सफर: ग्रीस भाग १ (Travel chapter- Greece)

ब्लॉग च्या निमित्ता ने मला आलेले अनुभव यांची नोंद करणे आणि इतरांना गम्मत वाटावी हा उद्देश.

कॉपेनहागेन – अथेन्स फ्लाईट over booked होती. त्यामुळे विमान कंपनी ने ऑफर दिली. हि direct अथेन्स फ्लाईट न घेता जर via रोम फ्लाईट घेतली तर ३०० युरो चे voucher, फूड कूपन आणि दुसरे तिकीट हातो हात मिळणार.  गम्मत म्हणजे २ आज्या आणि दोन तरुणांनी हि ऑफर स्वीकारली. 🙂

वेग वेगळे देश फिरताना एक गोष्ट पराकाष्टाने जाणवते म्हणजे आपल्या आयुष्यात नशीब (the chance where do we born ) किती म्हत्वाचे आहे, तुम्ही कुठे जन्माला येता यावर किती तरी गोष्टी  अवलंबून असतात. तुमचे केलेले कष्ट या पेक्षा तुमचा देश यावर मिळणारे रिटर्न जास्त डिपेंड करतात. असो.

ग्रीक माणसांना फळे आणि फुले यांची जबरदस्त आवड. घरे सादी  पण अंगण एकदम साफ आणि जमतील तेवढी फुले. जमिनीत नाही तर कुंड्या पण फुले is a must. काही फुले आपल्या माहितीची आणि काही नवीन. गुलाब (अनेक रंगाचे, आकाराचे ),  चमेली,मोगरा, जास्वंदी, कर्दळी, गुलबकावली आणि अनेक बघितलेली पण नावे माहित नसलेली.   पाण्याची बचत जबरदस्त. आम्ही फक्त गप्पा माराव्या.  झाडे लहान –  मोठी सर्व ड्रीप इरिगेशन वर पोसलेली. बाकी माती उन्हं मुळे रखरखीत.

 

 

2 thoughts on “सफर: ग्रीस भाग १ (Travel chapter- Greece)

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.