकेत असते. दर वाढदिवसाला न चुकता भेट पाठविते.”

काही म्हणा हे मला ऐकून खूप गोड वाटले. ९८ वर्षाची आई आपल्या ६८ वर्षाच्या बाळाला आवर्जून भेट पाठविते. वाह! आयुष्यात सारे काही कर्तृत्वाने मिळविता येते असे नाही तर नशीब ही लागते.

आपुलकी – मनाची घालमेल!

रोज समाजात वावरत असताना आपल्या कानी अनेकांचे शब्द/बोल पडतात. लक्ष द्या देऊ नका ते पडतात. हं light1याला अपवाद एकच जर तुम्ही स्वतः ला मुद्दाम लोकां पासून दूर केलेत आणि कायम earphones लावून फिरत असाल.

परवाचीच  (मराठीतील परवा 🙂 ) गोष्ट. काही कारणास्तव अर्धा – पाऊण तास वेळ काढायचा होता आणि त्या साठी दोन options होते. एक तर macdonalds  किंव्हा starbucks. मी अर्थातच दुसरे निवडले.

येऊन टेकत नाही तेच मराठी बोल कानी पडले. ते टेबल थोडे आडोश्याला होते म्हणून बसलेल्या व्यक्ती काही दिसल्या नाहीत.

मुलगा १: अरे मी मुद्दाम तुला इथे बोलावले, घरी हिच्या समोर बोलायचे नव्हते.

मुलगा २: कायरे, काय झाले?

मु. १: अरे तसे विशेष काही नाही पण कोणाकडे मन हलके करावे असे वाटत होते म्हणून तुला बोलविले.

मु.२: ???

मु.१: तू बघितलेच आहे हिची नेहमी तक्रार असते कि मी पैसे खर्च करत नाही. चिकू मारवाड्या सारखा राहतो.

मु.२: अरे ती काही खोटे सांगत नाही. आता हेच बघ न! तुझा mobile किती outdated  झाला आहे. परत तुझे कपडे आणि हो shoes पण. काय रे साल्या इतका पैसा मिळवितो मग विचार कसला करतो? तरी बरे तुझी बायको – मुले tiptop असतात.

मु.१: पैसा मिळवितो बरोबर आहे. पण खर्च करायला होत नाही. हेच तर सांगायला तुला इथे बोलावले आहे. अरे गावा कडे आई- बाबा, मोठा भाऊ त्याचे कुटुंब राहतात. धाकटी बहीण ही दुसऱ्या गावाला असते. सगळे कमावते असले तरी माझ्या शिक्षणासाठी आई-बाबा सोबत प्रसंगी भावाने आणि बहिणीने या ना त्या कारणाने मदत केली आहे. ते विसरता येत नाही रे. माझी परिस्थिती खूप सुधारली पण त्यांची नाही.

मु.२: तिथे काही problems आहेत का?

मु.१: तसे नाही रे. पण इथल्या पेक्षा तिथे कष्ट खूप असतात. आईच्या retirement ला अजून काही वर्षे आहे. पण ती थकली आहे रे.

मु.२. मग तुझा काय विचार आहे?

मु.१: त्यांना नियमित मदत करायचा विचार आहे. तसेच शक्य झाले तर भावाला आणि बहिणीला ही काही मदत करावी असे वाटते.

मु.२: खूप भावुक होतो आहेस असे वाटते. नीट विचार कर.

मु.१: हे बघ मी गेले तीन वर्षात हिला आणि मुलांना कधी कशाला ही नाही म्हटले नाही पण माझ्या कडून जमेल तसे काही रक्कम save  केली आहे. तुला सांगतो दुकानात नवीन काही नुसते बघितले तरी खूप चोरट्या सारखे होते. जो पर्यंत ती रक्कम मी दादाला आणि  धाकटी देत नाही तो पर्यंत निवांतपण नाही बघ.  अरे त्यांनी मागितली नाही किंव्हा ते घेतील याची guarantee नाही. पण मी देणार आहे.

मु.२. You are different. अरे तू असा असशील असे वाटले नव्हते रे. केवढा विचार करतोस. Your family is really lucky.

मु.१: तुला पटते ना. मग आता तू मला मदत करायची हिला convince करण्यात. उगीच तिचे परत गैरसमज  नको.

…चल lunch break संपत आला निघूया.

सिनेमा- सिरिअल मध्ये असतात तसा प्रसंग, पण खरा. त्या मुलाचे बोलणे ऐकून खूप बरे वाटले.  अजून समाजात संवेदना जागी आहे पाहून खूप बरे वाटले.

संस्कृती आणि पारंपरिक कर्मकांड की ‘रॅशनल थिंकिंग?

