Silent Sunday

silentsunday_19oct14_2

Image | Posted on by | Tagged , , , , , , , , , , | Leave a comment

Remembering Yesterday – Refracted happiness!

eve_walk_18oct14

Image | Posted on by | Tagged , , , , , , , , , | Leave a comment

Nurturing Thursday 17

nt_16oct14

More on Nurturing Thursday

Posted in Photography, Quote | Tagged , , , , , | 4 Comments

Wordless Wednesday: Dusk

ww_15oct14_1

Image | Posted on by | Tagged , , , , , | Leave a comment

Cee’s Fun Foto Challenge: Vibrant Colours

More on Cee’s fun foto

Posted in Photography | Tagged , , , , , | 6 Comments

It’s Autumn after all

autumn_14oct14_1

Image | Posted on by | Tagged , , , | 1 Comment

गंमत: इकडे तिकडे चोहिकडे – भाग १

हल्ली पर्यंत वाचनासाठी वर्तमानपत्र, मासिके, नियतकालिके आणि पुस्तके यांचा पर्याय असायचा. आता त्यात भर पडली आहे ती ब्लॉग्सची. वाचावे तेवढे थोडेच अशी परिस्थिती आहे.

काही गोष्टी आपल्या कल्पने पलीकडच्या असतात. मी वाचलेल्या आणि मला नवल वाटलेल्या गोष्टी मी सांगू इच्छिते. सुरवात आज पासून…

एका डच लेखिके ने आपल्या लहानपणीच्या आठवणीत सांगितले, आठवड्यातून एक रात्री जेवताना pancake असायचे. ते त्यावर साखर पेरून खायचे. यात काही विशेष नाही. मी बऱ्याच लोकां कडून हे ऐकले आहे. बहुदा वीकेंड ला pancake असायचे आणि बऱ्याच घरी अजून सुद्धा असतात. लेखिकेच्या  माहेरी, तिच्या लहानपणी रोज रात्री जेवताना सूप असायचे. त्यात रोज बदल असायचा आणि ते पौष्टिक असायचे. सूप साठी आता वापरतात तसे वाडगे (bowl) नसून खोलगट बश्या वापरण्याची त्या काळी पद्धत होती. तर रोज फक्त सूप. आपल्या कडे हॉटेलात असते, तसे पांचट (पुचूक पाणी ) किंवा कॉर्नफ्लावर वापरून करतात तसे नव्हे तर ते सूप म्हणजे पूर्ण आहार, ज्यात भाज्या, कंद आणि मांस (किंवा मासे ) सर्व सामील. ज्या दिवशी pancake असायचे त्यादिवशी जेवताना आधी सूप मिळायचे आणि मग pancake. सूप पिउन झाले कि त्या बशीत pancake  कसे खाणार? पण दुसरी बशी मिळायची सोय नव्हती. कारण आज सारखे डिशवॉशर नव्हते आणि तो मंदीचा काळ असल्याने मोलकरीण देखील नव्हती. तर गंमत अशी कि त्या दिवशी ते बशीचा वापर दोन्ही बाजू ने करत. आधी सूप पियायचे आणि मग बशी उपडी किंवा उलटी करून त्यावर pankake खायचे.

कसे वाटते ऐकून?

Posted in मनोरंजन, सहजच, सामाजिक, हटके, Marathi | Tagged , , | Leave a comment

विचारी मना तूचि शोधूनि पाहे…

मंगलयान ( Mars Orbiter Mission किंवा MOM), च्या यशा नंतर सोशल मिडिया वर सगळी कडे “भारतीय असल्याचा अभिमान” चे जाहिरीकरण भरपूर झाले. तसे ते अनेक वेळा होत असते, पण प्रमाण थोडे असते. असो.

श्री कैलाश सत्यर्थी यांना शांतते साठी चा नोबेल पुरस्कार जाहीर झाला, तो दोघां मध्ये विभागून असला तरी त्याचे महत्व कमी होत नाही.  जो पुरस्कार गांधीजींना मिळाला नाही ( त्याची कारणे अनेक होती ), तो सत्यर्थी यांना मिळाला. वर कारणी एका भारतीयला हा पुरस्कार मिळाला याचा अभिमान वाटायला हवा. हा पुरस्कार मिळण्या मागील कारण म्हणजे त्यांनी स्वतंत्र भारतात असलेली गुलामगिरीची प्रथा नष्ट करण्यासाठी केलेले सखोल कार्य. विशेष करून लहान मुलांना गुलामगिरीतून सोडवणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे. त्यांनी सुरु केलेला लढा गेली तीस वर्षे चालू आहे.

भारताला स्वतंत्र मिळून ६७ वर्षे झाली.  भारतात बाल कामगार कायदा अस्तित्वात आहे. पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. लहान मुलांना विशिष्ट उद्योगांसाठी गुलामा सारखे राबविले जाते.  कागदोपत्री प्रत्येक जण स्वतंत्र आहे. पण खरे चित्र तसे नाही आहे.  कुटुंबच्या कुटुंब वेठबिगार म्हणून ठेवली जातात. जो त्यांच्या विरुद्ध आवाज उचलतो त्याला संपविले जाते.

हि अराजकता कशी शक्य आहे या internet आणि mobile  च्या युगात. जेंव्हा लहान सहान वस्त्यान पर्यंत दळण वळणाची साधने पोचली आहे. खेड्या पाड्यात ग्राम पंचायती कार्यरत आहेत. आपण कसा विश्वास करावा की शेतावर, वीटभट्टीवर आणि कारखान्यात काम करण्यासाठी एक ना दोन पण कुटुंबची कुटुंब वेठीस धरली जातात. त्यांच्या वर नको ते अत्याचार होतात आणि त्यांना दाद मागता येत नाही. हे सर्व सरकार (स्थानिक प्रशासन), पोलीस, मीडिया आणि राजकारणी यांना माहीत नव्हते या वर विश्वास बसेल का?

एका रिपोर्टनुसार … about 28 million children ages 6-14 are working in India, according to UNICEF, the U.N. children’s agency. Satyarthi’s organization, called Bachpan Bachao Andolan, or Save the Children Mission, is credited with freeing 70,000 of them.

सत्यर्थी यांना पुरस्कार कोणत्या संशोधनासाठी मिळाला असता तर आपण ठामपणे पुन्हा एकदा आपल्या  जाज्वल्य अभिमानाचे प्रदर्शन करू शकलो असतो.  पण सत्यर्थी म्हणतात,

“Most of us knowingly or unknowingly use products made by children under exploitative and inhuman conditions.”

एका भारतीयाने अश्या वाईट पद्धती विरुद्ध पुकारलेल्या लढ्यासाठी,  त्याला हा पुरस्कार मिळाला आता याचा अभिमान वाटावा कि स्वतःची लाज हे “विचारी मना तूचि शोधूनि पाहे”.

संदर्भ:

http://www.ndtv.com/article/india/nobel-caps-decades-of-fighting-child-slavery-in-india-605185?pfrom=home-lateststories

Posted in वर्तमानपत्रातून, सामाजिक, Maharashtra, Marathi, Quote, Uncategorized | Tagged , , , , , , | Leave a comment

First signs of snow!

निसर्गाचा चमत्कार…

Posted in Marathi, Photography, Travel | Tagged , , , , , , , | Leave a comment

Nurturing Thursday 16

nt_9oct14More on  Nurturing Thursday

Posted in Photography, Quote | Tagged , , , , , | 5 Comments