विचारांची गोधडी: “my space”

godhadi1या ना  त्या कारणाने वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या जागी,  आपण अनेक  विचार ऐकत, बघत किंवा वाचत असतो. त्यांची एक चित्र विचित्र गोधडी तयार होते. काही विचार पटतात तर काही नाही. काहीं बाबतीत आपण पुढे विचार करतो तर काही तेवढे पुरते ठेवतो. असेच काही विचार ज्यांनी मला विचार करायला लावले ते मांडत आहे.   त्यातील पहिला विचार किंवा गोधडी चा पहिला तुकडा आहे  “ज्याची त्याची स्पेस”.

  • नवरा बायकोचे जर एकमेका वर खरे प्रेम असेल तर त्यांना वेगळी अशी  “स्पेस” लागत नाही, असे कुठे वाचल्या सारखे आठवते. आणि हा विचार मनात खूप घोळत होता. हे बरोबर कि चूक कि दोन्ही हे समजत नव्हते. ते समजून घेण्यासाठी चा हा प्रयत्न.

‘Personal space’ हा शब्द हल्ली बऱ्याच वेळा कानी पडतो. सोबत जोडगोळी असतेच. ह्या असल्या गोष्टी म्हणजे “western world” चे चोचले. सुरवात करूया, स्पेस  पासून. ही स्पेस म्हणजे नक्की काय असते?

शाब्दिक अर्थात जरी स्पेस चा विचार केला तर असे दिसते कि, निसर्गाने space_2प्रत्येक जिवात, स्वतःच्या स्पेसची भावना अगदी जन्मतः  दिलेली आहे. ज्याला स्पेस मिळते, त्याची वाढ होते. फुलातून झाडातून हे दिसते. एका जातीची/ एका प्रकारची झाडे सुद्धा सारखी नसतात. याचे छान उदाहरण म्हणजे नारळाचे झाड. जी झाडे मोकळ्या जागेत लावली जातात, ज्यांच्या स्पेसच्या मध्ये, इतर झाडे किंवा वास्तू येत नाही ती झाडे सरळ वाढतात, गगनचुंबी होतात.  इतर झाडे मात्र सरळ न वाढता, त्या झाडा पासून किंवा वास्तू पासून लांब जातात. ज्या बाजूने सूर्याची किरणे जास्तजास्त मिळतील त्या बाजूस ती वाकतात. मोकळीक शोधत स्वतः साठी सूर्य किरणे गोळा करतात. फुलणाऱ्या गुलाबांची पण तीच तरह. जर अनेक फुले एकत्र असतील तर बाजूची नीट फुलतात. मधल्या फुलांना जागाच  उरत नाही. फुलणाऱ्या गुलाबांची पण तीच तरह. जर अनेक फुले एकत्र असतील तर बाजूची नीट फुलतात. मधल्या फुलांना जागाच  उरत नाही.

space_1घरातील लहान मुले सुद्धा, ज्यांची स्वतंत्र खोली नसते ती घरातील एक विशिष्ट जागा किंवा एक कोपरा आपलासा करून ठेवतात. फक्त माझी ही भावना असते. इतरांचे पण तसेच असते. एकाच घरातील माणसांची आवडीची जागा वेगवेगळी असते. आणि तसे नसले कि काय होते? सोपे … भांडण. तुझी जागा माझी जागा वरून. हे झाले प्रत्यक्षातील स्पेस बद्दल virtual space चा विचार करू.

जॉर्ज एस पेटन नावाचा एक अमेरिकी सैन्यातील जनरल होता, त्याचे एक सुंदर वाक्य आहे.

“If everyone is thinking alike, then somebody isn’t thinking.” किती योग्य वाक्य आहे.  मेंढे कसे एका पाठोपाठ जातात अगदी तसे.  आपल्याकडे म्हण आहेच “अति परिचयात अवज्ञा”. कुठल्या ही नात्यात जास्त जवळीक ही अयोग्यच. जिथे मोकळा श्वास नाही तिथे काहीच मोकळे नाही.

दोन व्यक्तींचे बऱ्याच वेळा एक मत होते. त्यांच्या आवडी निवडी ही सारखी असू शकतात पण म्हणून दोघांना उठता बसता सगळे सारखेच हवे असे म्हटले तर, चटकन जाणवते, त्यातील एक माघार घेत असणार. वाद नको म्हणून.  जेंव्हा एकमेकास स्पेस द्यायचे नाकारले जाते, तिथे योग्य ‘respect’ ची कमतरता असते. जेंव्हा दुसऱ्यास स्पेस द्यायचे लक्षात राहत नाही तेंव्हा माणूस हा स्वकेंद्री आहे आहे उगीच जाणावते.

गोधडी चा फोटो गुगल वरून घेतला आहे.