State of mind

खूप लिहावे से वाटते पण लिहायला बसले कि मात्र जमत नाही. हे लिहावे कि ते लिहावे यात गोंधळ होत आहे.
आपण लेखक नाही याची पराकाष्टा ने जाणीव होत आहे.

वीकेंड ला पेपर वाचले कि नुसते भाम्बायला होते.  हे सगळे कसे शक्य आहे असे वाटते. आपला देश चालला आहे म्हणजे देव नक्की असणार याची खात्री पटते. ती अश्या पद्धती ने पटावी हे दुर्दैव आहे.

एका ठिकाणी Paulo Coelho म्हणतो ” I write to empty my mind….”

कदाचित नंतर बैठक लागेल आणि पुढचे सुचेल. जबरदस्ती ने काही गोष्टी साध्य होतात, जसे स्वयंपाक करता येतो.   अभ्यास नाही पण तो करावाच लागतो, पण काही म्हणा लिखाण करता येत नाही.

तरी बरे माझे bread, butter आणि dessert लिखाणा वर अवलंबून नाही. नाही तर आनंदच होता 🙂

Summary: I am lacking  “the art of writing”…

5 thoughts on “State of mind

  1. स्टेट ऑफ माइंड वाचले अन लिहावे वाटले. काहीतरी लिहावे व करावे वाटणे हे प्रथम महत्वाचे. जे तुम्ही सतत करत आहात हे जाणवले. तुमच्या कामातून वेळ काढून तुम्ही आवडणारे, आनंद देणारे काहीतरी करू शकता ही जाणीवच मुळात सुख देवून जाते. रिझल्ट काही असो स्वतःसाठी थोडे का होईना जगणे हेच ग्रेट अनुभव देते.मग चांगले लिखाण का इतरांपेक्षा चांगले….. हा प्रश्नच राहत नाही.
    तुमचा ब्लॉग तुमच्या भावना अचूकतेणे मांडतो हे मात्र नक्की…

    Liked by 1 person

    • सुर्यकांतजी, तुमचा smartdost हा ब्लॉग आवडला. पण कुठल्या हि पोस्टला वाचकांना प्रतिक्रिया देत येत नाही. असे का?

      Like

  2. जर ‘आर्ट’च म्हणायचं असेल तर मग ती प्रत्येकात कमी जास्त असणारच.
    आर्ट पेक्षा ‘पार्ट’ करा लिखाणाला तुमच्या रोजमितीचा. बघा आपसुक सुचायला लागेल. आणि एखाद वेळी नाही सुचत काही… सोडून द्यायचं. ओढून ताणून केलं तर त्याचा आनंद मिळत नाही.

    ब्लॉग मस्त आहे तुमचा.

    Liked by 1 person

    • अपूर्व, तुमचा ब्लॉग बघितला, आवडला. पण मला comment देता येत नव्हती. शेवटी मी जुना blogger id वापरला.

      Like

  3. सूर्यकांत पंडित आणि अपूर्व, तुम्हा दोघांचे मनःपूर्वक आभार.

    माझा ब्लॉग मायदेशी माणसे वाचत आहे यातच सर्व आले.

    Like

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.