आज लोकसत्ते मध्ये एक छान लेख वाचला. बरेच दिवस या संदर्भातले वेग वेगळे विचार मनात घोळत होते. लेखिकेचे आभार माझे लिखाणाचे श्रम वाचविल्या बद्दल.

मी येथे मला आवडलेले लेखातील मुद्दे मांडत आहे. पण हा लेख शिकलेल्यांनी अवश्य वाचवा असे मला वाटते. अश्या गोष्टींची चर्चा तरुण पिढीत होणे गरजेचे आहे. महाविद्यालातून अश्या प्रकारचे प्रबोधन झाले तर खूप प्रश्न आपसूप मिटतील.

 • सणावारांबद्दल असं सांगितलं जातं की अमुक निमित्तानं लोक जमतात, तमुक निमित्तानं माणसं भेटतात. सगळय़ांच्या भेटी होतात. पण ती सगळी निमित्त धर्माशी निगडित, धार्मिक असणं हे शंभर वर्षांपूर्वी ठीक होतं. नव्हे योग्यच होते, पण आता तर या काळात साध्या कारणांनीसुद्धा सारखी गेट टुगेदर होत असतात.
 • पूर्वीचे सणसमारंभ, रीतीभाती, परंपरा या त्या काळच्या समाजाला एक बांधीव स्वरूप देण्यासाठी पूर्वजांनी निर्माण केल्या. प्रत्येकामागे निश्चित असा वैज्ञानिक दृष्टिकोन पूर्वजांनी ठेवला असणारच, परंतु तो दृष्टिकोन नंतरच्या पिढय़ांना फारसा कुणी शिकवला नाही. रीतीभाती, परंपरांना पापपुण्याच्या कल्पना चिकटवून समाजाला फक्त धाक दाखवला गेला. तो धाक पिढय़ान्पिढय़ा ‘पोसलाही’ गेला.
 • रीतीभाती-लग्नकार्यातले विधी, कधीही एकमत न होणाऱ्या व्रतवैकल्यातल्या गोष्टी आणि सर्वात शेवटी चाललेली कर्मकांडं, सध्याच्या काळात या सगळय़ाला आलेलं उत्सवी स्वरूप.. हे सगळं प्रचंड गोंधळात टाकणारं आहे. बरं हे सारं यथासांग करणारी मंडळी आपापल्या सोयीप्रमाणे ती कर्मकांडं बदलत राहतात. आणि समोरच्याला मात्र त्यातला अट्टहास समजावून (धमकावून )सांगतात.
 • चांगला नवरा मिळावा, चांगलं घर मिळावं, मुलगा व्हावा, धनधान्य, वैभव मिळावं म्हणून व्रतवैकल्य करणं आणि कडक उपास करणं हे आजही कित्येक आई आणि सासू यांच्यासाठी महत्त्वाचं ठरतं आहे. आणि ते केले नाहीत तर त्यांना ते ते मिळणारच नाही, अशी सोयीस्कर समजूत घालून आजही अनेक तरुणींवर ते लादलं जातंय.
 • संस्कृती टिकवण्यासाठी सुसंस्कृत विचारसरणी आवश्यक आहे. एकमेकांना समजून घेणं, एकमेकांमध्ये सुसंवाद असणं आणि सोयीप्रमाणं आपल्या कुटुंबाची रचना ठेवणं हे जास्त आवश्यक आहे.
 • ‘लग्न’ या प्रकारात तर सध्या साधेपणा म्हणजे कोणतं तरी पाप असण्यासारखं पिसाटासारखे खर्च होताना दिसतात.
 • रीतीभाती, अंधश्रद्धा, अंधविश्वास यांना आपलं आपणच आम्ही बांधून घेतलं आहे. आणि तिथेच घुमतोय सारखे.. पिंगा ग बाई, पिंगा ग बाई पिंगा.. कुणी डोळसपणानं पुढे जात असेल तर त्याला टोमणे मारून मारून मागे ओढायचं आणि घ्यायचं या खेळात पुन्हा घुमायला. आणि आसुरी आनंदानं पुन्हा त्या दिशाहीन, परंपरांचा पिंगा घालायला लावायचं. पिंगा ग बाई, पिंगा ग बाई पिंगा..

 

संपूर्ण लेख येथे सापडेल पिंगा ग बाई पिंगा..

