बैलगाडी शर्यतींवर बंदीच – परंपरेच्या नावाखाली जनावरांचे हाल!!

याच सोबत विविध प्राण्यांच्या टकरी कधी बंद होणार का?
आणि कोट्यावधी रुपयांचा उलाढाल असलेल्या घोड्यांच्या रेस चे काय? घोडे सुटकेचा श्वास कधी घेणार?

बैलगाडी शर्यतींवर बंदीच!

‘प्रत्येक प्राण्याला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे,’ असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी बैलगाडी शर्यतींवर बंदी आणली. प्राण्यांच्या हक्कांची संकल्पना व्यापक करतानाच या हक्कांना घटनात्मक अधिकारांचा दर्जा देण्यासाठी संसदेने प्रयत्न करावा, असा सल्लाही सर्वोच्च न्यायालयाने दिला.
सर्वोच्च न्यायालयाचे न्या. के. एस. राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने जल्लीकटू येथील प्रसिद्ध बैलगाडी शर्यतींची प्रथा चुकीची ठरवताना प्राण्यांचे हाल थांबविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याच्या सूचना सरकार आणि पशू कल्याण मंडळाला केल्या. ‘जल्लीकटू असो, तामिळनाडू असो की महाराष्ट्र असो देशात कोठेही बैलांचा वापर शर्यतींसाठी करता येणार नाही,’ असे खंडपीठाने स्पष्ट केले.
‘प्रत्येक सजीवाला शांतपणे जगण्याचा आणि मारहाण, लाथाडणे, अतिवापर करणे, छळ करणे, जास्त माल लादणे यांपासून स्वत:चे संरक्षण करण्याचा अधिकार आहे. मानवी जीवन प्राण्यांसारखे नाही, असे आपण नेहमी म्हणतो. मात्र, हा नरकेंद्री विचार असून प्राण्यांनाही स्वत:चा सन्मान आणि किंमत आहे, हे आपण सोयीस्करपणे विसरतो,’ असे मत खंडपीठाने मांडले.

 

Animal rights activists hail ban on jallikattu

Jallikattu is a rural sport of bull fighting in Tamil Nadu, India

बिस्किटांचे गाव (pepperkakebyen)!)

सबंध जगात वेगवेगळ्या देशांत, प्रांतात, गावांत वेगवेगळ्या community traditions, स्थानिक परंपरा असतात. काही वेळा त्या धार्मिक स्वरूपाच्या असतात आणि काही वेगवेगळ्या प्रसंगी सुरु होतात आणि पुढे चालू राहतात. धार्मिक, जसे सणानिमित्त जत्रा आणि इतर परंपरा, जसे दिवाळीच्या वेळीस लहान मुलांचे किल्ले   किंवा पश्चिम महाराष्ट्रात, कोल्हापूरला  १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला लागणारी जिलेबीची दुकाने.

  नॉर्वेच्या बर्गन (Bergen ) या गावी, नाताळच्या काळात गावाची छोटी प्रतिकृती करण्याची परंपरा आहे. याची सुरुवात

१९९१ साली झाली. त्याला लोकांनी प्रतिसाद दिला आणि मग स्थानिक नगरपालिकेच्या पुढाकाराने ती एक परंपराच झाली.

याचे वैशिष्ट म्हणजे सर्व आकृत्या ginger bread cookies ( सुंठ घालून केलेली बिस्किटे ) ने तयार करतात. यात घरे, शाळा, गाड्या, दुकाने, बाजार, बोटी, जनावरे आणि खूप काही असते. बिस्कीटाची आकृती तयार करून त्यावर पिठी साखर आणि रंगीत गोळ्यांनी ती सजवितात. स्थानिक नागरिक भरभरून प्रतिसाद देतात. परिसरातील बालवाड्या, शाळा, संस्था आणि हजारहून अधिक कुटुंबेयात सहभागी होतात.

 हे जगातले सर्वात मोठे आणि वैशिष्टपूर्ण असे बिस्किटांचे  गाव आहे. या वर्षी यात १९००  इमारती आणि आगगाड्या असून ३८० चौ. मी. क्षेत्रात हे वसविले आहे. प्रत्येक वस्तू ही आपल्यात कलात्मक आहे.या प्रकल्पात अगदी ३ – ४ वर्षांच्या चिमुरड्यान पासून ते पंचात्तरी  ओलांडलेले आजी-आजोबा पण सहभाग घेतात.

 अश्याच पद्धतीचे गाव न्यूयॉर्क येथे ही तयार करण्यात आले आहे.  त्याची नोंद गिनीस बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. ते गाव एका व्यावसायिक आचाऱ्याने तयार केले असून ते संपूर्ण खाणे योग्य आहे. तसेच  सर्व बिस्कीटे एकच पाककृती ने तयार केलेली आहेत. ते गाव गिनीस बुकसाठी लागणारी नियमावली डोळ्यासमोर ठेवून तयार केले आहे. याच्या उलट बेर्गेन येथील गाव लोक सहभागातून तयार झाले आहे.

 वरील फोटो pepperkakebyen च्या फेसबुकच्या पानावरून घेतलेले आहे.