धाव कृष्णा धाव

वेळ: दुपारी ३ वाजता

दिवस: रंगपंचमी

सध्या वृत्तपत्र आणि टीव्ही वर स्त्री आणि त्यां वरील अत्याचार हे नेहमी चर्चेचे विषय असते.  पूर्वी अत्याचार  होत नव्हते आणि आतच होतात असे म्हणता येणार नाही. स्त्रीवर अत्याचार अगदी अनादीकाळा पासून होत असावे. रामायण आणि महाभारत हि याला अपवाद नाहीत. आता मात्र स्त्रियांची सुरक्षा हा खरेच चिंतेचा विषय झाला आहे.

स्त्रियांवर होत असलेले अत्याचारांचा संबंध आधुनिक परीधानाशी लावला जातो.  तसे असते तर अश्या घटना एका विशिष्ट वर्गा पर्यंत सीमित राहिल्या असत्या. आकडेवारी याला विरोध करते. अश्या घटनेत स्त्रीचे वागणे आणि  तिचे कपडे कसे,  हे दुय्यम असते. पुरुषाची मानसिकता ही बळजबरीस कारणीभूत ठरते.

परवाच रंगपंचमी साजरी झाली. काही ठिकाणी धुळवडला (धुलीवंदनला) तर काही ठिकाणी रंगपंचमीला सुट्टी असते. सुट्टी नसल्यामुळे एक तरुण जोडपे कामास गेले पण काही कारणास्तव सुट्टी लवकर झाली. घरी येईस्तोवर अढीच वाजले.   दोघे नोकरी करत असल्याने घरची कामे करायला २ मोलकरणी होत्या.  एक सकाळी येई आणि एक संध्याकाळी.  त्या दिवशी संध्याकाळ मोकळी मिळावी म्हणून त्यांनी संध्याकाळी येणाऱ्या मावशींना दुपारीच या असे कळविले.  मावशींची इतर कामे लवकर झाल्याने त्या एव्हाना घरी पोचल्या होत्या.

मावशींना घरून बाहेर पडे पर्यंत तीन वाजत आले. बरेच लोक रंगपंचमी खेळून एव्हाना घरात पोचले होते. उन्ह असल्याने रस्त्यावर चीटपाखरू ही नव्हते. मावशी गेली  २०- २५ वर्षे त्या भागात  वेगवेगळ्या घरांत कामे करतायेत. जवळ असलेल्या वस्तीत त्या राहतात. मावशींना चार मुली असून दोघींची लग्न झालीत. कामाला जात असताना, रस्त्यात शेजारी अचानक एक गाडी थांबली. आतला माणूस म्हणाला, “आओ रंग खेलो, आओ मुझे गुलाल लागाओ”. मावशीनां  काही कळेना पण त्या लक्ष न देत चालत राहिल्या. त्यांनी रास्त ओलांडला तर गाडी त्या बाजूस आली. पाऊले भरभर टाकत त्या जवळ जवळ धावत सुटल्या. रस्ताच्या दोन्ही बाजूस बंगले. कोणास हांक मारावी, पण कोणी दिसेना. वळणावर अचानक गाडी थांबली, आतला माणूस बाहेर आला त्याने मावशीस धरले आणि बळजबरी गुलाल लावला. हे सर्व इतके पटकन झाले कि त्या पळू हि शकल्या नाहीत किंवा त्यांच्या तोंडातून आवाज हि फुटला नाही. गुलाल लावून मस्करी करून तो गाडीवाला निघून गेला.  एव्हाना कामाचे ठिकाण जवळ आले होते. त्या कश्याबश्या घरात गेल्या आणि पटकन खाली बसल्या. मग मात्र त्यांना खूप रडू कोसळले. तरुण जोडप्याला काही कळेना. मुलगी मावशीच्या पाठी वरून हात फिरवू लागली आणि तिच्या नवऱ्याने  पाणी आणून दिले. थोडे शांत झाल्यावर मावशीने झालेला प्रकार सांगितला.  त्या दोघांसाठी पण हे नवलच होते. असे काही होईल याची कोणास कल्पना नव्हती. मुलगा अस्वस्थ झाला. मावशींची माफी मागू लागला. जे काही घडले त्यास तो स्वतः ला दोषी समजू लागला.

प्रश्न असा हे कां घडले असावे. मावशी, मध्यम वयाची असून चार मुलींची आई आहे. तिचे नेसण अतिशय साधे आणि डोक्यावर पदर असतो. तो गाडीवाला काय म्हणून नीच हरकत करण्यास उतरला असेल.

देवळात बसविली कि स्त्रीची देवी होते पण तीच जर रस्तात दिसली तर “शिकार”? याच्या सारखे लज्जास्पद आणि काय असावे. आपल्या महान संस्कृतीच्या गप्पा मारणारे आम्हीच आहोत का? आम्ही आमच्याच देशात, राज्यात, गावात , वस्तीत सुरक्षित आहोत का?